IPL 2020 | बंगळुरुचं आव्हान संपुष्टात, ‘मिस्टर 360’ एबी डी व्हीलियर्सने चाहत्यांची मागितली माफी, म्हणाला…..
बंगळुरुला यंदाच्या मोसमात एलिमिनेटर पर्यंतच मजल मारता आली.
दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं (Royals Challenegers Banglore) आव्हान संपुष्टात आलं. एलिमिनेटर सामन्यात हैदराबादने मात करत बंगळुरुला बाहेरचा रस्ता दाखवला. यामुळे पुन्हा एकदा विराट आणि गॅंगचं ट्रॉफी उंचावण्याचं स्वप्न अधुर राहिलं. आव्हान संपुष्टात आल्यानंतर बंगळुरुने आपल्या ट्विटर हॅंडलवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. मिस्टर 360 एबी डीव्हीलियर्सने या व्हिडिओद्वारे आपल्या चाहत्यांची माफी मागितली आहे. ipl 2020 eliminator mr 360 ab de villiers apologized to the fans after the ipl 2020 royals challengers bangalore challenge was over
एबी काय म्हणाला?
एबीने बंगळुरुच्या सर्व समर्थंकांचं आभार मानले. “मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे. तुमच्या पाठिंब्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. या संपूर्ण स्पर्धेत तुमच्या सर्वांचे शुभाशिर्वाद आमच्या पाठीशी होते. तुमच्या समर्थनामुळेच आम्ही मैदानावर कामगिरी करु शकलो. मात्र आम्हाला समाधनकारक कामगिरी करता आली नाही”, अशी खंत एबीने व्यक्त केली.
A memorable campaign came to a disappointing end, but the RCB players savour the final moments together in the dressing room before they fly out of Dubai.
PS: After about 80 consecutive days, this is our final 9 AM video for the #IPL#PlayBold #Dream11IPL #WeAreChallengers pic.twitter.com/BfZ5FrHWPH
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) November 7, 2020
“तसेच आम्ही आयपीएलच्या पुढील पर्वात चांगली कामगिरी करु. मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. या मोसमात काही निर्णय आमच्या बाजूने गेले नाहीत. आम्ही आमच्याकडून 100 टक्के प्रयत्न केले. या मोसमात आमच्यासाठी काही गोष्टी या सकारात्मक राहिल्या. पुढच्या वेळेस आम्ही याच सकारात्मकतेने मैदानात उतरु. आम्हाला केलेल्या सपोर्टसाठी आणि पाठीशी ठामपणे उभे राहिलात, यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद”, असंही एबीने म्हटलं.
एबीची यंदाच्या मोसमातील कामगिरी
एबीने या मोसमातही त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी केली. काही सामन्यात त्याने निर्णायक भूमिकाही बजावली. बॅटिंगसह फिल्डिंगमध्येही त्याने दम दाखवला. एबीने या मोसमात एकूण 15 सामन्यात 158.74 च्या स्ट्राईक रेटने तसेच 45.40 च्या सरासरीने एकूण 454 धावा केल्या. यामध्ये त्याने 5 अर्धशतकं लगावली. 73 नाबाद ही त्याची या मोसमातील सर्वोच्च धावसंख्या ठरली.
“10 व्या सामन्यानंतर लय गमावली”
“आम्ही साखळी फेरीतील 10 सामन्यात चांगल्या पद्धतीने खेळ करत होतो. आमच्या फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. आम्ही बॅटिंगमध्ये कमी पडलो. आयपीएलच्या 13 व्या मोसमात आमची चांगली सुरुवात राहिली. मात्र त्यानंतरही आम्ही बॅटिंगमध्ये कमी पडलो”, अशी कबुली बंगळुरुचा मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटिचने एलिमिनेटर सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
क्वालिफायर 2 ची लढत
दरम्यान आज (8 नोव्हेंबर) आयपीएलच्या 13 व्या मोसमातील क्वालिफायर 2 (Qualifier 2) सामना खेळण्यात येणार आहे. हा सामना दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात खेळण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी अबुधाबातील शेख झायेद स्टेडियममध्ये 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ अंतिम सामन्यात मुंबईशी भिडणार आहे.
लवकरच आयपीएल 2021-गांगुली
आयपीएलच्या 14 व्या पर्वाला येत्या 4 महिन्यात सुरुवात होईल, असा आशावाद टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसआयचा अध्यक्ष सौरभ गांगुलीने व्यक्त केला आहे. कोरोनावर फेब्रुवारीपर्यंत लस सापडली, तर आयपीएलचं आयोजन भारतात केलं जाईल, किंवा यूएईचा पर्याय आपल्याकडे आहेच, असं गांगुली म्हणाला.
संबंधित बातम्या :
IPL 2020, Qualifier 2 : पृथ्वी शॉचा फ्लॉप शो, Qualifier 2 सामन्यात डच्चू मिळण्याची शक्यता
ipl 2020 eliminator mr 360 ab de villiers apologized to the fans after the ipl 2020 royals challengers bangalore challenge was over