Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020 | संथ खेळीमुळे केदार जाधव सोशल मीडियावर पुन्हा ट्रोल, मीम्सचा पाऊस

केदार जाधवने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात निराशाजनक कामगिरी केली आहे.

IPL 2020 | संथ खेळीमुळे केदार जाधव सोशल मीडियावर पुन्हा ट्रोल, मीम्सचा पाऊस
Follow us
| Updated on: Oct 20, 2020 | 12:56 AM

अबुधाबी : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील 37 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) चेन्नई सुपर किंग्जसवर (Chennai Super Kings) 7 विकेटने मात केली. चेन्नईने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. शेन वॉटसन आणि केदार जाधवचा अपवाद वगळता चेन्नईच्या सर्व फलंदाजांनी चांगली खेळी केली. केदार जाधवने (Kedar Jadhav) 57 च्या स्ट्राईक रेटने 7 चेंडूत अवघ्या 4 धावाच केल्या. केदारला त्याच्या या संथ खेळीमुळे सोशल मीडियावर पुन्हा ट्रोल करण्यात आले. यासह अनेक मीम्सही व्हायरल झाल्या आहेत. IPL 2020 Kedar Jadhav Trolls Again On Social Media Due To Bad Play Memes Viral

केदारची यंदाच्या मोसमातील कामगिरी

केदारने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात निराशाजनक आणि अत्यंत सुमार कामगिरी केली आहे. त्यामुळे केदारला ट्रोल केलं जात आहे. या ट्रोलिंगमुळे केदार ट्विटरवर ट्रेंडमध्ये आला आहे. केदारने यंदाच्या मोसमात आतापर्यंत एकूण 8 सामने खेळले आहेत. या 8 सामन्यात केदारने केवळ 62 धावाच केल्या आहेत. या आकड्यावरुनच केदारने किती सुमार खेळी केली आहे, हे लक्षात येतं.

ट्रोलिंगचे मूळ कारण

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील 21 वा सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्यात खेळला गेला. या सामन्यात चेन्नईचा 10 धावांनी पराभव झाला होता. चेन्नईला विजयासाठी 21 चेंडूत 39 धावांची गरज होती. मात्र अशा निर्णायक क्षणी केदारने अतिशय संथ खेळी केली होती. चेन्नईच्या पराभवासाठी केदारला जबाबदार ठरवण्यात आले. केदारच्या या संथ खेळीनंतर केदारला ट्रोल करण्यात आले होते. केदारची संघातून हकालपट्टी न केल्यास चेन्नईचे समर्थन करणार नाही, अशी तंबीच सोशल मीडियावरुन देण्यात आली होती.

केदारच्या खेळीवर सेहवागची टीका

केदारच्या कामगिरीवर टीम इंडियाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागनेही खरमरीत टीका केली होती. चेन्नईचे काही फलंदाज हे फ्रेंचायजीला सरकारी नोकरी समजतात. चांगली कामगिरी करा अथवा नाही, पगार तर वेळेवर मिळतो”, अशी बोचरी टीका सेहवागने केली होती.

दरम्यान या संथ खेळीमुळे केदारच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली होती. केदारने या मोसमातील पहिल्या 6 सामन्यात अवघ्या 58 धावा केल्या होत्या. या 6 सामन्यात केदारने एकूण 59 चेंडूंचा सामना केला होता. मात्र या 59 चेंडूत केदारला एकही सिक्स लगावता आला नव्हता. त्यामुळे केदारच्या नावावर पहिल्या 6 सामन्यात सर्वाधिक चेंडू खेळूनही सिक्स न लगावण्याचा नकोशा विक्रमाची नोंद झाली होती.

संबंधित बातम्या :

Kedar Jadhav | चेन्नईच्या निराशाजनक कामगिरीनंतर समर्थकांची तंबी, केदार जाधवला संघाबाहेर काढा अन्यथा……

Virendra Sehwag | चेन्नईला सरकारी नोकरी समजलेत, वीरेंद्र सेहवागची केदार जाधव-रवींद्र जडेजावर खरमरीत टीका

IPL 2020, CSK vs RR : ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनीचे भन्नाट ‘द्विशतक’, ठरला आयपीएलमधील पहिला खेळाडू

IPL 2020, CSK vs KKR : कोलकात्याचा ‘सुपर’ विजय, चेन्नईचा 10 धावांनी पराभव

IPL 2020 Kedar Jadhav Trolls Again On Social Media Due To Bad Play Memes Viral

त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय.
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.