IPL 2020, KKR vs CSK : अटीतटीच्या सामन्यात चेन्नईची कोलकातावर 6 विकेट्सने मात

72 धावा करणारा ऋतुराज गायकवाड ठरला 'मॅन ऑफ द मॅच'

IPL 2020, KKR vs CSK : अटीतटीच्या सामन्यात चेन्नईची कोलकातावर 6 विकेट्सने  मात
Follow us
| Updated on: Oct 29, 2020 | 11:55 PM

दुबई : शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जसने कोलकाता नाईट रायडर्सवर 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. कोलकाताने चेन्नईला विजयासाठी 173 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान चेन्नईने 6 विकेट्स राखून पूर्ण केलं. रवींद्र जडेजाने शेवटच्या ओव्हरमध्ये 2 सिक्सर खेचत विजय मिळवून दिला. चेन्नईने 4 विकेट्स गमावून 178 धावा केल्या. रवींद्र जडेजाने निर्णायक क्षणी 11 चेंडूत 3 सिक्स आणि 2 फोरच्या मदतीने नाबाद 31 धावांची विजयी खेळी केली. तर ऋतुराज गायकवाडने 72 धावा केल्या. कोलकाताकडून पॅट कमिन्स आणि वरुण चक्रवर्थीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या चेन्नईची चांगली सुरुवात झाली. शेन वॉटसन-ऋतुराज गायकवाड या सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. यानंतर वॉटसन 14 धावांवर बाद झाला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर अंबाती रायुडू आला. ऋतुराज आणि रायुडूने फटकेबाजी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 68 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान ऋतुराजने आपले अर्धशतक पूर्ण केलं. चेन्नईला 118 धावांवर दुसरा झटका लागला. रायुडू 38 रन्सवर आऊट झाला.

रायुडूनंतर कर्णधार धोनी मैदानात आला. धोनीला आजही चांगली कामगिरी करता आली नाही. धोनी 1 धावांवर माघारी परतला. एकाबाजूला विकेट जात होते. मात्र ऋतुराज पाय रोवून मैदानात उभा होता. मात्र ऋतुराज फटका मारण्याच्या नादात क्लीन बोल्ड झाला. ऋतुराजने 53 चेंडूत 72 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 2 सिक्स आणि 6 फोर लगावले. ऋतुराज बाद झाल्याने सामना रंगतदार स्थितीत आला.

यानंतर मैदानात रवींद्र जडेजा आला. निर्णायक क्षणी जडेजाने फटकेबाजी केली. चेन्नईला 6 चेंडूत 10 धावांची आवश्कता होती. मात्र यादरम्यान काही चेंडू डॉट्स करण्यात आले. त्यामुळे चेन्नईला विजयासाठी 2 चेंडूत 7 धावांची गरज होती. मात्र जडेजाने सिक्स खेचला. त्यामुळे सामना बरोबरीत आला. चेन्नईला विजयासाठी 1 चेंडूत 1 धावेची गरज होती. जडेजाने पुन्हा सिक्स खेचत चेन्नईला शानदार विजय मिळवून दिला. कोलकाताकडून पॅट कमिन्स आणि वरुण चक्रवर्थीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

त्याआधी चेन्नईने टॉस जिंकून कोलकाताला बॅटिंगसाठी भाग पाडले. कोलकाताने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 172 धावा केल्या. कोलकाताकडून नितीश राणाने सर्वाधिक 87 धावांची खेळी केली. नितीशने एकूण 61 चेंडूच्या मदतीने 4 सिक्स आणि 10 फोरसह 87 धावा केल्या. तर शुभमन गिलने 26 रन्स केले. सुनील नारायणला आज विशेष करता आले नाही. सुनील 7 रन्सवर बाद झाला.रिंकू सिंहने 11 धावा केल्या. कर्णधार इयोन मॉर्गन 15 धावा केल्या. अखेरच्या काही षटकांमध्ये दिनेश कार्तिकने फटकेबाजी करत 10 चेंडूत महत्वपूर्ण नाबाद 21 धावा केल्या. चेन्नईकडून लुंगी एन्गिडीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर मिचेल सॅंटनर, रवींद्र जडेजा आणि कर्ण शर्माने प्रत्येकी 1 विकेट मिळवली. IPL 2020 KKR vs CSK live Score Update Today Match kolkata Knight Riders Vs Chennai Super Kings Live

[svt-event title=”चेन्नईचा शानदार विजय” date=”29/10/2020,11:37PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईला विजयासाठी 1 चेंडूत 1 धावेची आवश्यकता” date=”29/10/2020,11:36PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईला विजयासाठी 2 चेंडूत 7 धावांची आवश्यकता” date=”29/10/2020,11:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईला विजयासाठी 6 चेंडूत 10 धावांची आवश्यकता” date=”29/10/2020,11:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईला विजयासाठी 12 चेंडूत 30 धावांची आवश्यकता, सामना रंगतदार स्थितीत” date=”29/10/2020,10:57PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ऋतुराज गायकवाड आऊट ” date=”29/10/2020,10:53PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईला विजयासाठी 18 चेंडूत 34 धावांची आवश्यकता” date=”29/10/2020,10:49PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईला विजयासाठी 24 चेंडूत 45 धावांची आवश्यकता” date=”29/10/2020,10:43PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईला तिसरा झटका” date=”29/10/2020,10:37PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”14 ओव्हरनंतर चेन्नई” date=”29/10/2020,10:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईला दुसरा झटका” date=”29/10/2020,10:31PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी” date=”29/10/2020,10:20PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ऋतुराज गायकवाडची सलग दुसरी अर्धशतकी खेळी” date=”29/10/2020,10:16PM” class=”svt-cd-green” ] IPL 2020, KKR vs CSK Live : ऋतुराज गायकवाडचे 37 चेंडूत दमदार अर्धशतक [/svt-event]

[svt-event title=”10 ओव्हरनंतर चेन्नई” date=”29/10/2020,10:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईला पहिला धक्का” date=”29/10/2020,9:56PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सलामी अर्धशतकी भागीदारी” date=”29/10/2020,9:56PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पावर प्लेच्या 6 ओव्हरनंतर चेन्नईचा स्कोअर” date=”29/10/2020,9:48PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई 2 ओव्हरनंतर” date=”29/10/2020,9:31PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई 1 ओव्हरनंतर” date=”29/10/2020,9:26PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईच्या बॅटिंगला सुरुवात” date=”29/10/2020,9:26PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईला विजयासाठी 173 धावांचे आव्हान” date=”29/10/2020,9:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताला पाचवा झटका” date=”29/10/2020,9:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”18 ओव्हरनंतर कोलकाता” date=”29/10/2020,8:56PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नितीश राणा 87 धावांवर बाद” date=”29/10/2020,8:51PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”16 ओव्हरनंतर कोलकाताचा स्कोअर” date=”29/10/2020,8:44PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सामन्याच्या 16 व्या ओव्हरमध्ये कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर 3 चेंडूत सलग 3 सिक्सर” date=”29/10/2020,8:42PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नितीश राणाचे अर्धशतक” date=”29/10/2020,8:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताला तिसरा धक्का” date=”29/10/2020,8:30PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”9 ओव्हरनंतर कोलकाताचा स्कोअर” date=”29/10/2020,8:15PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताला दुसरा धक्का” date=”29/10/2020,8:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताला पहिला धक्का” date=”29/10/2020,8:07PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”7 ओव्हरनंतर कोलकाताचा स्कोअर” date=”29/10/2020,8:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताची शानदार सुरुवात” date=”29/10/2020,8:01PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पावर प्लेच्या 6 ओव्हरनंतर कोलकाता” date=”29/10/2020,7:58PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताचा 5 ओव्हरनंतर स्कोअर” date=”29/10/2020,7:54PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”2 ओव्हर नंतर कोलकाताचा स्कोअर” date=”29/10/2020,7:41PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताच्या बॅटिंगला सुरुवात” date=”29/10/2020,7:41PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”असे आहेत दोन्ही संघ” date=”29/10/2020,7:18PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाता प्लेइंग इलेव्हन” date=”29/10/2020,7:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई प्लेइंग इलेव्हन” date=”29/10/2020,7:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईने टॉस जिंकला” date=”29/10/2020,7:15PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

कोलकात्याविरुद्ध खेळताना चेन्नईला गमावण्यासाठी काहीही उरलेलं नाही. त्यामुळे आक्रमक खेळ करत कोलकात्याची लय बिघडवण्याच्या इराद्याने चेन्नईचा संघ मैदानात उतरेल. तर याउलट चेन्नईला मोठ्या फरकाने नमवून प्ले ऑफमधील आपलं आव्हान जिवंत ठेवण्याच्या निर्धाराने कोलकाता मैदानात उतरेल.

दोन्ही टीमची बलस्थाने आणि कमजोर बाजू-

गेल्या काही मॅचमध्ये कोलकालत्याच्या बॅट्समनचा फॉर्म हा टीमसाठी चिंतेचा विषय बनला आहे. टीमच्या प्रमुख बॅट्समनना मोठी खेळी करण्यात अपयश येत आहे. सलामी जोडी देखील चांगली सुरुवात करुन देण्यात अपयशी ठरत आहे. तर याउलट कोलकात्याचे बॉलर सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. दुसरीकडे चेन्नईच्या टीमने मागील मॅचमध्ये तुफान फॉर्मात असलेल्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुचा आठ विकेट्सने दणदणीत पराभव केल्याने आजच्या मॅचमध्ये त्यांचा इरादा बुलंद असणार आहे.

गुणतालिकेत कोण कुठल्या स्थानावर? कोलकाता 12 सामन्यात 6 मॅच जिंकून 12 गुणांसह 5 व्या स्थानावर आहे. तर आयपीएलच्या इतिहासात प्रथमच चेन्नईचा संघ गुणतालिकेच्या तळाशी आहे. चेन्नई 12 मॅचमध्ये 4 मॅच जिंकून 8 गुणांसह तळाशी म्हणजे 8 व्या स्थानावर आहे.

कोलकाता नाइट रायडर्स : इयोन मॉर्गन (कर्णधार), शुभमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्यूसन, पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती, सुनील नारायण, टॉम बॅंटन, सिद्धेश लाड, कमलेश नागरकोटी, प्रसिद्ध कृष्णा, संदीप वॉरियर, शिवम मावी, रिंकू सिंह, ख्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ आणि निखिल नाईक.

चेन्नई सुपर किंग्स : महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), मुरली विजय, अंबाती रायुडू, फॅफ डु प्लेसिस, शेन वॉटसन, केदार जाधव, रवींद्र जडेजा, लुंगी एन्गिडी, दीपक चहर, पीयूष चावला, इमरान ताहीर, मिचेल सेंटनर, जोश हेझलवुड, शार्दुल ठाकुर, सॅम करन, नारायण जगदीशन, केएम आसिफ, मोनू कुमार, आर साई किशोर, ऋतुराज गायकवाड आणि कर्ण शर्मा.

(IPL 2020 KKR vs CSK live Score Update Today Match kolkata Knight Riders Vs Chennai Super Kings Live)

संबंधित बातम्या

IPL 2020, MI vs RCB : सूर्यकुमार यादवची धमाकेदार खेळी, मुंबईची बंगळुरुवर 5 विकेट्सने मात, प्ले ऑफमध्ये धडक

MS Dhoni | यंदा साखळी फेरीतच गारद, पुढील IPL मध्ये धोनी चेन्नईचं नेतृत्व करणार? CEO म्हणाले…

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.