‘या’ कारणांमुळे राजस्थानचा दारुण पराभव; जोस बटलरचा संताप

काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने तब्बल पाच वर्षानंतर राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला, मुंबईने राजस्थानचा 57 दारुण पराभव केला.

'या' कारणांमुळे राजस्थानचा दारुण पराभव; जोस बटलरचा संताप
Follow us
| Updated on: Oct 07, 2020 | 2:11 PM

अबुधाबी : आयपीएलमध्ये काल (मंगळवारी) खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) तब्बल पाच वर्षानंतर राजस्थान रॉयल्सवर (Rajasthan Royals) विजय मिळवला. मुंबईने राजस्थानचा 57 धावांनी दारुण पराभव केला. मुंबईने राजस्थानला विजयासाठी 20 षटकांमध्ये 194 धावांचे आव्हान दिले होते, त्यानंतर राजस्थानच्या संघाला अवघ्या 136 धावांमध्ये गुंडाळले.  (IPL 2020 – MI vs RR – it was our top order failure says Jos Buttler)

राजस्थानच्या पहिल्या 4 फलंदाजांपैकी 2 फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. तर कर्णधार स्टीव्ह स्मिथने 6 धावा केल्या. राजस्थानला पूर्ण 20 षटकंदेखील खेळता आली नाहीत. राजस्थानने 18.1 षटकांमध्ये सर्वबाद 136 धावा केल्या. राजस्थानकडून जोस बटलरने सर्वाधिक धडाकेबाज 70 धावा केल्या. तर मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

मुंबईचा हा सलग तिसरा विजय होता तर राजस्थानचा सलग तिसरा पराभव. या सामन्यानंतर राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर म्हणाला की, मागील तीन सामन्यांमध्ये आमचे सुरुवातीचे (टॉप ऑर्डर) फलंदाज चांगलं प्रदर्शन करु शकले नाहीत. काही वेळा आम्ही सुरुवातीच्या पॉवर प्लेमध्ये विकेट गमावल्या. टी-20 क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या स्थितीत कोणताही संघ नेहमी सामना जिंकू शकत नाही.

बटलर म्हणाला की, “आम्ही सुरुवातीलाच विकेट गमावल्या. परंतु मुंबईने गोलंदाजीदेखील उत्तम केली. त्यांच्या गोलंदाजांनी आमच्या फलंदाजांना सावरण्याची संधीच दिली नाही. सुरुवातीलाच विकेट गमावल्यामुळे आमचे फलंदाज दबावाखाली होते. आमचे सुरुवातीचे फलंदाज मुंबईच्या माऱ्यासमोर टिकू शकले नाहीत”.

बटलर स्वतःच्या संघातील सुरुवातीच्या फलंदाजांवर पराभवाचे खापर फोडले, त्याचप्रमाणे मुंबईच्या फंलदाजीचं कौतुकही केलं. बटलर म्हणाला की, सूर्यकुमार यादवने खूप चांगली खेळी केली. आमचा संघ त्याला रोखण्यात अपयशी ठरला. सूर्यकुमारने खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेतला. तो एक जबरदस्त फलंदाज आहे. आमची कोणतीही रणनीती त्याच्यासमोर चालली नाही. या सामन्याचे संपूर्ण श्रेय त्यालाच जातं.

संबंधित बातम्या

एकीकडे आयपीएलची धामधूम, दुसरीकडे महिला टीम इंडियाचा परदेश दौराही ठरला

IPL 2020, MI vs RR : हिटमॅन रोहित शर्माला सुरेश रैनाचा विक्रम मोडण्याची संधी

(IPL 2020 – MI vs RR – it was our top order failure says Jos Buttler)

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.