Rohit Sharma, RCB vs MI: हिटमॅन अवघ्या 10 धावा दूर, आयपीएलमध्ये रोहित शर्मा नवा विक्रम रचणार
आयपीएलच्या 10 व्या सामन्यात बंगळुरु विरुद्ध मुंबई आमनेसामने भिडणार आहेत. | (Opportunity for Rohit Sharma to set a record against Bangalore)
दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील 10 वा सामना आज (28 सप्टेंबर) दुबईत खेळला जाणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) विरुद्ध मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) यांच्यात हा सामना खेळण्यात येणार आहे. या सामन्यात कर्णधार हिटमॅन रोहित शर्माला एक विक्रम करण्याची संधी आहे. या विक्रमापासून रोहित शर्मा अवघ्या 10 धावा दूर आहे. (Opportunity for Rohit Sharma to set a record against Bangalore)
काय आहे रेकॉर्ड ?
आयपीएल स्पर्धेत आज बंगळुरु विरोधात रोहितला 5 हजार धावांचा टप्पा गाठण्याची संधी आहे. रोहितच्या आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत 4 हजार 990 धावा आहेत. त्यामुळे आज बंगळुरु विरोधात 10 धावा केल्यास रोहितला दिग्गजांच्या यादीत स्थान मिळणार आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत 5 हजार धावांचा टप्पा फक्त 2 फलंदाजांनीच पार केला आहे. यामध्ये मिस्टर आयपीएल सुरेश रैना (Suresh Raina) आणि बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांचा समावेश आहे.
विराट कोहलीने एकूण 179 सामने खेळले आहेत. यात त्याने 37.42 च्या सरासरीने 5 हजार 427 धावा केल्या आहेत. विराटने आतापर्यंत एकूण 5 शतकं तर 36 अर्धशतकं लगावली आहेत.
तर चेन्नई सुपर किंग्जच्या सुरेश रैनाने 103 सामने खेळले आहेत. यात रैनाने 5 हजार 386 धावा केल्या आहेत. यामध्ये रैनाने 1 शतक आणि 38 अर्धशतक लगावले आहेत. सुरेश रैना चेन्नईचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू आहे. मात्र त्याने आयपीएलच्या 13 व्या मोसमातून वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली आहे.
हिटमॅनची आयपीएल कारकिर्द
रोहित शर्माने आयपीएलमध्ये आतापर्यंत 190 सामने खेळले आहेत. या 190 सामन्यात रोहित शर्माने 131 च्या स्ट्राईक रेटने 4 हजार 990 धावा केल्या आहेत. या खेळीमध्ये 1 शतक आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे. दरम्यान रोहित शर्माने आयपीएलमधील षटकारांचं द्विशतक पूर्ण केलं आहे. तर रोहितने बॉलिंगनेही कमाल केली आहे. रोहितने आतापर्यंत एकूण 15 विकेट घेतले आहेत. यात एका हॅट्रिकचा समावेश आहे.
बंगळुरु विरुद्ध मुंबई
आयपीएलच्या 10 व्या सामन्यात आज (28 सप्टेंबर) बंगळुरु विरुद्ध मुंबई आमनेसामने भिडणार आहेत. आतापर्यंत हे दोन्ही संघ एकूण 27 वेळा भिडले आहेत. यामध्ये मुंबईचा वरचश्मा राहिला आहे. मुंबईने 27 पैकी 18 सामन्यात बंगळुरुवर मात केली आहे. तर बंगळुरला 9 सामने जिंकण्यास यश आले आहे. यंदाच्या मोसमात दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे.
संबंधित बातम्या :
IPL 2020, KKR vs MI | आयपीएल कारकिर्दीत हिटमॅन रोहित शर्माचं षटकारांचं द्विशतक
(Opportunity for Rohit Sharma to set a record against Bangalore)