IPL 2020, KXIP vs KKR : चित्तथरारक सामन्यात कोलकाताची पंजाबवर 2 धावांनी मात

| Updated on: Oct 10, 2020 | 8:29 PM

कोलकाताच्या गोलंदाजांनी पुनरागमन करत पंजाबला 162 धावावंवर रोखलं | (Kolkata Knight Riders Beats Kings Eleven Punjab By 2 run)

IPL 2020, KXIP vs KKR : चित्तथरारक सामन्यात कोलकाताची पंजाबवर 2 धावांनी मात
Follow us on

अबुधाबी : अटीतटीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) किंग्ज इलेव्हन पंजाबचा (Kings Eleven Punjab) अवघ्या 2 धावांनी पराभव केला आहे. पंजाबला शेवटच्या बॉलवर विजयासाठी 7 धावांची आवश्यकता होती. ग्लेन मॅक्सवेलने मोठा फटका मारला. मात्र तो फटका चौकार होता. त्यामुळे पंजाबचा 2 धावांनी पराभव झाला. कोलकाताने पंजाबला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले होते. मात्र पंजाबला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 162 धावाच करता आल्या. पंजाबकडून कर्णधार लोकेश राहूलने सर्वाधिक 74 धावा केल्या. त्याखालोखाल सलामीवर मयंक अग्रवालने 56 धावा केल्या. कोलकाताकडून प्रसिद्ध क्रिष्णाने सर्वाधिक 3 तर सुनील नारायणने 2 विकेट्स घेतल्या. (Kolkata Beats Punjab By 2 run)

दरम्यान त्याआधी कोलकाताने टॉस जिंकला. कोलकाताने बॅटिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आलेल्या कोलकाताची खराब सुरुवात झाली. कोलकाताने 14 धावांवर 2 विकेट्स गमावल्या. यानंतर शुभमन गिल आणि इयन मॉर्गनने कोलकाताचा डाव सावरला. मात्र कोलकाताला 63 धावांवर तिसरा धक्का लागला. यानंतर कर्णधार दिनेश कार्तिक आणि शुभमन गिलने कोलकाताच्या डावाला आकार दिला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी सर्वाधिक 82 धावांची भागीदारी केली. कोलकाताकडून दिनेश कार्तिकने सर्वाधिक 58 धावा केल्या. तर शुभमन गिलने 57 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. पंजाबकडून मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

लाईव्ह स्कोअरकार्ड

[svt-event title=”पंजाबला पाचवा धक्का” date=”10/10/2020,7:23PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पंजाबला चौथा झटका” date=”10/10/2020,7:18PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”जाबला तिसरा झटका, प्रभासिमरन सिंह आऊट, सामना रंगतदार स्थितीत” date=”10/10/2020,7:16PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पंजाबला दुसरा धक्का” date=”10/10/2020,7:08PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पंजाबला विजयासाठी 48 धावांची आवश्यकता” date=”10/10/2020,6:53PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पंजाबला पहिला धक्का” date=”10/10/2020,6:49PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मयंकचे अर्धशतक पूर्ण” date=”10/10/2020,6:40PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”कर्णधार लोकेश राहुलचं अर्धशतक ” date=”10/10/2020,6:39PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पंजाबला विजयासाठी 10 ओव्हरमध्ये 89 धावांची आवश्यकता” date=”10/10/2020,6:27PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पंजाबची दमदार सुरुवात” date=”10/10/2020,6:12PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पावरप्लेच्या पहिल्या 6 ओव्हरनंतर पंजाब” date=”10/10/2020,6:07PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पंजाब 2 ओव्हरनंतर” date=”10/10/2020,5:47PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”लोकेश राहूलला जीवनदान ” date=”10/10/2020,5:44PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मयंक अगरवाल-लोकेश राहूल सलामी जोडी मैदानात” date=”10/10/2020,5:42PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पंजाबच्या डावाला सुरुवात, विजयासाठी 165 धावांचे आव्हान” date=”10/10/2020,5:37PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”कोलकाताच्या 20 ओव्हरमध्ये 164 धावा” date=”10/10/2020,5:38PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताच्या 19 ओव्हरनंतर धावा” date=”10/10/2020,5:16PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”गिल गेला रे ” date=”10/10/2020,5:08PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”दिनेश कार्तिकचे अर्धशतक पूर्ण” date=”10/10/2020,5:05PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”शुभमन गिल-दिनेश कार्तिकची दमदार खेळी” date=”10/10/2020,5:01PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”शुभमन गिलचे अर्धशतक” date=”10/10/2020,4:57PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”कोलकाता 12 ओव्हरनंतर” date=”10/10/2020,4:33PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”कोलकाताला तिसरा धक्का” date=”10/10/2020,4:29PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”गिल-मॉर्गनने कोलकाताचा डाव सावरला” date=”10/10/2020,4:27PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पावरप्लेच्या 6 ओव्हरनंतर कोलकाता” date=”10/10/2020,4:04PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”4 ओव्हरनंतर कोलकाताची धावसंख्या” date=”10/10/2020,3:54PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”राणा रनआऊट” date=”10/10/2020,3:51PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”कोलकाताची 3 ओव्हरनंतर धावसंख्या” date=”10/10/2020,3:47PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”कोलकाताला पहिला धक्का” date=”10/10/2020,3:45PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”कोलकाताच्या बॅटिंगला सुरुवात” date=”10/10/2020,3:34PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”दोन्ही संघाचे अंतिम 11 खेळाडू” date=”10/10/2020,3:16PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”कोलकाताचे अंतिम 11 शिलेदार” date=”10/10/2020,3:15PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पंजाबचे अंतिम 11 खेळाडू” date=”10/10/2020,3:15PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”कोलकाताने टॉस जिंकला” date=”10/10/2020,3:04PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”दुपारी 3 वाजता टॉस होणार” date=”10/10/2020,2:37PM” class=”svt-cd-green” ] अवघ्या काही मिनिटात टॉस उडवला जाणार आहे. [/svt-event]

 

पंजाबचा सलग 4 सामन्यात पराभव झाला आहे. यामुळे पंजाब पॉइंट्सटेबलमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. पंजाबने आतापर्यंत यंदाच्या मोसमात 6 सामने खेळले आहेत. यापैकी फक्त एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर कोलकाताने 5 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. कोलकाता 6 पॉइंट्ससह पॉइंट्सटेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.

पंजाबवर कोलकाता वरचढ

आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत कोलकाता आणि पंजाब एकूण 25 वेळा आमनेसामने भिडले आहेत. या 25 पैकी 17 सामन्यात कोलकाताने विजय मिळवला आहे. तर पंजाबला केवळ 8 सामन्यातच यश मिळाले आहे.

किंग्स इलेवन पंजाब : केएल राहुल (कर्णधार), मयंक अगरवाल, शेल्डन कॉट्रेल, ख्रिस गेल, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान, करुण नायर, जेम्स निशाम, निकोलस पूरन, ईशान पोरेल, अर्शदीप सिंह, मुरुगन अश्विन, कृष्णप्पा गौतम, हरप्रीत बराड, दीपक हुड्डा, ख्रिस जॉर्डन, सरफराज खान, मनदीप सिंह, दर्शन नलकांडे, रवि बिश्नोई, सिमरन सिंह, जगदीश सुचित, ताजिंदर सिंह आणि हार्डस विलोजेन.

कोलकाता नाइट राइडर्स : दिनेश कार्तिक (कर्णधार), आंद्रे रसेल, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लोकी फर्ग्यूसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंह, संदीप वॉरियर, शिवम मावी, शुभमन गिल, सिद्धेश लाड, सुनील नारायण, पॅट कमिन्स, इयन मॉर्गन, वरुण चक्रवर्ती, टॉम बेंटन, राहुल त्रिपाठी, ख्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ आणि निखिल नाईक.

(Kings Eleven Punjab vs Kolkata Knight Riders Live)