Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020 | DCvKXIP : शिखर धवनकडून विक्रमांचा पाऊस

दिल्ली कॅपिटल्सच्या गब्बर शिखर धवनने सलग दुसऱ्यांदा शतक ठोकलं आहे. धवनने 57 चेंडूत शतकी कामगिरी केली.

IPL 2020 | DCvKXIP : शिखर धवनकडून विक्रमांचा पाऊस
Follow us
| Updated on: Oct 20, 2020 | 11:35 PM

दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमात किंग्जस इलेव्हन पंजाब (Kings Eleven Punjab) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) सामन्यात दिल्लीच्या शिखर धवनचा जलवा पाहायला मिळाला. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करत पंजाबसमोर विजयासाठी 164 धावा उभारल्या. शिखर धवनने सलग दुसऱ्यांदा शतक ठोकलं आहे. (IPL 2020 : Shikhar Dhawan 1st batsman to hits two back to back IPL centuries, Gabbar Completed 5 thousand runs)

धवनने 57 चेंडूत शतकी कामगिरी केली. 61 चेंडूत 106 धावांवर धवन नाबाद राहिला. त्याने या खेळीत 12 चौकार आणि 3 षटकार लगावले. धवनने या खेळीसह आयपीएलमध्ये 5 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा धवन जगातला पाचवा आणि चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे.

आयपीएलमध्ये आतापर्यंत अनेक खेळाडूंनी एकाच मोसमात दोन किंवा त्यापेक्षा जास्त शतकं ठोकली आहेत. परंतु आतापर्यंत कोणत्याही खेळाडूने लागोपाठ दोन शतकं ठोकण्याचा पराक्रम केलेला नाही. विराट कोहलीने तीन सामन्यांमध्ये दोन शतकं ठोकण्याचा विक्रम केला होता. धवन आणि कोहलीव्यतिरिक्त ख्रिस गेल, हाशिम आमला, शेन वॉटसन या तिघांनी आयपीएलमध्ये दोन किंवा त्याहून अधिक शतकं ठोकली आहेत.

शिखर धवनने आयपीएलध्ये 5 हजार धावा पूर्ण करण्याची कामगिरी केली आहे. शिखर धवनने एकूण 169 सामन्यात ही कामगिरी केली आहे. धवनने आयपीएलमध्ये 126 च्या स्ट्राईक रेटने 5 हजार 44 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतकं आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे.

आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 5 फलंदाजांनाच 5 हजार धावांचा टप्पा गाठता आला आहे. यामध्ये बँगलोरचा कर्णधार विराट कोहली, चेन्नईचा सुरेश रैना, मुंबईचा हिटमॅन रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर आणि आता शिखर धवनने अशी कामगिरी केली आहे. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सर्वात कमी डावात 5 हजार धावा पूर्ण करण्याची कामगिरी केली आहे.

लागोपाठ चार अर्थशतकं

धवनने यंदाच्या मोसमात लगोपाठ चार अर्धशतकं ठोकण्याचा पराक्रम केला आहे. धवनपूर्वी हा पराक्रम दिल्लीच्या विरेंद्र सहवाग, राजस्थानकडून जोस बटलर, सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना डेव्हिड वॉर्नर आणि केन विलियमसन, बँगलोरकडून विराट कोहली या खेळाडूंनी केला आहे.

यंदाच्या मोसमातील ‘गब्बर’ कामगिरी

शिखर धवनने यंदाच्या 13 व्या मोसमात धमाकेदार फलंदाजी केली आहे. धवनने यंदाच्या मोसमातील 10 सामन्यात 106 च्या स्ट्राईक रेटने दमदार 465 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

IPL 2020 : ‘आमच्या खेळाडूंचं वय झालंय’, चेन्नई सुपरकिंग्सचे कोच फ्लेमिंग यांची नाराजी

IPL 2020 | MIvKXIP : सचिन तेंडुलकरमुळे मुंबई सुपर ओव्हरमध्ये हरली?

Super Over | मुंबई-पंजाबची सुपर ओव्हरही टाय, सुपर ओव्हरबद्दल रंजक गोष्टी, 47 वेळा पाठलाग करणाऱ्यांचा विजय

IPL 2020, MI vs KXIP, Super Over : ‘डबल धमाल’, दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबचा मुंबईवर दणदणीत विजय

IPL 2020, SRH vs KKR : डेव्हिड वॉर्नरच्या आयपीएलमध्ये वेगवान 5 हजार धावा, विराट कोहलीला पछाडलं

IPL 2020 | ‘दुखापतग्रस्त’ दिल्लीला दिलासा, अमित मिश्राच्या जागी नव्या फिरकीपटूला संधी

(IPL 2020 : Shikhar Dhawan 1st batsman to hits two back to back IPL centuries, Gabbar Completed 5 thousand runs)

वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.
ईडी कार्यालयाबाहेर कॉंग्रेसचं आंदोलन; खासदार वर्षा गायकवाड जखमी
ईडी कार्यालयाबाहेर कॉंग्रेसचं आंदोलन; खासदार वर्षा गायकवाड जखमी.
ATM: प्रवास करताना पैसे संपले तरी आता धावत्या रेल्वेत पैसे काढता येणार
ATM: प्रवास करताना पैसे संपले तरी आता धावत्या रेल्वेत पैसे काढता येणार.
वाघ्याच्या वादात पडळकरांची उडी, पवारांवर टीकास्त्र तर उदयनराजेंबद्दल..
वाघ्याच्या वादात पडळकरांची उडी, पवारांवर टीकास्त्र तर उदयनराजेंबद्दल...
'दारात आलेल्या कुत्र्याला..', भिडेंच्या आडून राजू पाटलांचा टोला कोणाला
'दारात आलेल्या कुत्र्याला..', भिडेंच्या आडून राजू पाटलांचा टोला कोणाला.
निर्धार नाही, पक्ष बचाव मेळावा आहे; संजय शिरसाट यांची टीका
निर्धार नाही, पक्ष बचाव मेळावा आहे; संजय शिरसाट यांची टीका.
अमरावतीचं माझ्यावर कर्ज,फडणवीस विमानतळाच्या लोकार्पणानंतर काय म्हणाले?
अमरावतीचं माझ्यावर कर्ज,फडणवीस विमानतळाच्या लोकार्पणानंतर काय म्हणाले?.
मुलुंडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकाच्या अंगावर फेकला कोळसा
मुलुंडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकाच्या अंगावर फेकला कोळसा.
'या' जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई अन् तरूणांना लग्नासाठी कुणी मुली देईना
'या' जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई अन् तरूणांना लग्नासाठी कुणी मुली देईना.
मी पोलिसांना शरण येतो; निलंबित रणजित कासलेचा नवा व्हिडीओ
मी पोलिसांना शरण येतो; निलंबित रणजित कासलेचा नवा व्हिडीओ.