IPL 2020 | दिनेश कार्तिकने KKR चे कर्णधारपद सोडलं, कर्णधारपदाची धुरा ‘या’ खेळाडूकडे
क्रिकेट क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून कार्तिक आपल्या नेतृत्वाची जबाबदारी सोडणार असल्याती चर्चा होती.
अबूधाबी : आयपीएलचा 13 व्या (IPL 2020) मोसमाचा अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे. प्रत्येक टीमने प्रत्येकी 7 किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळले आहेत. आज (16 ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना खेळण्यात येणार आहे. या सामन्याआधी कोलकाताच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. कोलकाताचा विद्यमान कर्णधार दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) कर्णधारपदाची जबाबदारी इयोन मोर्गनकडे (Eoin Morgan) सोपवली आहे. याबाबतची माहिती कोलकाताने आपल्या ट्विटर हॅंडलवरुन दिली आहे. क्रिकेट क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून कार्तिक आपल्या नेतृत्वाची जबाबदारी सोडणार असल्याती चर्चा होती. ipl 2020 kkr dinesh karthik take over captaincy to Eoin morgan
? "DK and Eoin have worked brilliantly together during this tournament and although Eoin takes over as captain, this is effectively a role swap," says CEO and MD @VenkyMysore #IPL2020 #KKR https://t.co/6dwX45FNg5
— KolkataKnightRiders (@KKRiders) October 16, 2020
कार्तिकने का सोडलं नेतृत्व?
फलंदाजीवर ध्यान केंद्रित करण्यासाठी तसेच संघासाठी आणखी चांगले योगदान देण्याच्या उद्देशाने कार्तिकने नेतृत्वपदाची जबाबदारी इयन मॉर्गनकडे सोपवली आहे, अशी माहिती केकेआरने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. कार्तिकला यंदाच्या मोसमात बॅटिंगने विशेष काही करता आले नाही. यंदाच्या मोसमात कार्तिकने फक्त एकदाच अर्धशतकी खेळी केली. कार्तिकने यंदाच्या मोसमातील 7 सामन्यात 108 धावा केल्या आहेत. दिनेश कार्तिकला कोलकाताच्या नेतृत्वपदाची जबाबदारी 2018 मध्ये देण्यात आली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत कार्तिकने कोलकाताचे एकूण 37 सामन्यात नेतृत्व केलं होतं.
UPDATE: Dinesh Karthik has handed over @KKRiders captaincy to Eoin Morgan. Starting from 2018, Karthik led #KKR in 37 matches. #Dream11IPL pic.twitter.com/JeEAFEAUTD
— IndianPremierLeague (@IPL) October 16, 2020
कार्तिकची आयपीएल कारकिर्द
कार्तिक आयपीएलच्या सुरुवातीपासून म्हणजेच 2008 पासून खेळतोय. कार्तिकने आतापर्यंत एकूण 189 सामने खेळले आहेत. यात त्याने 3 हजार 762 धावा केल्या आहेत. यामध्ये 19 अर्धशतकांचा समावेश आहे. तर 97 नाबाद ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
इयन मॉर्गनची आयपीएल कारकिर्द
इयन मॉर्गनने आयपीएलमध्ये फक्त 59 सामने खेळले आहेत. यात त्याने 1 हजार 29 धावा केल्या आहेत. 66 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
कोलकातासमोर मुंबईचे आव्हान
दरम्यान आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील 32 वा सामना आज मुंबई विरुद्ध कोलकाता यांच्यात खेळला जाणार आहे. याआधी खेळलेल्या सामन्यात मुंबईने कोलकाताला पराभूत केलं होतं. आतापर्यंत हे दोन्ही संघ एकूण 26 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यापैकी 20 सामन्यात मुंबईने कोलकाताला पराभूत केलं आहे. तर कोलकाताला फक्त 6 सामन्यात विजय मिळवला आहे. दरम्यान कोलकाता ताज्या आकडेवारीनुसार पॉइंट्सटेबलमध्ये 8 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
संबंधित बातम्या :
IPL 2020, RR vs DC | राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा बिहू डान्स पाहिलात का ?
ipl 2020 kkr dinesh karthik take over captaincy to Eoin morgan