18 वर्षांपूर्वी विमान अपघातात आईचा मृत्यू, सावत्र आईने क्रिकेटपटू म्हणून घडवलं; ‘या’ क्रिकेटपटूची IPL Final मध्ये दमदार कामगिरी!

आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबईचा आक्रमक गोलंदाज ट्रेन्ट बोल्टने सुरुवातीलाच दिल्लीला दोन मोठे धक्के दिले. त्यामुळे मुंबईची जोरदार सुरुवात झाली.

18 वर्षांपूर्वी विमान अपघातात आईचा मृत्यू, सावत्र आईने क्रिकेटपटू म्हणून घडवलं; 'या' क्रिकेटपटूची IPL Final मध्ये दमदार कामगिरी!
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 10:47 PM

दुबई : आयपीएलच्या 13 व्या मोसमातील (IPL 2020) अंतिम सामना येथील Dubai International Stadium वर सुरु आहे. विजेतेपद मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये (Delhi Capital) चुरशीचा सामना सुरु आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून मोठा स्कोर उभा करण्याचं उदिष्ट डोळ्यासमोर ठेऊन फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय दिल्लीच्या चांगलाच अंगलट आला. मुंबईचा आक्रमक गोलंदाज ट्रेन्ट बोल्टने सुरुवातीलाच दिल्लीला दोन मोठे धक्के दिले. त्यामुळे मुंबईची जोरदार सुरुवात झाली. ट्रेन्ट बोल्टसह मुंबईच्या आणखी एका गोलंदाजाने पहिल्याच षटकात दिल्लीला जोरदार दणका दिला. यंदाच्या आयपीएलमध्ये दुसराच सामना खेळणाऱ्या जयंत यादवने (Jayant Yadav) त्याच्या स्पेलमधील पहिल्याच षटकात जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या शिखर धवनला बोल्ड केलं.

जयंतला आजच्या सामन्यात पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. परंतु जयंतने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. मुंबईच्या संघात फिरकीपटू राहुल चाहरच्या जागी जयंतला स्थान देण्यात आलं आहे. जयंतच्या निवडीबाबत कर्णधार रोहित म्हणाला की, दिल्लीच्या संघात अनेक डावखुरे फलंदाज आहेत. त्यामुळेच आम्ही जयंतला संघात घेतलं. डावखुरे फलंदाज जयंतच्या गोलंदाजीवर खेळताना अडखळतात. जयंतने त्याची संघातील निवड योग्य असल्याचं सिद्ध केलं. जयंतने धोकादायक ठरू पाहणाऱ्या शिखर धवनला पहिल्याच षटकात बाद केलं.

30 वर्षीय जयंत यादव एक ऑफ स्पिनर असून तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये हरियाणा संघासाठी खेळतो. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळताना त्याने 61 सामन्यात 162 विकेट मिळवल्या आहेत. तर 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याने 49 विकेट मिळवल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमधील जबरदस्त प्रदर्शनाच्या जोरावर 2016 मध्ये त्याची भारतीय कसोटी संघात निवड करण्यात आली. डेब्यू सामन्यात त्याने चार विकेट मिळवल्या तसेच फलंदाजी करताना 62 धावांची खेळी केली. दुसऱ्या सामन्यात त्याने पुन्हा चार विकेट घेत 55 धावा फटकावल्या. जयंत यादव असा पहिला भारतीय खेळाडू आहे, ज्याने कसोटी सामन्यात 9 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक ठोकलं आहे.

जयंतबाबत भारतीय संघाचे पूर्वीचे मॅनेजर अनिरुद्ध चौथरी यांनी सांगितले की, जयंतच्या आई लक्ष्मी यांचं काही वर्षांपूर्वी विमान अपघाता निधन झालं होतं. त्यानंतर जयंतच्या दुसऱ्या आई ज्योती यांनी जयंतला वाढवलं. जयंतचं क्रिकेटर बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यात त्याची आई ज्योती यांचं मोठं योगदान आहे.

संबंधित बातम्या

पर्पल कॅप दिल्लीच्या कागिसो रबाडाकडेच, पाहा आतापर्यंतचे पर्पल कॅप विनर…

IPL 2020: विजेत्या संघाला ‘इतकी’ रक्कम मिळणार, पॅट कमिंस आणि मॅक्सवेल अधिक मालामाल

(IPL 2020 : Jayant Yadav’s real mother dies in plane crash and raised by another woman)

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.