IPL 2020 | मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर दिल्लीला दुहेरी झटका, ‘हा’ आक्रमक खेळाडू दुखापतीमुळे सामन्यांना मुकणार

दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने पराभवानंतर याबाबतीत माहिती दिली. (Delhi Capitals Rishabh Pant Injured)

IPL 2020 | मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर दिल्लीला दुहेरी झटका, ‘हा’ आक्रमक खेळाडू दुखापतीमुळे सामन्यांना मुकणार
Follow us
| Updated on: Oct 12, 2020 | 4:45 PM

अबुधाबी : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) रविवारी 11 ऑक्टोबरला डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) 5 विकेट्सने पराभव केला. या विजयासह मुंबईने दिल्लीचा विजयीरथ रोखला. मात्र दिल्लीला या पराभवासह दुहेरी झटका बसला आहे. दिल्लीचा स्फोटक फलंदाज आणि विकेटकीपर ऋषभ पंतला दुखापत झाली आहे. त्यामुळे ऋषभला पुढील काही दिवस खेळता येणार नाही. त्यामुळे दिल्लीसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. याबाबतची माहिती कर्णधार श्रेयस अय्यरने दिली आहे. (Delhi Capitals Rishabh Pant Injured)

पंतबाबत काय म्हणाला अय्यर ?

“ऋषभ पंतला दुखापत झाली आहे. त्यामुळे पंतला पुढील 7 दिवस खेळता येणार नाही. पंत दुखापतीतून केव्हापर्यंत बरा होईल या बद्दल मला माहिती नाही. मी पंतच्या प्रकृतीबद्दल संबंधित डॉक्टरांकडे चौकशी केली. पंतला किमान आठवडाभर विश्रांती घ्यावी, लागेल अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे, असं श्रेयस अय्यर म्हणाला. पंत लवकरच संघात पुनरागमन करेल” असा विश्वासही यावेळी अय्यरने व्यक्त केला. ऋषभला राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे पंतला मुंबईविरुद्धच्या सामन्यातही खेळता आले नव्हते.

दिल्लीचा पुढील सामना बुधवारी 14 ऑक्टोबरला राजस्थानविरुद्ध होणार आहे. तसेच यानंतर शनिवारी चेन्नईविरुद्ध भिडावे लागणार असणार आहे. दरम्यान मुंबईविरुद्धच्या सामन्यात पंतच्या जागेवर अॅलेक्स कॅरीला संघात स्थान दिले होते.

पराभवानंतर काय म्हणाला अय्यर ?

“आम्ही 10-15 धावा कमी केल्या. मुंबईला विजयासाठी 175 धावांचे आव्हान द्यायला हवे होते. मार्कस स्टोयनिस बाद झाल्याने आमचं नुकसान झालं. तसेच आम्हाला फिल्डिंगमध्ये सुधार करायला हवी. मुंबई दिल्लीवर बॅटिंग, बोलिंग आणि फिल्डिंग या तीनही बाबतीत वरचढ ठरली. त्यामुळे आम्हाला बॅटिंग आणि बोलिंगमध्ये आणखी सुधारणा करायला हवी”, असंही अय्यरने यावेळेस म्हटलं.

रविवारच्या झालेल्या या सामन्यनात दिल्लीने शिखर धवनच्या नाबाद 69 धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईला विजयासाठी 163 धावांचे आव्हान दिले. मुंबईकडून सूर्यकुमार यादव आणि क्विंटन डी कॉक या दोघांनी प्रत्येकी 53-53 धावा केल्या. या जोडीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने दिल्लीचा 5 विकेटने पराभव केला. या विजयासह मुंबईने पॉइंट्सटेबलमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली.

संबंधित बातम्या :

लंबी रेस का घोडा, दिग्गज खेळाडूकडून ऋषभ पंतचे कौतुक, म्हणाला….

(Delhi Capitals Rishabh Pant Injured)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.