IPL 2020: विजेत्या मुंबई इंडियन्ससह टॉप 4 संघ मालामाल

आयपीएलच्या अंतिम सामन्यात हिटमॅन रोहित शर्माच्या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर मुंबईने दिल्लीवर 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला.

IPL 2020: विजेत्या मुंबई इंडियन्ससह टॉप 4 संघ मालामाल
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 12:35 AM

दुबई : हिटमॅन रोहित शर्माच्या (Hitman Rohit Sharma) धमाकेदार खेळीच्या जोरावर आणि ईशान किशनच्या (Ishan Kishan) नाबाद 33 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आयपीएलच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह मुंबईने पाचव्यांदा आयपीएलंच विजेतेपद पटकावलं आहे. दिल्लीने मुंबईला विजयासाठी 157 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान मुंबईने 5 विकेट्स गमावून 18.4 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. मुंबईकडून रोहित शर्माने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली. ईशान किशनने नाबाद 33 धावा केल्या. दिल्लीकडून एनरिच नोर्तजेने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर कगिसो रबाडा आणि मार्कस स्टोयनिसने प्रत्येकी 1 विकेट घेतली. (IPL 2020 Final : champions won 20 crores prize money)

आयपीएलमधील या विजयासह मुंबई इंडियन्स संघाने पाचव्यांदा आयपीएल चषकावर स्वतःचं नाव कोरलं. अशी कामगिरी करणारा हा पहिलाच संघ ठरला आहे. या विजयामुळे आयपीएलकडून विजेत्या मुंबईच्या संघाला आयपीएलच चषक आणि 20 कोटी रुपये इतकी रक्कम बक्षीस स्वरुपात देण्यात आली आहे. तसेच उपविजेत्या दिल्लीच्या संघाला 12.5 कोटी रुपये बक्षीस स्वरुपात देण्यात आले. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघांना (सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर) 8 कोटींहून अधिक रक्कम बक्षीस स्वरुपात दिली जाणार आहे.

दरम्यान, सुरुवातीला असे सांगण्यात आले होते की, विजेत्या, उपविजेत्या आणि तिसऱ्या-चौथ्या स्थानावार असणाऱ्या संघांना देण्यात येणाऱ्या रक्कमेत 50 टक्के कपात केली जाणार आहे. IPL 2019 मध्ये विजेत्या संघाला 20 कोटी रुपये इतकी रक्कम बक्षीस स्वरुपात देण्यात आली होती. त्यावेळी मुंबई इंडियन्स संघाने विजेतेपद पटकावलं होतं. यंदा आयपीएलच्या बक्षीसाच्या रक्कमेत 50 टक्के कपात करुन विजेत्या संघाला 10 कोटी रुपये बक्षीस स्वरुपात दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु सामना संपल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याच्याकडे 20 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तसेच गेल्या वर्षी उपविजेत्या संघाला 12.5 कोटी रुपये बक्षीस स्वरुपात देण्यात आले होते, तर यंदा उपविजेत्या संघाला 6.25 कोटी रुपये दिले जाणार आहेत, असे सांगण्यात आले होते. परंतु पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरकडे 12.5 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

या खेळाडूंचा यंदाच्या आयपीएलमध्ये जलवा

1. इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर (प्रभावशाली युवा खेळाडू) : देवदत्त पडिक्कल (RCB) : 10 लाख रुपये बक्षीस 2. गेमचेंजर ऑफ द इयर : के. एल. राहुल (KXIP) :10 लाख रुपये बक्षीस 3. सुपर स्ट्रायकर ऑफ द इयर : कायरन पोलार्ड (MI) : 10 लाख रुपये बक्षीस 4. मोस्ट सिक्सेस ऑफ द सिजन : ईशान किशन (MI) : 10 लाख रुपये बक्षीस 5. पॉवर प्लेअर अवॉर्ड : ट्रेन्ट बोल्ट (MI) : 10 लाख रुपये बक्षीस 6. पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट मिळवणारा गोलंदाज) : कगिसो रबाडा : 10 लाख रुपये बक्षीस 7. ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा करणारा फलंदाज) : के. एल. राहुल : 10 लाख रुपये बक्षीस 8. मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर : जोफ्रा आर्चर (RR) : 10 लाख रुपये बक्षीस 9. फेअर प्ले अवॉर्ड : मुंबई इंडियन्स

संबंधित बातम्या

IPL 2020 Final : स्टॉयनिसला पहिल्याच चेंडूवर बाद करत ट्रेन्ट बोल्टने रचला इतिहास

IPL 2020 Final, MI vs DC : ऑरेंज कॅप मिळवण्याची ‘गब्बर’ संधी हुकली, केएल राहुलला ऑरेंज कॅपचा मान

IPL 2020 Final, MI vs DC : कमी टार्गेट, पॉवरप्लेमध्ये बहारदार सुरुवात ते अनुभवी खेळाडूंची फौज, मुंबईच्या विजयाची पाच कारणे

(IPL 2020 Final : champions won 20 crores prize money)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.