दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमात आता प्लेऑफसाठीच्या 4 जागांसाठी 7 संघात चुरस पाहायला मिळत आहे. आधी मुंबई इंडियन्सचा डबल सुपर ओव्हरमध्ये पराभव त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सवर 5 विकेट्सने मात करत किंग्जस इलेव्हन पंजाबने (Kings XI Punjab) चांगले कमबॅक केले आहे. या कामगिरीमुळे पंजाबचे प्लेऑफमधील आव्हान कायम राहिले आहे. मात्र पंजाबचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलची (Glenn Maxwell) बॅट तळपताना दिसली नाही. यंदाच्या मोसमात त्याला 10. कोटी 75 लाख रुपये मोजून पंजाबमध्ये समाविष्ठ करण्यात आले आहे. मात्र मॅक्सवेलला पैसावसूल कामगिरी करता आली नाहीये. मॅक्सवेलने 10 सामन्यात केवळ 90 धावाच केल्या आहेत. अशा परिस्थितीतही कर्णधार लोकेश राहूलने 20 ऑक्टोबरच्या दिल्लीविरुद्धच्या विजयानंतर मॅक्सवेलचं कौतुक केलं आहे. IPL 2020 Kings XI Punjab Skipper Lokesh Rahul Praises Glenn Maxwell
पंजाबने दिल्लीवर 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर मॅक्सवेलबद्दल केएलने वक्तव्य केलं. ” ग्लेन मॅक्सवेल चांगला टीममॅन आहे. मॅक्सवेल नेट्समध्ये कसून सराव करतो. सरावादरम्यान तो चांगली फलंदाजी करतोय. त्याचं समर्थन करणं आवश्यक आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्याने काही वेळ मैदानात घालवला, हे पाहून मला चांगलं वाटलं. तो अशाच प्रकारे पुढील सामन्यात दमदार कामगिरी करेल”,असा आशावाद केएलने व्यक्त केला.
आयपीएलच्या 13 व्या मोसमातील 38 वा सामना मगंळवारी 20 ऑक्टोबरला दिल्ली विरुद्ध पंजाब यांच्यात खेळला गेला. या सामन्यात शिखर धवनच्या शतकाच्या जोरावर पंजाबला विजयासाठी 166 धावांचे आव्हान मिळाले. बॅटिंगसाठी आलेल्या पंजाबने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. मात्र टीम संकटात असताना मॅक्सवेलने महत्वाची खेळी केली. मॅक्सवेलने निर्णायक क्षणी 32 धावा केल्या. तसेच मॅक्सवेलन 4 ओव्हर टाकल्या. यात त्याने 7.80 च्या इकॉनॉमी रेटने धावा देत 1 विकेट घेण्याची कामगिरी केली. ग्लेन मॅक्सवेलने आयपीएलमध्ये 2016 मध्ये अखेरचे अर्धशतक केलं होतं. यानंतर त्याला आतापर्यंत अर्धशतकी खेळीही करता आलेली नाही.
पंजाबने या मोसमात आतापर्यंत एकूण 10 सामने खेळले आहेत. पंजाबची या मोसमातील सुरुवात पराभवाने झाली. यानंतर दुसऱ्या सामन्यात पंजाबने बंगळुरुचा पराभव करत मोसमातील पहिला विजय साजरा केला. मात्र यानंतर पंजाबने सलग 5 सामने गमावले. त्यामुळे पंजाबची पिछेहाट झाली. मात्र यानंतरच्या 3 सामन्यात पंजाबने सलग विजय मिळवला. यामुळे पंजाब सध्या पॉइंट्सटेबलमध्ये 4 विजयासह 5व्या क्रमांकावर आहे. दरम्यान पंजाब आपला आगामी सामना 24 ऑक्टोबरला बंगळुरुविरुद्ध खेळणार आहे.
संबंधित बातम्या :
IPL 2020 | चेन्नईला मोठा झटका, ‘हा’ अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर
IPL 2020 Kings XI Punjab Skipper Lokesh Rahul Praises Glenn Maxwell