दुबई : हिटमॅन रोहित शर्माच्या (Hitman Rohit Sharma) धमाकेदार खेळीच्या जोरावर आणि ईशान किशनच्या (Ishan Kishan) नाबाद 33 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आयपीएलच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह मुंबईने पाचव्यांदा आयपीएलंच विजेतेपद पटकावलं आहे. दिल्लीने मुंबईला विजयासाठी 157 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान मुंबईने 5 विकेट्स गमावून 18.4 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. या विजयात प्रभावी मारा करत मुंबईला विजयाजवळ घेऊन जाणाऱ्या ट्रेंट बोल्टला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला गेला. या हंगामात बोल्टने 22 विकेट्स मिळवल्या. (IPL 2020 Final : Mi Vs DC Trent bolt get man of the Match)
मुंबईचा जलदगती गोलंदाज ट्रेन्ट बोल्टने मुंबईच्या विजयाचा पाया रचला. दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून मोठा स्कोर उभं करण्याचं उदिष्ट डोळ्यासमोर ठेऊन फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय दिल्लीच्या चांगलाच अंगलट आला. मुंबईचा आक्रमक गोलंदाज ट्रेन्ट बोल्टने सुरुवातीलाच दिल्लीला दोन मोठे धक्के दिले. त्यामुळे मुंबईची जोरदार सुरुवात झाली. बोल्टने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर दिल्लीचा सलामीवीर मार्कस स्टॉयनिसला यष्टीरक्षक क्विंटन डिकॉककरवी झेलबाद केलं.
ट्रेन्टने अंतिम सामन्यात निर्धारित 4 ओव्हर 30 रन्स देऊन महत्त्वाच्या 3 फलंदाजांना माघारी धाडून मुंबईच्या विजयाचा पाया रचला. बोल्टने इनिंगच्या तिसऱ्या आणि वैयक्तिक दुसऱ्या ओव्हरमध्ये अजिंक्य रहाणेला माघारी धाडलं. लेग स्टम्पवर टाकलेला बॉल अजिंक्य समजू शकला नाही. त्याचा देखील झेल डिकॉकने टिपला. सुरुवातीच्या दोन ओव्हरमध्ये 2 विकेट मिळवून बोल्टने दिल्लीला बॅकफूटला ढकललं. दरम्यान ट्रेन्टने घातलेल्या पायावर मुंबईच्या बॅट्समनने कळस चढवला.
(IPL 2020 Final : Mi Vs DC Trent bolt get man of the Match)
संबंधित बातम्या
IPL 2020: विजेत्या संघाला ‘इतकी’ रक्कम मिळणार, पॅट कमिंस आणि मॅक्सवेल अधिक मालामाल