IPL 2020, SRH vs KXIP : ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये डेव्हिड वॉर्नरच्या नावे अनोख्या ‘फिफ्टी-फिफ्टीचा’ विक्रम
अशी कामगिरी करणारा डेव्हिड वॉर्नर हा आयपीएल स्पर्धेतील पहिलाच फलंदाज ठरला आहे.| (sunrisers hyderabad captain david warner most fifty in ipl)
दुबई : सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) किंग्जस इलेव्हन पंजाबवर (Kings Eleven Punjab) 69 धावांनी मात केली. पंजाबने या विजयासह पॉइंट्सटेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर पंजाबचा हा सलग चौथा पराभव ठरला. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने (David Warner) या विजयात महत्वाची भूमिका बजावली. वॉर्नरने दमदार अर्धशतकी खेळी केली. वॉर्नरने 40 चेंडूच 52 धावा केल्या. या खेळीत त्याने 5 फोर आणि 1 सिक्स लगावला. यासह वॉर्नरने आयपीएलमध्ये अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अशी कामगिरी करणारा डेव्हिड वॉर्नर हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. (David Warner Most Fifty In IPL)
That's that. Natarjan gets the two final wickets and #KXIP are all out for 132.#SRH win 69 runs.
Live – https://t.co/h8xHH5MIq3 #Dream11IPL pic.twitter.com/pADBqsAeuV
— IndianPremierLeague (@IPL) October 8, 2020
काय आहे विक्रम?
वार्नरने आयपीएलमध्ये अर्धशतकांचं अर्धशतक पूर्ण केलं आहे. वॉर्नरने 50 वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याचा विक्रम केला आहे. पंजाबविरुद्धचं हे अर्धशतक वॉर्नरच्या आयपीएल कारकिर्दीतील 46 वे अर्धशतकं ठरलं. याशिवाय वॉर्नरने आतापर्यंत 4 वेळा शतकही ठोकलं आहे.
?????!
This is also @davidwarner31's fifty 50+ score in the IPL! The first player to do so! ?#SRHvKXIP #OrangeArmy #KeepRising pic.twitter.com/hOIkhzyiH1
— SunRisers Hyderabad (@SunRisers) October 8, 2020
सर्वाधिक अर्धशतकांच्या यादीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) कर्णधार विराट कोहली दुसऱ्या (Virat Kohli) क्रमांकावर आहे. विराटने आयपीएलमध्ये आतापर्यंत 40 पेक्षा अधिकवेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. विराटने आयपीएलमध्ये 37 वेळा अर्धशतक लगावले आहे. सोबतच 5 वेळा विराटने शतकही ठोकलं आहे.
विराटनंतर हिटॅमन (Hitman) रोहित शर्मा (Rohit Sharma)आणि मिस्टर आयपीएल (Mister IPL) सुरेश रैना (Suresh Raina) संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोघांनी 39 वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तसेच मिस्टर 360 (Mister 360) म्हणजेच एबी डिव्हिलियर्सने (AB DE Villiers) आयपीएलमध्ये 38 वेळा अशी कामगिरी केली आहे. तसेच गब्बर (Gabbar) शिखर धवननेही (Shikhar Dhawan) 37 वेळा अर्धशतकी किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
सामन्याचा लेखाजोखा
हैदराबादने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. जॉनी बेयरिस्टो-डेव्हिड वॉर्नरने 160 धावांची सलामी भागीदारी केली. वॉर्नरने 52 तर बेयरिस्टोने 97 धावा केल्या. या दोघांनी केलेल्या खेळीच्या जोरावर हैदराबादने पंजाबला विजयासाठी 202 धावांचे आव्हान दिले. पंजाबकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर अर्शदीप सिंहने 2 तसेच मोहम्मद शमीने 1 विकेट घेत बिश्नोईला चांगली साथ दिली.
विजयी आव्हानाचं पाठलाग करायला पंजाब मैदानात आली. फॉर्मात असलेली पंजाबची सलामी जोडी अपयशी ठरली. मयंक अगरवाल आणि लोकेश राहुलला फलंदाजीने दम दाखवता आला नाही. मध्यक्रमात निकोलस पूरनचा अपवाद वगळता सर्व फलंदाजांनी निराशा केली. पंजाबने सर्वबाद 132 धावाच केल्या.
Rashid Khan spins his magic with 3/12.
A game-changing spell that included the wicket of danger-man Nicholas Pooran. This is @rashidkhan_19 at his very best.
??https://t.co/sCNbyEwmgR #Dream11IPL
— IndianPremierLeague (@IPL) October 8, 2020
निकोलस पूरनने एकाकी झुंज दिली. त्याने आधी 17 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पंजाबकडून निकोलसने सर्वाधिक 77 धावा केल्या. हैदराबादकडून रशिद खानने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर खलिल अहमद आणि थंगारसु नटराजन या जोडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेत रशिदला चांगली साथ दिली. तर अभिषेक शर्माने कर्णधार राहुलची महत्वपूर्ण विकेट घेतली. या विजयासह हैदराबादने पॉइंट्सटेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. तर पंजाबचा सलग चौथा पराभव ठरला.
संबंधित बातम्या :
IPL 2020, SRH vs KXIP Live : पंजाबचा सलग चौथा पराभव, सनरायजर्स हैदराबादची 69 धावांनी मात
(David Warner Most Fifty In IPL)