IPL 2020 Final, MI vs DC : ऑरेंज कॅप मिळवण्याची ‘गब्बर’ संधी हुकली, केएल राहुलला ऑरेंज कॅपचा मान

केएलने आयपीएलच्या या मोसामातील एकूण 14 सामन्यात 670 धावा केल्या.

IPL 2020 Final, MI vs DC : ऑरेंज कॅप मिळवण्याची 'गब्बर' संधी हुकली, केएल राहुलला ऑरेंज कॅपचा मान
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 12:10 AM

दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020 Final) मोसमातील अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) 5 विकेट्सने मात केली. यासह मुंबईने पाचव्यांदा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. या अंतिम सामन्यासह सर्व चित्र स्पष्ट झालं आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार (KXIP Captain K L Rahul) के एल राहुल हा यंदाच्या मोसमातील ऑरेंज कॅपचा (Orange Cap Holder IPL 2020) मानकरी ठरला आहे. आयपीएलच्या एका मोसामत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप देण्यात येते. पंजाबचं साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलं. त्यामुळे अंतिम सामन्यानंतर हार्दिक पांड्याने केएलच्यावतीने प्रतिनिधिक स्वरुपात ऑरेंज कॅप स्वीकारली. ipl 2020 kings xi punjab captain k l rahul wins the orange cap

केएलला ऑरेंज कॅपसाठी दिल्ली कॅपिटल्सच्या शिखर धवनकडून आव्हान होते. गब्बर शिखरला ऑरेंज कॅपसाठी 67 धावांची आवश्यकता होती. मात्र शिखर धवन मुंबईविरुद्धच्या अंतिम सामन्यात 15 धावांवर बाद झाला. त्यामुळे शिखर ऑरेंज कॅपपासून 52 धावा दूर राहिला. यामुळे केएलला ऑरेंज कॅप आपल्याकडे कायम ठेवण्यास यश आले.

केएलने आयपीएलच्या या मोसामातील एकूण 14 सामन्यात 129.34 च्या स्ट्राईक रेटने आणि 55.83च्या सरासरीने 670 धावा केल्या. यामध्ये त्याने 1 शतक आणि 5 अर्धशतकं लगावली. नाबाद 132 ही त्याची या सर्वोच्च धावसंख्या ठरली. केएलच्या या खेळीचं बक्षिस म्हणून त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बढती देण्यात आली आहे. केएल ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाच्या उप कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.

कगिसो रबाडा पर्पल कॅप विनर

दिल्लीचा आक्रमक वेगवान गोलंदाज पर्पल कॅपचा विजेता ठरला आहे. त्याला आपल्याकडे पर्पल कॅप राखण्यास यश आले. रबाडाने क्वालिफायर 2 मध्ये 4 विकेट्स घेत जसप्रीत बुमराहकडे असलेली पर्पल कॅप हिसकावून घेतली होती. कगिसोने आयपीएलच्या या मोसमातील 17 सामन्यात एकूण 30 विकेट्स घेतल्या आहेत.

संबंधित बातम्या :

आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतचे पर्पल कॅप विनर…

IPL 2020 Final, MI vs DC : हिटमॅन रोहित शर्माची धमाकेदार कामगिरी, मुंबईचा दिल्लीवर 5 विकेट्सने ‘इशान’दार विजय, पाचव्यांदा पटकावलं आयपीएलंच विजेतेपद

ipl 2020 kings xi punjab captain k l rahul wins the orange cap

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.