IPL 2020 | जसप्रीत बुमराहमुळे लसिथ मलिंगाची कमतरता भासणार नाही : ब्रेट ली

मलिंगाने वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. | IPL 2020 Former Australia Bowler Brett Lee On Jasprit Bumrah

IPL 2020 | जसप्रीत बुमराहमुळे लसिथ मलिंगाची कमतरता भासणार नाही : ब्रेट ली
Follow us
| Updated on: Sep 19, 2020 | 6:12 PM

यूएई : आयपीएलच्या 13 व्या हंगामाला शनिवारी 19 सप्टेंबरपासून सुरुवात यूएईमध्ये सुरुवात होतेय. या 13 व्या हंगामातील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. चेन्नईचे नेतृत्व महेंद्रसिंह धोनी करणार आहे. तर मुंबईची जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर असणार आहे. वेगवान बोलर जसप्रीत बुमराहच्या उपस्थितीत मुंबईचा स्टार बोलर लसिथ मलिंगाची कमी जाणावणार नाही, असं ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर ब्रेट लीने एका कार्यक्रमात म्हटलंय. लसिथ मलिंगाने वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. ( Former Australia Bowler Brett Lee On Jasprit Bumrah )

ब्रेट ली काय म्हणाला ?

“जसप्रीत बुमराह नव्या आणि जुन्या अशा दोन्ही बॉलने विकेट घेऊ शकतो. बुमराहच्या या वैशिष्ट्यामुळे मुंबईला मलिंगाची कमी जाणवणार नाही, असं ब्रेट ली म्हणाला. मी बुमराहचा सुरुवातीपासून चाहता आहे. बुमराहची बोलिंगची शैली इतर गोलंदाजांपेक्षा हटके आहे. या हटके शैलीमुळेच बुमराहला बॉल दोन्ही बाजूने स्विंग करता येतो. बुमराह नव्या आणि जुन्या बॉलने नक्कीच चमकदार कामगिरी करुन विकेट मिळवून देईल. तसेच बुमराह अखेरच्या ओव्हरमध्ये कमी धावा देत मलिंगाची कमी जाणवू देणार नाही”, असं ब्रेट ली म्हणाला.

मलिंगा मुंबईच्या बोलिंगचा कणा होता. निर्णायक क्षणी मलिंगा विकेट मिळवून द्यायचा. मलिंगाने अनेकदा मुंबईला एकहाती विजय मिळवून दिला आहे. तसेच मलिंगा अखेरच्या ओव्हरमध्ये नेहमीच कमी धावा देत विकेट घ्यायचा. मात्र त्याने वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. मलिंगाच्या जागी न्यूझीलंडचा वेगवान बोलर ट्रेन्ट बोल्टला संधी देण्यात आली आहे.

यंदा चेन्नई विजेतेपद मिळवणार – ब्रेट ली

“महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात या वर्षी चेन्नई विजेतेपद पटकवू शकते, असं ब्रेट ली म्हणाला. चेन्नई टीम फार संतुलित आणि सर्वसर्मावेशक आहे. चेन्नईकडे वॉटसन, धोनी यासारखे मोठी खेळी आणि फटकेबाजी करणारे खेळाडू आहेत. तसेच चेन्नईकडे रवींद्र जडेजा, पियूष चावला यासारखे चांगले फिरकीपटू आहेत. यूएईमध्ये फिरकीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. यासर्व कारणांमुळे चेन्नई विजेतेपद पटकावेल”, असं ब्रेट लीला वाटतं.

मुंबई-चेन्नई आमनेसामने

मुंबई आणि चेन्नई आतापर्यंत एकूण 28 वेळा एकमेकांविरुद्ध भिडले आहेत. या 28 सामन्यांपैकी मुंबईने चेन्नईचा 17 सामन्यात पराभव केला आहे. तर चेन्नईला 11 सामन्यात यश आले आहे. मुंबई आणि चेन्नई आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी संघ आहेत. मुंबईने आतापर्यंत सर्वाधिक 4 वेळा आयपीएल विजेतेपद पटकावलं आहे. तर त्या खालोखाल चेन्नईही 3 वेळा विजेता राहिली आहे.

मुंबईची यूएईमधील कामगिरी निराशाजनक

मुंबई संघाची यूएईमधील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. यूएईत 2014 मध्ये आयपीएलचे 20 साखळी सामने खेळले गेले होते. मुंबईने यूएईत 5 सामने खेळले. यासर्व सामन्यात मुंबईचा पराभव झाला होता. त्यामुळे आता मुंबई कशी कामगिरी करते, याकडे क्रिकेटचाहत्याचं लक्ष असणार आहे. ( Former Australia Bowler Brett Lee On Jasprit Bumrah )

संबंधित बातम्या :

IPL 2020 | रोहितची रणनीती ठरली, धोनीविरुद्धच्या पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्स सज्ज

IPL 2020 | सलामीच्या लढतीत धोनीच्या चेन्नईपेक्षा रोहितची मुंबई भारी, गौतम गंभीरला विश्वास

IPL 2020 : सलामीच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज, रोहित शर्माने उलगडलं रहस्य

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.