IPL 2020, KXIP vs DC : ‘गब्बर’ शिखर धवनला ‘जब्बर’ कामगिरी करण्याची संधी

शिखर धवनने आयपीएलच्या 13 व्या मोसमात आतापर्यंत 359 धावा केल्या आहेत.

IPL 2020, KXIP vs DC : 'गब्बर' शिखर धवनला 'जब्बर' कामगिरी करण्याची संधी
Follow us
| Updated on: Oct 20, 2020 | 4:48 PM

दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील 37 वा सामना आज (20 ऑक्टोबर) खेळला जाणार आहे. हा सामना किंग्जस इलेव्हन पंजाब (Kings Eleven Punjab) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघांच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे. दिल्लीने हा सामना जिंकल्यास थेट प्लेऑफच्या फेरीत पोहचतील. तर पंजाब हा सामना जिंकून प्लेऑफसाठीचं आव्हान कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असतील. या मोसमात दिल्लीचा गब्बर शिखर धवन (Shikhar Dhawan) सातत्याने दमदार कामगिरी करत आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात गब्बर शिखरला धवनला किर्तीमान करण्याची संधी आहे. IPL 2020 Delhi Capitals Shikhar Dhawan Needs 62 Runs To Score 5,000 Runs In IPL

काय आहे किर्तीमान?

शिखर धवनला आयपीएलध्ये 5 हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. धवनला 5 हजार धावा करण्यासाठी अवघ्या 62 धावांची आवश्यकता आहे. शिखरने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 168 सामने खेळले आहेत. यात त्याने 125 च्या स्ट्राईक रेटने 4 हजार 938 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे.

5 हजारी मनसबदारी

आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 4 फलंदाजांनाच 5 हजार धावांचा टप्पा गाठता आला आहे. बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली, चेन्नईचा सुरेश रैना, हिटमॅन रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नरने अशी कामगिरी केली आहे. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नुकतेच सर्वात कमी डावात 5 हजार धावा पूर्ण करण्याची कामगिरी केली आहे. जर धवनने पंजाबविरुद्ध 62 धावा केल्या, तर तो 5 हजार धावा करणारा चौथा भारतीय तर पाचवा ओव्हरऑल फलंदाज ठरेल.

सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

विराट कोहली – 5759 सुरेश रैना – 5368 रोहित शर्मा – 5158 डेविड वॉर्नर – 5037 शिखर धवन – 4938

यंदाच्या मोसमातील ‘गब्बर’ कामगिरी

शिखर धवनने यंदाच्या 13 व्या मोसमात धमाकेदार फलंदाजी केली आहे. धवनने यंदाच्या मोसमात 9 सामने खेळले आहेत. या 9 सामन्यात शिखरने 143 च्या स्ट्राईक रेटने दमदार 359 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

दिल्ली पॉइंट्सटेबलमध्ये अग्रस्थानी

दिल्ली पॉइंट्सटेबलमध्ये 14 गुणांसह पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. दिल्लीने यंदाच्या मोसमात 9 पैकी केवळ 2 सामनेच गमावले आहेत. दिल्लीला पंजाबविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून प्लेऑफमध्ये धडक मारण्याची संधी आहे. दिल्लीने अशी कामगिरी केल्यास, प्लेऑफमध्ये यंदाच्या मोसमात धडकणारी दिल्ली पहिलीच टीम ठरेल.

संबंधित बातम्या :

IPL 2020, SRH vs KKR : डेव्हिड वॉर्नरच्या आयपीएलमध्ये वेगवान 5 हजार धावा, विराट कोहलीला पछाडलं

IPL 2020 Delhi Capitals Shikhar Dhawan Needs 62 Runs To Score 5,000 Runs In IPL

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.