मुंबई : आयपीएलच्या 13 व्या मोसमाचा नुकताच शेवट झाला आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमी आता पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलच्या 14 व्या मोसमाच्या प्रतीक्षेत आहेत. यावर्षी कोरोनामुळे आयपीएलच्या 13 व्या मोसमाला जवळपास 5 महिन्यांच्या विलंबाने सुरुवात झाली. मात्र आयपीएलचा 14 व्या हंगामाची सुरुवात (IPL 2021) सालाबादप्रमाणे मार्च महिन्यातच होईल, असा आशावाद बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (BCCI President Sourav Ganguly) व्यक्त केला होता. दरम्यान आयपीएलच्या पुढील हंगामात आणखी दोन संघ दिसू शकतात. किंवा पुढील हंगामात एक संघ आणि 2022 च्या आयपीएलमध्ये एक संघ वाढवला जाऊ शकतो. तसेच आयपीएलच्या काही नियमांमध्ये बदलही केले जाणार आहेत. (IPL 2020 : Rahul Dravid supports IPL Teams expansion says It will help young Indian Talent)
दरम्यान सध्या ज्या फ्रेंचायजी आयपीएलमध्ये सहभागी आहेत, त्यांना नव्या दोन संघांचा विचार पटलेला नाही. कारण दोन नवे संघ आले तर त्यांच्याकडील सध्याचे काही खेळाडू बदलले जाऊ शकतात. त्यांनी उभा केलेला संतुलित संघ बिघडू शकतो. शिवाय पुढील आयपीएलला फार वेळ शिल्लक नसल्यामुळे नव्याने टीम उभी करण्यासाठी पुरेसा अवधी नाही. परिणामी काही फ्रेंचायजी नव्या संघांबाबत अनुकूल दिसत नाहीत. दरम्यान, बीसीसीआयच्या नव्या योजनेला एका मोठ्या व्यक्तीचं समर्थन मिळालं आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार ‘द वॉल’ राहूल द्रविड आयपीएलमधील संघांच्या संख्येत वाढ करण्याच्या समर्थनात उभा राहिला आहे. द्रविडच्या मते, “आयपीएलमधील संघांची संख्या वाढली तर देशातील अनेक नव्या प्रतिभावान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळेल”.
नॅशनल क्रिकेट अकॅडमीचा (NCA) अध्यक्ष असलेला राहुल द्रविड म्हणाला की, “देशात खूप प्रतिभावान खेळाडू आहेत ज्यांना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळत नाही. अशा खेळाडूंसाठी आयपीएलचा विस्तार होणं गरजेचं आहे”. न्यूज एजन्सी PTI च्या रिपोर्टनुसार राहुल द्रविड राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचे सह-मालक मनोज बदाले यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनाच्या कार्यक्रमात द्रविड बोलत होता.
द्रविड म्हणाला की, “जर तुम्ही प्रतिभेच्या दृष्टीने पाहात असाल तर मी म्हणेन की आयपीएल आता विस्तारासाठी पूर्णपणे तयार आहे. देशात असे अनेक प्रतिभाशाली खेळाडू आहेत ज्यांना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळत नाहीए. त्यामुळे मला असं वाटतंय की आपण आता आयपीएलच्या विस्ताराचा विचार करायला हवा”. दरम्यान यावेळी बदाले म्हणाले की, “आयपीएलमध्ये 9 व्या संघाचा समावेश करायला हवा. परंतु स्पर्धेची गुणवत्ता कायम राहायला हवी. तसेच स्पर्धेतील अनेक सामने दुपारी खेळवावे लागतील”.
IPL मध्ये मोठे बदल, दोन नवे संघ सहभागी होणार, एका संघात 4 ऐवजी 5 परदेशी खेळाडू खेळणार?
(IPL 2020 : Rahul Dravid supports IPL Teams expansion says It will help young Indian Talent)