IPL 2020 | टीम इंडियाचा माजी खेळाडू इरफान पठाणची ड्रीम टीम, रोहित-विराटला डच्चू, पोलार्ड कर्णधारपदी

या ड्रीम टीममध्ये मुंबई आणि दिल्लीच्या प्रत्येकी 3, पंजाब आणि बंगळुरुच्या प्रत्येकी 2 तर राजस्थानच्या 1 खेळाडूचा समावेश आहे.

IPL 2020 | टीम इंडियाचा माजी खेळाडू इरफान पठाणची ड्रीम टीम, रोहित-विराटला डच्चू, पोलार्ड कर्णधारपदी
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 12:52 PM

मुंबई : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals)विजय मिळवला. यासह मुंबईने पाचव्यांदा विजेतेपद पटकावलं. मुंबईने विजेतेपद पटकावल्यापासून क्रिकेट वर्तुळात प्रत्येक जण आयपीएल बेस्ट प्लेइंग 2020 टीम निवडली जात आहे. टीम इंडियाच्या अनेक आजी माजी खेळाडूंनीही आपली बेस्ट टीम निवडली आहे. यामध्ये वीरेंद्र सेहवागचा (Virendra Sehwag) आणि अजित आगरकरचा (Ajit Agarkar) समावेश आहे. तसेच समालोचक हर्षा भोगले (Harsha Bhogale)यांनीही आपली आयपीएल प्लेईंग इलेव्हन टीम निवडतोय. टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने (Irfan Pathan) आपली आयपीएल प्लेइंग इलेव्हन (IPL BEST PLAYING ELEVEN TEAM 2020) टीम निवडली आहे. इरफानने आपल्या या टीममध्ये बंगळुरु आणि मुंबईचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्माला स्थान दिलं नाहीये. ipl 2020 former team india player Irfan Pathan elect Best Dream Playing XI in IPL 2020 kieron pollard captain

अशी आहे टीम

इरफानने आपल्या संघात 7 भारतीय तर 4 परदेशी खेळाडूंना स्थान दिलं आहे. रोहितने आपल्या नेतृत्वात मुंबईला पाचव्यांदा जेतेपद मिळवून दिलं. मात्र तरीही इरफानने आपल्या संघात रोहितला स्थान दिलेलं नाही. इरफानने आपल्या संघात केएल राहुल (K L Rahul) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) या दोघांना सलामीवीर म्हणून संधी दिली आहे. केएल आणि शिखर आयपीएलच्या 13 व्या मोसमात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर होते.

इरफानने मुंबईच्या सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) तिसऱ्या क्रमांकावर संधी दिली आहे. तसेच सूर्याच्या फलंदाजीचे कौतुक केलं. तर चौथ्या क्रमांकावर बंगळुरुच्या धडाकेबाज फलंदाज एबी डी व्हीलियर्सची (A B De Villiers) निवड केली आहे. इरफानने मुंबईच्या कायरन पोलार्डला  (Kieron Pollard) कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. “पाचव्या क्रमांकासाठी हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) निवड करण्यात आली होती. मात्र हार्दिकने या मोसमात गोलंदाजी केली नाही. त्यामुळे पांड्याऐवजी पोलार्डला पाचव्या क्रमांकासाठी प्राधान्य दिलं. पोलार्ड नेतृत्वासह, गोलंदाजी आणि फिल्डिंगही करतो. म्हणून मी पोलार्डची निवड केली”, असं इरफानने म्हटलं.

सहाव्या क्रमांकावर दिल्लीच्या मार्कस स्टोयनिसला (Marcus Stoinis) संधी दिली आहे. स्टोयनिसने या मोसमात दिल्लीकडून खेळताना अष्टपैलू कामगिरी केली. तसेच सातव्या क्रमांकावर राजस्थानच्या राहुल तेवतियाची (Rahul Tewatia) निवड करण्यात आली. तेवतियाने पंजाबविरुद्धच्या सामन्यात शेल्डॉन कॉट्रेलच्या (Sheldon Cottrell) गोलंदाजीवर एकाच षटकातील 5 चेंडूत 5 सिक्स खेचले. यासह तेवतियाने राजस्थानला विजय मिळवून दिला होता.

फिरकीपटू म्हणून इरफानने बंगळुरुच्या युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) संधी दिली. वेगवान गोलंदाज म्हणून कगिसो रबाडाला (Kagiso Rabada) पंसती देण्यात आली आहे. रबाडाने या मोसमात सर्वाधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तो पर्पल कॅपचा मानकरी ठरला. तसेच दहाव्या क्रमांकावर मुंबईच्या जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) तर अकराव्या क्रमांकावर पंजाबच्या मोहम्मद शमीची (Mohammed Shami) निवड केली आहे.

इरफान पठाणची आयपीएल 2020 टीम : कायरन पोलार्ड (कर्णधार) केएल राहुल, शिखर धवन, सूर्यकुमार यादव, एबी डिव्हिलियर्स, मार्कस स्टॉयनिस, राहुल तेवातिया, युजवेंद्र चहल, कगिसो रबाडा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी.

हर्षा भोगलेची टीम : हर्षा भोगले यांची ड्रिम आयपीएल टीम : के. एल. राहुल, शिखर धवन, सूर्यकुमार यादव, एबी डिव्हिलियर्स (यष्टीरक्षक), कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, जोफ्रा आर्चर, राशिद खान, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि युजवेंद्र चहल.

वीरेंद्र सेहवागची टीम : केएल राहुल, देवदत्त पडीक्कल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली(कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, एबी डी व्हीलियर्स, राशिद खान, युजवेंद्र चहल, कागिसो रबाडा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी, ईशान किशन(12वा खेळाडू)

संबंधित बातम्या :

हर्षा भोगले यांची IPL 2020 मधील ड्रिम टीम तयार, संघात रोहित-विराटसह पर्पल कॅप विजेत्याला स्थान नाही

IPL 2020 | नजफगढचा नवाब वीरेंद्र सेहवागची आयपीएल 2020 मधील ड्रीम टीम, ‘या’ खेळाडूची कर्णधारपदी निवड

IPL 2020 | अजित आगरकरची बेस्ट प्लेईंग इलेव्हन, बुमराह, सूर्यकुमारला स्थान, मात्र रोहित, विराट बाहेर

ipl 2020 former team india player Irfan Pathan elect Best Dream Playing XI in IPL 2020 kieron pollard captain

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.