अबुधाबी : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील क्वालिफायर 2 सामना(Qualifier 2) आज (8 नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. हा सामना दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात खेळण्यात येणार आहे. ही मॅच अबुधाबीतील शेख झायेद आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या क्वालिफायर 2 सामन्यात दिल्ली आणि हैदराबाद या दोन्ही संघातील ठराविक खेळाडू निर्णायक भूमिका बजावू शकतात. त्यामुळे या खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांचेच लक्ष असणार आहे. ipl 2020 qualifier 2 dc vs srh shikhar dhawan kane williamson and rashid khan These players will important role in the qualifier 2 match
Will #DelhiCapitals revive their fortunes just in time to reach the final? Or will #SRH continue their resurgence and make it to the summit clash?
Preview by @ameyatilak https://t.co/nOwSGSiLPO #Dream11IPL #Qualifier2 pic.twitter.com/l2gsKHZQTh
— IndianPremierLeague (@IPL) November 8, 2020
‘गब्बर’ शिखर धवन (Shikhar Dhawan) या मोसमाच्या सुरुवातीपासूनच चमकदार कामगिरी करतोय. शिखरने सलग 2 सामन्यात शतक ठोकण्याची कामगिरी केली आहे. शिखरने या मोसमातील एकूण 15 सामन्यात 144.23 च्या स्ट्राईक रेटने तसेच 43.75 च्या सरासरीने 525 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. तर नाबाद 106 ही त्याची या मोसमातील सर्वोच्च धावसंख्या आहे.
केन विल्यम्सनच्या (Kane Williamson) कामगिरीवरही सर्वांचेच लक्ष असणार आहे. केनने बंगळुरुविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात निर्णायक क्षणी जेसन होल्डरच्या सोबतीने 65 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली होती. या सामन्यात केनने केनने 44 चेंडूत 2सिक्स आणि 2 फोरसह नाबाद 50 धावा केल्या. केनने या मोसमातील एकूण 11 सामन्यात 250 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 2 अर्धशतकं लगावली आहेत.
फिरकीपटू रशिद खानने (Rashid Khan) या मोसमात आपल्या फिरकीने विरोधी संघातील फलंदाजांना गार केलंय. रशिदने या मोसमात एकूण 15 सामन्यात 19 विकेट्स घेतल्या आहेत. 7 धावा देऊन 3 विकेट्स ही त्याची सर्वोच्च कामगिरी राहिली आहे. त्यामुळे या क्वालिफायर 2 सामन्यात रशिद खान निर्णायक भूमिका बजावू शकतो.
क्वालिफायर 2 सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. त्यामुळे कोणताही संघ जोखीम पत्करु इच्छित नाही. मात्र दिल्ली सलामीच्या जोडीत बदल करण्याची दाट शक्यता आहे. पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) या मोसमात निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यामुळे पृथ्वीला या क्वालिफायर 2 सामन्यातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. पृथ्वीने एकूण 13 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 136.52 च्या स्ट्राईक रेटने आणि 17.53 च्या सरासरीने केवळ 228 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे. 66 ही त्याची या मोसातील सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. पृथ्वीने मागील 8 डावांमध्ये अत्यंत निराशाजनक राहिली. पृथ्वीने मागील 8 सामन्यात अनुक्रमे 0,9,10,7,0,0,4,19 अशा धावा केल्या आहेत. या ढिसाळ कामगिरीमुळे पृथ्वीच्या जागेवर सलामीला मार्कस स्टोयनिसला संधी मिळण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत हैदराबादने एकूण 2 वेळा अंतिम सामन्यात धडक मारली आहे. तर दिल्लीला अजून एकदाही अंतिम सामन्यात पोहचता आले नाही. हैदराबादने 2016 मध्ये अंतिम सामन्यात बंगळुरुचा पराभव करत विजेतेपद पटकावलं होतं. तर 2018 मध्ये हैदराबादला अंतिम सामन्यात चेन्नईकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे जर हैदराबादने क्वलिफायर 2 सामना जिंकला तर फायनलमध्ये पोहचण्याची ही तिसरी वेळ ठरेल. मात्र हा सामना कोण जिंकेल हे पाहणं औत्सुक्यांच ठरणार आहे.
दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), कगिसो रबाडा, मार्कस स्टोयनिस, संदीप लामिछाने, अजिंक्य रहाणे, रवीचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, अॅलेक्स कॅरी, मोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ललित यादव, अवेश खान, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, ऋषभ पंत, हर्षल पटेल, किमो पॉल, अमित मिश्रा, एनरिच नोर्तजे आणि डॅनियल सॅम्स
सनरायजर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, केन विलियम्सन, मनिष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराट सिंह, प्रियम गर्ग, ऋद्धिमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, बी संदीप शर्मा, संजय यादव, फॅबियन अॅलेन, पृथ्वी राज यारा, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टॅनलेक, थंगारसु नटराजन आणि बासिल थम्पी.
संबंधित बातम्या :
IPL 2020, DC vs SRH : दिल्लीच्या विजयाचा रथ सनरायजर्स हैदराबादने रोखला, 15 धावांनी दिल्लीचा पराभव
IPL 2020, SRH vs DC : सनरायजर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सवर 88 धावांनी शानदार विजय
IPL 2020, Qualifier 2 : पृथ्वी शॉचा फ्लॉप शो, Qualifier 2 सामन्यात डच्चू मिळण्याची शक्यता
ipl 2020 qualifier 2 dc vs srh shikhar dhawan kane williamson and rashid khan These players will important role in the qualifier 2 match