Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020 : Qualifier सामन्यात कांटे की टक्कर, मुंबई-दिल्लीच्या प्लेईंग 11 मध्ये ‘या’ खेळाडूंना संधी

इंडियन प्रिमियर लीगमध्ये आज मुंबई आणि दिल्लीच्या संघात पहिला क्वालिफायर सामना खेळवला जाणार आहे.

IPL 2020 : Qualifier सामन्यात कांटे की टक्कर, मुंबई-दिल्लीच्या प्लेईंग 11 मध्ये 'या' खेळाडूंना संधी
Follow us
| Updated on: Nov 05, 2020 | 1:45 PM

दुबई : इंडियन प्रिमियर लीगमध्ये (Indian Premier League) आज पहिला क्वालिफायर (Qualifier 1) सामना खेळवला जाणार आहे. अंतिम सामन्याचं तिकीट मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) हे दोन तुल्यबळ संघ भिडणार आहेत.

साखळी स्पर्धेतील 14 पैकी 9 सामने जिंकत मुंबईच्या संघाने गुणतालिकेत पहिलं स्थान पटकावलं आहे. तर 14 पैकी 8 सामने जिंकून दिल्लीच्या संघाने गुणतालिकेत दुसरं स्थान पटकावलं, तसेच दिल्लीचा संघ आयपीएलमध्ये क्वालिफाय होणारा दुसरा संघ ठरला.

साखळी स्पर्धेत लागोपाठ चार सामने हरल्यानंतर दिल्लीचा संघ बॅकफुटवर फेकला गेला होता. परंतु शेवटच्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर विजय मिळवल्याने दिल्लीच्या संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. तर दुसऱ्या बाजूला साखळी स्पर्धेत अखेरच्या सामन्यात मुंबईचा पराभव झाला होता. परंतु त्याने मुंबईच्या गुणतालिकेतील स्थानावर कोणताही परिमाण झाला नाही. उलट या सामन्यात मुंबईने त्यांच्या महत्त्वाच्या खेळाडूंना आराम देऊन क्वालिफायर सामन्यासाठी सज्ज केलं आहे.

शेवटच्या साखळी सामन्यात आराम करणारे जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट आज संघात दिसतील. तसेच शेवटचे दोन सामने हार्दिक पंड्याला विश्रांती देण्यात आली होती. तोदेखील आजच्या सामन्यात संघात पुनरागमन करेल. तर 7 सामन्यात संधी मिळूनही सौरभ तिवारीने फारशी चांगली कामगिरी केलेली नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात त्याला विश्रांती दिली जाऊ शकते.

‘हिटमॅन’ परतल्याने मुंबई मजबूत

मांडीचे स्नायू दुखावल्याने मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएलमध्ये चार सामने खेळला नव्हता. या दुखापतीमुळे रोहितला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघातून वगळण्यात आलं आहे. परंतु रोहित दुखापतीतून बरा झाला असून तो आता पूर्णपणे फिट आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रोहितने संघात कमबॅक केलं. या सामन्यात रोहित मोठी खेळी करु शकला नाही. परंतु रोहितच्या पुनरागमनामुळे मुंबईचा संघ अजून मजबूत झाला आहे.

मुंबई इंडियन्स प्लेईंग XI : रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकॉक, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, राहुल चाहर, जेम्स पॅटिन्सन, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह

दिल्ली कैपिटल्स प्लेईंग XI : पृथ्वी शॉ, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत, मार्कस स्टॉयनिस, आर. अश्विन, कगिसो रबाडा, ऑनरिच नॉर्खिया, अक्षर पटेल, डॅनियल सॅम्स

संबंधित बातम्या

IPL 2020, MI vs DC : रोहितची लय बिघडू शकते, आम्ही त्याचा फायदा उठवू : शिखर धवन

“रोहित शर्माच्या दुखापतीची CBI कडून चौकशी करण्याची मागणी, BCCI वर गंभीर आरोप”

(IPL 2020 : Qualifier 1 MIvsDC playing XI is ready)

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.