IPL 2020, RR vs RCB : रॉबिन उथप्पाची 41 धावांची दमदार खेळी, मानाच्या यादीत स्थान
रॉबिन उथप्पाने बंगळुरुविरुद्ध 22 चेंडूत 7 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने तडाखेदार 41 धावा केल्या.
दुबई : राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) अनुभवी फलंदाज रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या (Royal Challengers Bangalore) सामन्यात सलामीला येत 41 धावांची शानदार खेळी केली. बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात उथप्पाची बॅट तळपली. उथप्पाने 22 चेंडूत 7 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने तडाखेदार 41 धावा केल्या. या खेळीसह उथप्पाने आयपीएलमध्ये अनोखी कामगिरी केली आहे. याखेळीसह उथप्पाचा मानाच्या यादीत समावेश झाला आहे. ipl 2020 rajasthan royals robin uthappa complete 4500 runs in ipl
काय आहे रेकॉर्ड?
उथप्पाने आयपीएल स्पर्धेत 4 हजार 500 धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा उथप्पा हा ओव्हरऑल 9 वा तर 6 वा भारतीय फलंदाज ठरला आहे. बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात उथप्पाला सलामीला येण्याची संधी मिळाली. या संधीचा उथ्प्पाने पुरेपुर फायदा घेतला. उथ्प्पाने बेन स्टोक्ससोबत राजस्थानला चांगली सुरुवात मिळवून दिली. या जोडीने राजस्थानसाठी 50 धावांची सलामी भागीदारी केली.
4500 runs and counting for @robbieuthappa in IPL ??#Dream11IPL pic.twitter.com/Foi8sFDs7x
— IndianPremierLeague (@IPL) October 17, 2020
आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावांच्या बाबतीत बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली अग्रस्थानी आहे. विराटने 186 सामन्यात 5 हजार 716 धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर सुरेश रैना आहे. रैनाने आयपीएलमध्ये 5 हजार 368 धावा केल्या आहेत.
पाचव्यांदा सलामी जोडी बदलली
राजस्थानने आतापर्यंत यंदाच्या मोसमातील 9 सामन्यात पाचव्यांदा सलामी जोडी बदलली आहे. राजस्थानकडून बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात उथप्पा आणि बेन स्टोक्स आले होते. याआधी राजस्थानकडून स्टीव्ह स्मिथ-यशस्वी जयस्वाल, स्टीव्ह स्मिथ-जोस बटलर, बटलर-जयस्वाल आणि बटलर-स्टोक्स या जोडीने सलामी केली आहे.
एबी डीव्हिलयर्सची फटकेबाजी
राजस्थानने बंगळुरुला विजयासाठी 178 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान बंगळुरुने 2 चेंडू राखत पूर्ण केले. बंगळुरुने राजस्थानवर 7 विकेटने दणदणीत विजय मिळवला. एबी डीव्हीलियर्सने शेवटच्या 3 षटकात केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थानने बंगळुरुवर 7 विकेटने मात केली. एबीडी आणि गुरुकिरत मान या जोडीने चौथ्या विकेटसाठी नाबाद 77 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली. एबीने नाबाद 55 धावांची खेळी केली. यात त्याने 6 गगनचुंबी सिक्स लगावले. तर 1 फोरही मारला. या विजयासह बंगळुरुचा हा यंदाच्या मोसमातील 6 वा विजय ठरला. बंगळुरु पॉइंट्सटेबलमध्ये 12 गुणांसह 3 ऱ्या क्रमांकावर आहे.
A game changer and how!#RCB WINS by 7 wickets.#Dream11IPL pic.twitter.com/NFdKHPX1B2
— IndianPremierLeague (@IPL) October 17, 2020
संबंधित बातम्या :
ipl 2020 rajasthan royals robin uthappa complete 4500 runs in ipl