अबूधाबी : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील 32 वा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात खेळला जात आहे. कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना मुंबईला विजयासाठी 149 धावांचे आव्हान दिले आहे. कोलकाताने 5 विकेट गमावून 148 धावा केल्या. टॉस जिंकून कोलकाताने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिनेश कार्तिकने कर्णधारपद सोडल्याने इयोन मॉर्गन (Eoin Morgan) कोलकातानचे नेतृत्व करत आहे. बोलर ट्रेन्ट बोल्टने (Trent Boult) मुंबईला पहिला विकेट मिळवून दिला. त्याने राहुल त्रिपाठीला सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) हाती कॅचआऊट केलं. सूर्यकुमार यादवने राहुल त्रिपाठीचा घेतलेला अप्रतिम कॅच पाहून ट्रेन्ट बोल्टही अवाक झाला. Suryakumar Yadav Take Rahul Tripathi Super Catch Trent Boult’s 50 Wickets Complete In IPL
राहुल त्रिपाठीने पॉइंटच्या दिशेने फटका मारला. मात्र तिथे उभ्या असलेल्या सूर्यकुमार यादवने हवेत झेपावत अफलातून कॅच पकडला. सूर्यकुमारने पकडलेला कॅच पाहून डगआऊट मध्ये बसलेला कोच महिला जयवर्धनेही चकित झाला. दरम्यान या विकेटसह ट्रेन्ट बोल्टचे आयपीएलमध्ये 50 विकेट पूर्ण झाले. यासह ट्रेन्ट बोल्ट हा आयपीएलमध्ये 50 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेणारा 20 वा विदेशी गोलंदाज ठरला आहे. ट्रेन्ट बोल्टने 4 ओव्हरमध्ये 32 धावा देत 1 विकेट घेतली.
Make that 50 wickets in the IPL for @trent_boult ⚡️#Dream11IPL pic.twitter.com/v2MFNKJCEG
— IndianPremierLeague (@IPL) October 16, 2020
कोलकाताने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 148 धावा केल्या. कोलकाताची परिस्थिती 61-5 अशी झाली. यानंतर कर्णधार इयॉन मॉर्गन आणि पॅट कमिन्स या जोडीने कोलकाताचा डाव सावरला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद 87 धावांची नाबाद भागीदारी केली. या दरम्यान पॅटने आपले अर्धशतक पूर्ण केले. पॅटने नाबाद 53 धावा केल्या. यात त्याने 2 सिक्स आणि 5 फोर लगावले. तर इयॉन मॉर्गननेही नाबाद 39 धावा केल्या. मुंबईकडून राहुल चहरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर ट्रेन्ट बोल्ट, नॅथन कुल्टर नाईल आणि जसप्रीत बुमराने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
संबंधित बातम्या :
IPL 2020, MI vs KKR LIVE : पॅट कमिन्सची अर्धशतकी खेळी, मुंबईला विजयासाठी 149 धावांचे आव्हान
Suryakumar Yadav Take Rahul Tripathi Super Catch Trent Boult’s 50 Wickets Complete In IPL