अबुधाबी : शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या एलिमिनेटर सामन्यात (Eliminator 2020) सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर (Royal Challengers Bangalore) 6 विकेट्सने मात केली आहे. हैदराबादने या विजयासह क्वालिफायर 2 सामन्यात धडक मारली आहे. तर बंगळुरुचे आव्हान संपुष्टात आले आहे. बंगळुरुने हैदराबादला विजयासाठी 132 धावांचे आव्हान दिले होते. हैदराबादने हे विजयी आव्हान 19.4 ओव्हरमध्ये 6 विकेट्स राखून पूर्ण केलं. केन विल्यमसन आणि जेसन होल्डर हे दोघे हैदराबादच्या विजयाचे शिल्पकार ठरले. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 65 धावांची विजयी भागीदारी केली. केन विल्यमसनने नाबाद अर्धशतकी खेळी केली. तर जेसन होल्डरने 24 धावांची महत्वाची खेळी केली. बंगळुरुकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर अॅडम झॅम्पा आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी 1 विकेट मिळवला. ipl 2020 Eliminator srh vs rcb live score update today cricket match sunrisers hyderabad vs royal challengers bangalore स्कोअर
That's that from Eliminator.@SunRisers win by 6 wickets. They will face #DelhiCapitals in Qualifier 2 at Abu Dhabi.
Scorecard – https://t.co/XBVtuAjJpn #Dream11IPL #Eliminator pic.twitter.com/HKuxBFEccG
— IndianPremierLeague (@IPL) November 6, 2020
विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या हैदराबादची निराशाजनक सुरुवात झाली. हैदराबादला 2 धावांवर पहिला धक्का लागला. सलामीवीर श्रीवत्स गोस्वामी शून्यावर बाद झाला. यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मनिष पांडेने दुसऱ्या विकेटसाठी 41 धावा जोडल्या. यानंतर वॉर्नरच्या रुपात हैदराबादला दुसरा धक्का लागला. वॉर्नर 17 धावांवर बाद झाला. वॉर्नरनंतर काही षटकानंतर मनिष पांडेही 24 धावांवर बाद झाला. पांडेनंतर प्रियम गर्गला युजवेंद्र चहलने अॅडम झॅम्पाच्या हाती कॅच आऊट केलं. त्यामुळे हैदराबादची 11.5 ओव्हरमध्ये 67-4 अशी स्थिती झाली.
हैदराबाद अडचणीत असताना जेसन होल्डर आणि केन विल्यमसनने 65 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान केन विल्यमसनने अर्धशतक पूर्ण केलं. केनने 44 चेंडूत 2सिक्स आणि 2 फोरसह नाबाद 50 धावा केल्या. तर होल्डरने 20 चेंडूत 3 चौकारांसह 24 धावांची नाबाद खेळी केली.
14th IPL FIFTY for Kane Williamson.
Will he take #SRH home tonight?#Dream11IPL #Eliminator pic.twitter.com/fOjj22Otf3
— IndianPremierLeague (@IPL) November 6, 2020
त्याआधी हैदराबादने टॉस जिंकून बंगळुरुला बॅटिंगसाठी भाग पाडले. बंगळुरुने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 131 धावा केल्या. बंगळुरुकडून ‘मिस्टर 360’ एबी डी व्हीलियर्सने सर्वाधिक 56 धावा केल्या. तर अॅरॉन फिंचने 32 धावा केल्या. मोहम्मद सिराजने नाबाद 10 धावा केल्या. मोईन अली फ्री हिटवर दुर्देवीरित्या रन आऊट झाला. मोईन डायमंड डक बाद झाला. डायमंड डक म्हणजे एकही चेंडू न खेळता बाद होणं.
फिंच, एबी आणि मोहम्मद या तिघांचा अपवाद वगळता बंगळुरुच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. सलामीला आलेला विराट कोहली 6 धावावंर बाद झाला. देवदत्त पडीक्कलने 1 धाव केली. शिवम दुबेला जेसन होल्डरने 8 धावांवर बाद केलं. वॉशिंग्टन सुंदरला थंगारसु नटराजनने अब्दुल समदच्या हाती कॅच आऊट केलं. हैदराबादकडून जेसन होल्डरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर थंगारसु नटराजनने 2 विकेट्स घेत होल्डरला चांगली साथ दिली. शहबाद नदीमने 1 विकेट मिळवला. फिरकीपटू रशीद खानला विकेट घेण्यास यश आले नाही. मात्र त्याने 4 ओव्हरमध्ये 22 धावा देत बंगळुरुच्या फलंदाजीवर नियंत्रण ठेवलं.
हैदराबादने बंगळुरुचा पराभव करत क्वालिफायर 2 मध्ये धडक मारली. त्यामुळे हैदराबाद दिल्लीविरुद्ध 8 नोव्हेंबरला क्वालिफायर 2 सामन्यात आमनेसामने भिडणार आहेत.
[svt-event title=”हैदराबादचा बंगळुरुवर शानदार विजय” date=”06/11/2020,11:13PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs RCB, Eliminator Live : केन विलियम्सनची नाबाद अर्धशतकी खेळी, हैदराबादची बंगळुरुवर 6 विकेट्सने मात, क्वालिफाय 2 सामन्यात दिल्लीविरुद्ध भिडणार https://t.co/8XALSgc1vC #IPL2020 #RCB #SRH #SRHvsRCB #IPL2020 #Eliminator
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2020
[svt-event title=”केन विलियमन्सनचे अर्धशतक” date=”06/11/2020,11:02PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs RCB, Eliminator Live : केन विलियम्सनचे शानदार अर्धशतक https://t.co/8XALSgc1vC #IPL2020 #RCB #SRH #SRHvsRCB #IPL2020 #Eliminator
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2020
[svt-event title=”हैदराबादला विजयासाठी 6 चेंडूत 9 धावांची आवश्यकता, सामना रंगतदार स्थितीत” date=”06/11/2020,11:01PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs RCB, Eliminator Live : हैदराबाद 123-4 (19 Over) केन विलियम्सन-49*, जेसन होल्डर-16*https://t.co/8XALSgc1vC #IPL2020 #RCB #SRH #SRHvsRCB #IPL2020 #Eliminator
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2020
[svt-event title=”हैदराबादला विजयासाठी 2 ओव्हरमध्ये 18 धावांची आवश्यकता” date=”06/11/2020,10:55PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs RCB, Eliminator Live : हैदराबाद 114-4 (18 Over) केन विलियम्सन-45*, जेसन होल्डर-11*https://t.co/8XALSgc1vC #IPL2020 #RCB #SRH #SRHvsRCB #IPL2020 #Eliminator
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2020
[svt-event title=”हैदराबादला विजयासाठी 8 षटकात 64 धावांची आवश्यकता” date=”06/11/2020,10:26PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs RCB, Eliminator Live : हैदराबाद 68-4 (12 Over) केन विलियम्सन-10*, जेसन होल्डर-0*https://t.co/8XALSgc1vC #IPL2020 #RCB #SRH #SRHvsRCB #IPL2020 #Eliminator
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2020
[svt-event title=”हैदराबादला चौथा धक्का” date=”06/11/2020,10:23PM” class=”svt-cd-green” ]
Eliminator. 11.5: WICKET! P Garg (7) is out, c Adam Zampa b Yuzvendra Chahal, 67/4 https://t.co/7skaHU3wgS #SRHvRCB #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) November 6, 2020
[svt-event title=”हैदराबादला तिसरा धक्का” date=”06/11/2020,10:10PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs RCB, Eliminator Live : हैदराबादला तिसरा धक्का, मनिष पांडे आऊट https://t.co/8XALSgc1vC #IPL2020 #RCB #SRH #SRHvsRCB #IPL2020 #Eliminator
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2020
[svt-event title=”हैदराबादला दुसरा धक्का” date=”06/11/2020,9:56PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs RCB, Eliminator Live : हैदराबादला दुसरा धक्का, कर्णधार डेव्हिड वॉर्नर आऊट https://t.co/8XALSgc1vC #IPL2020 #RCB #SRH #SRHvsRCB #IPL2020 #Eliminator
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2020
[svt-event title=”हैदराबादला पहिला धक्का” date=”06/11/2020,9:27PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs RCB, Eliminator Live : हैदराबादला पहिला धक्का,श्रीवत्स गौस्वामी शून्यावर बादhttps://t.co/8XALSgc1vC #IPL2020 #RCB #SRH #SRHvsRCB #IPL2020 #Eliminator
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2020
[svt-event title=”हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात” date=”06/11/2020,9:25PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs RCB, Eliminator Live : हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात, विजयासाठी 132 धावांचे आव्हान https://t.co/8XALSgc1vC #IPL2020 #RCB #SRH #SRHvsRCB #IPL2020 #Eliminator
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2020
[svt-event title=”हैदराबादला विजयासाठी 132 धावांचे आव्हान” date=”06/11/2020,9:11PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs RCB, Eliminator Live : एबी डी व्हीलियर्सची अर्धशतकी खेळी, हैदराबादला विजयासाठी 132 धावांचे आव्हान https://t.co/8XALSgc1vC #IPL2020 #RCB #SRH #SRHvsRCB #IPL2020 #Eliminator
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2020
[svt-event title=”अर्धशतकी खेळीनंतर एबी माघारी” date=”06/11/2020,9:02PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs RCB, Eliminator Live : बंगळुरुला सातवा झटका, एबी डी व्हीलियर्स माघारी https://t.co/8XALSgc1vC #IPL2020 #RCB #SRH #SRHvsRCB #IPL2020 #Eliminator
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2020
[svt-event title=”बंगळुरुला सहावा धक्का” date=”06/11/2020,9:02PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs RCB, Eliminator Live : बंगळुरुला सहावा झटका, वॉशिंग्टन सुंदर माघारी https://t.co/8XALSgc1vC #IPL2020 #RCB #SRH #SRHvsRCB #IPL2020 #Eliminator
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2020
[svt-event title=”एबी डी व्हीलियर्सचे अर्धशतक” date=”06/11/2020,9:01PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs RCB, Eliminator Live : एबी डी व्हीलियर्सचे 39 चेंडूत अर्धशतक https://t.co/8XALSgc1vC #IPL2020 #RCB #SRH #SRHvsRCB #IPL2020 #Eliminator
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2020
[svt-event title=”बंगळुरुची पाचवी विकेट” date=”06/11/2020,9:01PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs RCB, Eliminator Live : बंगळुरुला पाचवा झटका, शिवम दुबे आऊट https://t.co/8XALSgc1vC #IPL2020 #RCB #SRH #SRHvsRCB #IPL2020 #Eliminator
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2020
[svt-event title=”15 ओव्हरनंतर बंगळुरुचा स्कोअर” date=”06/11/2020,8:39PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs RCB, Eliminator Live : बंगळुरु 93-4 (15 Over)
एबी डी व्हीलियर्स-45*, शिवम दुबे-6*https://t.co/8XALSgc1vC #IPL2020 #RCB #SRH #SRHvsRCB #IPL2020 #Eliminator— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2020
[svt-event title=”14 ओव्हरनंतर बंगळुरु” date=”06/11/2020,8:35PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs RCB, Eliminator Live : बंगळुरु 85-4 (14 Over)
एबी डी व्हीलियर्स-38*, शिवम दुबे-5*https://t.co/8XALSgc1vC #IPL2020 #RCB #SRH #SRHvsRCB #IPL2020 #Eliminator— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2020
[svt-event title=”बंगळुरुला चौथा धक्का” date=”06/11/2020,8:22PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs RCB, Eliminator Live : बंगळुरुला चौथा झटका, मोईल अली रन आऊट https://t.co/8XALSgc1vC #IPL2020 #RCB #SRH #SRHvsRCB #IPL2020 #Eliminator
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2020
[svt-event title=”बंगळुरुला तिसरा धक्का” date=”06/11/2020,8:18PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs RCB, Eliminator Live : बंगळुरुला तिसरा धक्का, अॅरॉन फिंच आऊट https://t.co/8XALSgc1vC #IPL2020 #RCB #SRH #SRHvsRCB #IPL2020 #Eliminator
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2020
[svt-event title=”बंगळुरुचा पावर प्लेच्या 6 ओव्हरनंतर स्कोअर” date=”06/11/2020,8:03PM” class=”svt-cd-green” ]
#RCB lose two wickets in the powerplay with 32 runs on the board.
Live – https://t.co/XBVtuAjJpn #Eliminator #Dream11IPL pic.twitter.com/xE81ECCKUF
— IndianPremierLeague (@IPL) November 6, 2020
[svt-event title=”बंगळुरुला दुसरा धक्का” date=”06/11/2020,7:50PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs RCB, Eliminator Live : बंगळुरुला दुसरा धक्का, देवदत्त पडीक्कल आऊट, सलामी जोडी माघारीhttps://t.co/8XALSgc1vC #IPL2020 #RCB #SRH #SRHvsRCB #IPL2020 #Eliminator
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2020
[svt-event title=”बंगळुरुला पहिला धक्का” date=”06/11/2020,7:39PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs RCB, Eliminator Live : बंगळुरुला पहिला धक्का, कर्णधार विराट कोहली आऊटhttps://t.co/8XALSgc1vC #IPL2020 #RCB #SRH #SRHvsRCB #IPL2020 #Eliminator2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2020
[svt-event title=”बंगळुरुच्या बॅटिंगला सुरुवात” date=”06/11/2020,7:36PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, SRH vs RCB, Eliminator Live : बंगळुरुच्या बॅटिंगला सुरुवात, देवदत्त पडीक्कल-विराट कोहली सलामी जोडी मैदानात https://t.co/8XALSgc1vC #IPL2020 #RCB #SRH #SRHvsRCB #IPL2020 #Eliminator2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2020
[svt-event title=”दोन्ही संघांचे अंतिम 11 खेळाडू” date=”06/11/2020,7:30PM” class=”svt-cd-green” ]
Squad Update:#SRH bring in Shreevats Goswami in place of an injured Wriddhiman Saha.
Four changes for #RCB: Aaron Finch, Adam Zampa, Navdeep Saini and Moeen Ali return to the playing XI.#Dream11IPL #SRHvRCB
Here are the line-ups ? pic.twitter.com/o3xxSobNch
— IndianPremierLeague (@IPL) November 6, 2020
[svt-event title=”असा आहे बंगळुरुचा संघ” date=”06/11/2020,7:29PM” class=”svt-cd-green” ]
Eliminator. Royal Challengers Bangalore XI: D Padikkal, A Finch, V Kohli, AB de Villiers, S Dube, M Ali, W Sundar, N Saini, M Siraj, A Zampa, Y Chahal https://t.co/7skaHU3wgS #SRHvRCB #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) November 6, 2020
[svt-event title=”हैदराबाद प्लेइंग इलेव्हन” date=”06/11/2020,7:29PM” class=”svt-cd-green” ]
Eliminator. Sunrisers Hyderabad XI: D Warner, S Goswami, M Pandey, K Williamson, P Garg, A Samad, J Holder, R Khan, S Nadeem, S Sharma, T Natarajan https://t.co/7skaHU3wgS #SRHvRCB #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) November 6, 2020
[svt-event title=”हैदराबादने टॉस जिंकला” date=”06/11/2020,7:28PM” class=”svt-cd-green” ]
#SRH win the toss and elect to bowl first!#SRHvRCB #Dream11IPL pic.twitter.com/UAzZQygnct
— IndianPremierLeague (@IPL) November 6, 2020
A place in the Qualifier 2 will be up for grabs when @Sunrisers take on @RCBTweets in #Dream11IPL Eliminator in Abu Dhabi tonight.
Will SRH make it through or will RCB come out on top?
Preview by @ameyatilak ? https://t.co/udTcQJRTky#SRHvRCB pic.twitter.com/JUVzp22In6
— IndianPremierLeague (@IPL) November 6, 2020
आयपीएलच्या 13 व्या मोसमातील साखळी फेरीत दोन्ही संघ एकूण 2 वेळा आमनेसामने भिडले. यामध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामन्यात विजय मिळवला आहे. 22 सप्टेंबरला खेळण्यात आलेल्या सामन्यात बंगळुरुने बैदराबादवर 10 धावांनी विजय मिळवला होता. तर 31 ऑक्टोबरच्या सामन्यात हैदराबादने बंगळुरुचा 5 विकेट्सने पराभव केला होता.
हैदराबादने साखळी फेरीतील शेवटच्या 3 सामन्यात सलग विजय मिळवत प्ले ऑफमध्ये धडक मारली. हैदराबादने दिल्ली कॅपिटल्स, बंगळुरु आणि मुंबईचा पराभव केला. तर दुसऱ्या बाजूला बंगळुरुने 4 सामन्यात सलग पराभव झाल्यानंतरही प्ले ऑफमध्ये 4 थ्या क्रमांक मिळवण्यात यशस्वी ठरली.
मोसमातील शेवटचा साखळी फेरीतील सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध हैदराबाद (Sunrisers Hyederabad) यांच्यात खेळण्यात आला. हा सामना हैदराबादसाठी ‘करो या मरो’चा होता. या सामन्यात हैदराबादने मुंबईवर 10 विकेट्सने शानदार विजय मिळवत प्ले ऑफमध्ये तिसऱ्या क्रमांकावर धडक मारली.
हैदराबाद आणि बंगळुरु या दोघांसाठी हा सामना करो या मरोचा असणार आहे. या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघांच आव्हान संपुष्टात येईल. तर विजयी संघ क्वालिफायर 2 (Qualifier 2) सामन्यात दिल्लीविरुद्ध भिडेल. हा क्वालिफायर 2 सामना 8 नोव्हेंबरला अबुधाबीत खेळण्यात येणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : विराट कोहली (कर्णधार), एबी डी व्हीलियर्स, पार्थिव पटेल, अॅरॉन फिंच, जोश फिलिप, ख्रिस मॉरिस, मोईन अली, मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद, देवदत्त पडिक्कल, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, डेल स्टेन, पवन नेगी, इसुरु उडाना, शिवम दुबे, उमेश यादव, गुरकीरत सिंह मान, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे आणि अॅडम झॅम्पा.
सनरायजर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, केन विलियम्सन, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराट सिंह, प्रियम गर्ग, ऋद्धिमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, बी संदीप शर्मा, संजय यादव, फॅबियन एलेन, पृथ्वी राज यारा, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टॅनलेक, थंगारसु नटराजन आणि बासिल थम्पी.
संबंधित बातम्या :
IPL 2020 : मुंबई इंडियन्स पाचव्या विजेतेपदासाठी सज्ज, फायनलमध्ये कुणाशी भिडणार?
IPL 2021 | आयपीएल संपण्यापूर्वीच नव्या मोसमाचं नियोजन, 4 महिन्यांनी पुन्हा चौकार-षटकार?
IPL 2020, SRH vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची विजयी सुरुवात, सनरायजर्स हैदराबादवर 10 धावांनी मात
IPL 2020, RCB vs SRH: हैदराबादचा बंगळुरुवर 5 विकेट्सने शानदार विजय
ipl 2020 Eliminator srh vs rcb live score update today cricket match sunrisers hyderabad vs royal challengers bangalore