IPL 2020 | कोलकाता आयपीएलचं 13 वे जेतेपद पटकावणार का?, किंग खानचं गंमतीशीर उत्तर
कोलकाता पॉइंट्सटेबलमध्ये 12 गुणांसह 5 व्या क्रमांकावर आहे.
मुंबई : आयपीएलचं 13 वे (IPL 2020) मोसम चांगलेच रंगात आले आहे. प्ले ऑफमध्ये जागा बनवण्यासाठी चांगलीच चढाओढ पाहायला मिळतेय. कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders ) या मोसमात चढ उतार पाहायला लागले आहेत. कोलकाता प्ले ऑफच्या चौथ्या क्रमांकासाठी शर्यतीत आहे. शाहरुख खान हा कोलकाता संघाचा मालक आहे. कोलकाताच्या प्रत्येक सामन्याला शाहरुख हजर असतो. कोलकाता यंदा आयपीएलचं जेतेपद पटकवणार का, असा प्रश्न शाहरुखला ट्विटरवरुन विचारण्यात आला, यावर त्याने गंमतीशीर उत्तर दिलं. IPL 2020 Will Kolkata Knight Riders Win The 13th IPL Title Shah Rukh Khan’s Funny Answer
शाहरुखने काय उत्तर दिलं?
यावेळेस कोलकाता आयपीएल जेतेपद पटकावणार का, असा प्रश्न एका युझर्सने शाहरुख खानला ट्विटमध्ये टॅग करत विचारला. कोलकाता क्रिकेट नाही, तर चाहत्यांच्या भावनांशी खेळत आहे, असंही युझर्सने ट्विटमध्ये म्हटलं आहे. यावरुन शाहरुखने #AskSRK कार्यक्रमातून त्याच्या चाहत्याला उत्तर दिलं आहे. “अशा परिस्थितीत माझी काय अवस्था असेल, याचा अंदाज लाव, असं गंमतीशीर उत्तर शाहरुखने दिलं.
Arre meri socho….mere dil pe kya beet rahi hai!!!! https://t.co/dzZYgWMXHO
— Shah Rukh Khan (@iamsrk) October 27, 2020
शाहरुख खान ‘मन्नत’ विकताय का?
#AskSRK या हॅशटॅगद्वारे युजर्सच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. तु मन्नत विकणार आहेस का, असा सवाल ट्विटद्वारे केला. या प्रश्नावर शाहरुखने भावनिक उत्तर दिलं. शाहरुखने लिहलं की, “भाई मन्नत विकली जात नाही. डोके टेकवून मागितली जाते. लक्षात ठेवाल तर आयुष्यात काहीतरी मिळू शकेल.”
Bhai Mannat bikti nahi sar jhuka kar maangi jaati hai….yaad rakhoge toh life mein kuch paa sakogay. https://t.co/dh3gJTVnOu
— Shah Rukh Khan (@iamsrk) October 27, 2020
दरम्यान कोलतकाता या मोसमातील आगामी 2 सामने चेन्नई सुपर किंग्जस आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार आहे. प्ले ऑफमधील शर्यतीत कायम राहण्यासाठी कोलकाताला हे दोन्ही सामने जिंकणं आवश्यक असणार आहे. कोलकाता पॉइंट्सटेबलमध्ये 12 गुणांसह 5 व्या क्रमांकावर आहे.
संबंधित बातम्या :
‘मन्नत’ बंगला विकणार का? चाहत्याच्या प्रश्नावर किंग खानचं जबरदस्त उत्तर
शाहरुख खानसोबत सामना पाहण्यासाठी बसलेला हा तरुण कोण?
IPL 2020 Will Kolkata Knight Riders Win The 13th IPL Title Shah Rukh Khan’s Funny Answer