IPL 2020, Qualifier 2 : पृथ्वी शॉचा फ्लॉप शो, Qualifier 2 सामन्यात डच्चू मिळण्याची शक्यता
पृथ्वी शॉ ने यंदाच्या मोसमात अगदी ढिसाळ कामगिरी केली आहे.
अबुधाबी : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील क्वालिफायर 2 (Qualifier 2) सामना दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात 8 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. हा क्वालिफायर 2 सामना अबुधाबीतील शेख झायेद आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम सामन्यात पोहचेल. तर पराभूत संघाचं आव्हान संपुष्टात येईल. क्वालिफायर 2 सामन्यासाठी दिल्लीच्या संघात मोठे बदल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ipl 2020 qualifier 2 poor performance of prithvi shaw possibility to be dropped from final playing eleven in qualifier 2 match
क्वालिफायर 2 सामन्यासाठी दिल्लीच्या सलामी जोडीत बदल केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सामन्यात दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) डच्चू मिळण्याची दाट शक्यता आहे.
पृथ्वी चा फ्लॉप शो
पृथ्वी शॉ ने यंदाच्या मोसमात अगदी ढिसाळ कामगिरी केली आहे. पृथ्वीने यंदाच्या मोसमातील एकूण 13 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 136.52 च्या स्ट्राईक रेटने आणि 17.53 च्या सरासरीने केवळ 228 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे. 66 ही त्याची या मोसातील सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. पृथ्वीने मागील 8 डावांमध्ये अत्यंत निराशाजनक राहिली. पृथ्वीने मागील 8 सामन्यात अनुक्रमे 0,9,10,7,0,0,4,19 अशा धावा केल्या आहेत. यामुळे पृथ्वीच्या निराशाजनक कामगिरीनंतरही त्याला वारंवार संधी का दिली जाते, असा प्रश्नही क्रिकेट प्रेमींनी उपस्थित केला आहे.
Prithvi Shaw's horror run in #IPL2020 continues…
His last 8 innings
0910700419#MIvDC #MI #DC #Qualifier1
— Cricbuzz (@cricbuzz) November 5, 2020
सलामीला धवनच्या जोडीला मार्कस स्टोयनिस?
क्वालिफायर 2 च्या या सामन्यात दिल्ली टीम मॅनेजमेंटने पृथ्वीला डच्चू देण्याच्या तयारीत आहे. पृथ्वीच्या जागी मार्कस स्टोयनिसला सलामी करण्याची संधी मिळण्याती शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्लीकडे मार्कसऐवजी सलामीसाठी आणखी कोणताच पर्याय नाही. त्यामुळे स्टोयनिसला सलामीची संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण याआधी अजिंक्य रहाणेही सलामीला येऊन निराशा केली आहे.
स्टॉयनिसच्या सलामीसाठी पॉन्टिंग इच्छुक
मार्क्स स्टॉयनिसने सलामीला खेळावं, अशी इच्छा दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगची आहे. मार्कसने या मोसमात 15 सामन्यात एकूण 314 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 3 धमाकेदार अर्धशतकं लगावली आहेत. तसेच शिखर धवनही सातत्याने चांगली कामगिरी करतोय. शिखरने या मोसमात 2 शतकांसह एकूण 525 धावा केल्या आहेत.
मुंबई इंडियन्सने क्वालिफायर 1 सामन्यात दिल्लीचा पराभव केला. मात्र पॉइंट्सटेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असल्याने दिल्लीकडे फायनल फेरी गाठण्यासाठी आणखी एक संधी आहे. दिल्लीने साखळी फेरीतील सलग 4 सामने गमावल्यानंतर करो या मरोच्या सामन्यात विजय मिळवत प्ले ऑफमध्ये स्थान मिळवलं. तर हैदराबादने सलग 4 सामने जिंकून क्वालिफायर 2 सामन्यात धडक मारली आहे. त्यामुळे या सामन्यात नक्की कोणता संघ वरचढ ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
PHOTO | एकीकडे विजयाचा जल्लोष, दुसरीकडे पुत्रप्राप्तीचा आनंद, हैदराबादचा गोलंदाज बाबा बनला
ipl 2020 qualifier 2 poor performance of prithvi shaw possibility to be dropped from final playing eleven in qualifier 2 match