Jasprit Bumrah | बुम बुम बुमराह ! जसप्रीतची विक्रमी कामगिरी, जबरदस्त कामगिरी करणारा पहिला भारतीय गोलंदाज

जसप्रीत बुमराह यंदाच्या मोसमातआतापर्यंत गोलंदाजीने चमकदार कामगिरी करत आहे.

Jasprit Bumrah | बुम बुम बुमराह ! जसप्रीतची विक्रमी कामगिरी, जबरदस्त कामगिरी करणारा पहिला भारतीय गोलंदाज
Follow us
| Updated on: Nov 06, 2020 | 4:06 PM

दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील क्वालिफायर 1 (Qualifier 1) सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) 57 धावांनी विजय मिळवत अंतिम सामन्यात धडक मारली. दिल्लीच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजीसमोर लोटांगण घातलं. मुंबईकडून यॉर्करकिंग जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. बुमराहने आपल्या 4 ओव्हरमधील स्पेलमध्ये 3.50 च्या इकॉनॉमीने 14 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याने 1 डबल विकेट मेडन (Double Wicket Maiden) टाकली. बुमराहने 4 विकेट्स घेत अफलातून कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहे. ipl 2020 qualifier 1 mi vs dc jaspreet bumrah break bhuvneshwar kumar’s record for most wickets in the ipl

पर्पल कॅप आणि भुवनेश्वरचा रेकॉर्ड ब्रेक

4 विकेट्स घेत बुमराह पर्पल कॅपचा (Purple Cap) मानकरी ठरला. त्याने कगिसो रबाडाला (Kagiso Rabada) पछाडत पर्पल कॅप पटकावली. एका मोसमात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला ‘पर्पल कॅप’ देण्यात येते. बुमराहने या मोसमात एकूण 14 सामन्यात 27 विकेट्स घेतल्या. याआधी आयपीएलमध्ये अशी चमकदार कामगिरी कोणत्याच भारतीय गोलंदाजाला करता आली नव्हती. बुमराहने भुवनेश्वर कुमारचा (Bhuvneshwar Kumar) रेकॉर्ड ब्रेक केला. भुवनेश्वरने याआधी 2016 च्या आयपीएलमध्ये 26 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.

याआधी 2017 मध्ये बुमराहने 26 विकेट्स घेतल्या होत्या. हरभजन सिंहने (Harbhajan Singh) 2013 मध्ये 24 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. तर जयदेव उनाडकटने (Jaydev Unadkat) 2017 मध्ये 24 फलंदाजांना माघारी पाठवले होते.

बुम बुम बुमराह

जसप्रीत यंदाचा मोसम चांगलाच गाजवतोय. जसप्रीतने या मोसमात 5 पेक्षा अधिक वेळा 3 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. जसप्रीतने दिल्लीविरुद्धातील 2 साखळी सामन्यात प्रत्येकी 3 म्हणजेच 2 सामन्यात एकूण 6 विकेट्स घेतल्या. या मोसमात 5 वेळा एका सामन्यात 3 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तसेच जसप्रीतने 2 वेळा 4 विकेट्सही घेतले आहेत. विशेष म्हणजे बुमराहने या मोसमात एकाच ओव्हरमध्ये 7 वेळा 2 विकेट्स घेण्याची अफलातून कामगिरी केली.

चौदाव्यांदा एका सामन्यात 3 पेक्षा अधिक विकेट्स

बुमराहने आयपीएल कारकिर्दीत 14 वेळा एका सामन्यात 3 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. याबाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर लसिथ मलिंगा (Lasith Malinga) आहे. तर अमित मिश्राचा (Amit Mishra) दुसरा क्रमांक लागतो. मलिंगाने 19 तर अमितने 16 वेळेस एकाच सामन्यात 3 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. बुमराह व्यतिरिक्त आशिष नेहरा (Ashish Nehra)  आणि उमेश यादव (Umesh Yadav) यांनीही 14 वेळा अशी कमगिरी केली आहे. बुमराहने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 91 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 7.41 च्या इकॉनॉमी रेटने एकूण 109 विकेट्स घेतल्या आहेत.

मुंबईची अंतिम सामन्यात धडक

मुंबईने दिल्लीला पराभूत करत फायनलमध्ये धडक मारली. मुंबईची फायनलमध्ये पोहचण्याची ही सहावी वेळ ठरली आहे. मुंबईने याआधी 5 पैकी 4 वेळा अंतिम सामन्यात विजय मिळवून विजेतपद पटकावलं आहे. तर एकदाच पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुंबई आता 10 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळणार आहे. क्वालिफायर 2 सामना जिंकणाऱ्या संघाची मुंबईविरुद्ध अंतिम फेरीत गाठ पडणार आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020 : मुंबई इंडियन्स पाचव्या विजेतेपदासाठी सज्ज, फायनलमध्ये कुणाशी भिडणार?

IPL 2021 | आयपीएल संपण्यापूर्वीच नव्या मोसमाचं नियोजन, 4 महिन्यांनी पुन्हा चौकार-षटकार?

IPL 2020, MI vs RCB : यॉर्करकिंग जसप्रीत बुमराहचे आयपीएलमधील 100 विकेट्स पूर्ण

ipl 2020 qualifier 1 mi vs dc jaspreet bumrah break bhuvneshwar kumar’s record for most wickets in the ipl

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.