Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020 mid-season transfer | ‘या’ नियमानुसार आयपीएलमध्ये खेळाडूंची अदलाबदल करता येणार

संबंधित खेळाडूला या स्पर्धेत आपल्या मातृ संघाविरोधात खेळता येणार नाही. (IPL 2020 Mid -Season Transfer)

IPL 2020 mid-season transfer | 'या' नियमानुसार आयपीएलमध्ये खेळाडूंची अदलाबदल करता येणार
Follow us
| Updated on: Oct 13, 2020 | 5:24 PM

दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील साखळी फेरीतील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. प्रत्येक संघाने प्रत्येकी 7 सामने खेळले आहेत. मात्र असे असले तरी संबंधित संघातील काही खेळाडूंना आणि पर्यायाने संघालाही दमदार कामिगरी करता आली नाही. तर काही खेळाडूंना अजूनही प्लेईंग ईलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे. एकाबाजूला स्पर्धेतील अर्धा टप्पा पूर्ण झालाय. अशा परिस्थितीत मिड सीजन ट्रान्सफर या प्रकाराची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. हा मिड सीजन ट्रान्सफर नक्की प्रकार काय आहे, हे आपण जाणून घेणार आहोत. (IPL 2020 Mid-Season Transfer)

मिड सीजन ट्रान्सफर

मिड सीजन ट्रान्सफरमुळे संबंधित दोन संघांना अनुमतीद्वारे आपआपसात खेळाडूंची अदलाबदल करता येणार आहे. आजपासून म्हणजेच 13 ऑक्टोबरपासून मिड सीजन ट्रान्सफरला सुरुवात झाली आहे. या मिड सीजन ट्रान्सफर प्रकाराला आयपीएल 2019 पासून सुरुवात झाली होती. गेल्यावर्षी फक्त अनकॅप्ड खेळाडूंची अदलाबदल करता येत होती. मात्र यंदा कॅप्ड खेळाडूंचीही अदलाबदल करता येणार आहे. अनकॅप्ड म्हणजे देशातंर्गत होणाऱ्या स्पर्धेत क्रिकेट खेळणारे खेळाडू. तर कॅप्ड म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळणारे खेळाडू.

मात्र संबंधित दोन्ही संघांना सहजासहजी कोणत्याही खेळाडूंची अदलाबदला करता येणार नाही. त्यासाठीही काही नियम आहेत. ते नियम नक्की काय आहेत, ते आपण जाणून घेऊयात.

अशी आहे नियमावली

आयपीएलच्या साखळी फेरीतील अर्धा टप्पा पूर्ण झाल्यावर खेळाडूंची अदलाबादल करता येईल. अर्धा टप्पा म्हणजे साखळी फेरीतील प्रत्येक संघाचे 7 सामने. या 7 सामन्यांपैकी जो खेळाडू आपल्या संघाकडून फक्त 2 सामनेच खेळला आहे, त्याच खेळाडूची अदलाबदल करता येणार. संबंधित खेळाडूची अदलाबदल करताना त्या खेळाडूची आणि संघाची सहमती असायला हवी. मात्र अंतिम निर्णय हा टीम मॅनेजमेंटचाच असेल. खेळाडूची अदलाबदल केवळ या मोसमासाठीच असणार आहे. मोसम संपल्यानंतर तो खेळाडू पुन्हा आपल्या आधीच्या संघाचेच प्रतिनिधित्व करेल.

समजा खेळाडूची अदलाबदल करण्यात आली, तर आर्थिक व्यवहार हा खेळाडूसोबत न करता परस्पर त्या 2 संघात होणार. करारानुसार त्या खेळाडूसाठी मोजलेल्या रकमेचे 50 टक्के 7 दिवसांत द्यावे लागतील. तर उर्वरित 50 टक्के मोसम संपल्यानंतर द्यायला लागतील.संबंधित खेळाडूला या स्पर्धेत आपल्या मातृ संघाविरोधात खेळता येणार नाही. उदाहरण, समजा जर दिल्ली संघातील अंजिक्य रहाणेचा चेन्नई संघात समावेश करण्यात आला. तर रहाणेला चेन्नई विरुद्ध दिल्ली या सामन्यात खेळता येणार नाही.

या खेळाडूंची होऊ शकते अदलाबदली

मिड सीजन ट्रान्सफरनुसार कोणत्या खेळाडूची अदलाबदल होऊ शकते, हे आपण संघनिहाय पाहूयात.

मुंबई इंडियंन्स : आदित्य तरे, अनुकूल रॉय, मिचेल मॅक्लेनघन, ख्रिस लिन, नॅथन कुल्टर नाईल, सौरभ तिवारी, मोहसिन खान, दिग्विजय देशमुख, प्रिंस बलवंत राय, धवल कुलकर्णी, जयंत यादव, शेरफान रुदरफॉर्ड आणि अनमोलप्रीत सिंह.

चेन्नई सुपर किंग्जस : केएम आसिफ, इमरान ताहिर, कर्ण शर्मा, मिचेल सॅंटनर, एन जगदीशन, मोनू कुमार, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकुर, आर साई किशोर आणि जोश हेझलवुड.

दिल्ली कॅपिटल्स : अजिंक्य रहाणे, किमो पॉल, संदीप लामिछाने, अॅलेक्स कॅरी, आवेश खान, हर्षल पटेल, इशांत शर्मा, ललित यादव, डेनियल सॅम्स, तुषार देशपांडे आणि मोहित शर्मा.

सनरायजर्स हैदराबाद : श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, विजय शंकर, विराट सिंह, बावंका संदीप, फॅबियन एलन, ऋद्धिमान साहा, बिली स्टेनलेक, मोहम्मद नबी, शाहबाज नदीम, बासिल थंपी आणि संजय यादव.

किंग्जस इलेवन पंजाब : दीपक हुड्डा, इशान पोरेल, सिमरन सिंह, ताजिंदर सिंह, मुजीब उर रहमान, कृष्णप्पा गौतम, ख्रिस गेल, हरप्रीत बरार, जगदीश सुचित, मनदीप सिंह, दर्शन नलकांडे आणि हार्डस विल्यन.

कोलकाता नाइट राइडर्स : टॉम बैंटन, निखिल नाइक, अली खान, रिंकू सिंह, संदीप वॉरियर, सिद्देश लाड, क्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ आणि लॉकी फर्ग्यूसन.

राजस्थान रॉयल्स : बेन स्टोक्स, वरुण अॅरोन, कार्तिक त्यागी, ओशाने थॉमस, अनिरुद्ध जोशी, अँड्रयू टाय, आकाश सिंह, अनुज रावत, , मयंक मार्केंडेय, अंकित राजपूत, मनन वोहरा, शशांक सिंह आणि डेव्हिड मिलर.

रॉयल चँलेंजर्स बंगळुरु : जोश फिलिप, ख्रिस मॉरिस, डेल स्टेन, शाहबाज अहमद, पवन देशपांडे, मोइन अली, मोहम्मद सिराज, पार्थिव पटेल, पवन नेगी आणि उमेश यादव.

संबंधित बातम्या :

IPL 2020 | एबी डिव्हीलियर्स-विराट कोहलीचा किर्तीमान, शतकी भागीदारीसह विक्रमाची नोंद 

(IPL 2020 Mid-Season Transfer)

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.