IPL 2020 : वेगापेक्षा वेगवान, चित्यासारखा चपळ, फिल्डिंगचा बादशाहा जॉन्टी ऱ्होड्सचा भन्नाट झेल

जॉन्टी ऱ्होड्स फिल्डिंग कोच म्हणून काम पाहात आहे. IPL मध्ये तो किंग्ज इलेव्हन पंजाबचा कोच आहे. (XIP fielding coach johnty rhods catch video)

IPL 2020 : वेगापेक्षा वेगवान, चित्यासारखा चपळ, फिल्डिंगचा बादशाहा जॉन्टी ऱ्होड्सचा भन्नाट झेल
Follow us
| Updated on: Sep 16, 2020 | 8:06 PM

IPL 2020 यूएई : दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॉन्टी ऱ्होड्स त्याच्या हटके फिल्डिंगसाठी ओळखला जातो. जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून जॉन्टी ऱ्होड्सचं नाव घेतलं जातं. 51 वर्षीय जॉन्टीने 17 वर्षापूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सध्या जॉन्टी ऱ्होड्स फिल्डिंग कोच म्हणून काम पाहात आहे. आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा फ्लिडिंग कोचची धुरा जॉन्टीकडे आहे. (XIP fielding coach johnty rhods catch video)

जॉन्टी ऱ्होड्सला फिल्डिंगचा बादशाह का म्हटलं जातं, हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं. जॉन्टी ऱ्होड्सचा हवेत उडी घेत हटके कॅच घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर लाईक्स मिळवत आहे. या कॅचचा व्हिडिओ किंग्ज इलेव्हन पंजाब आणि आयसीसीने आपल्या ट्विटर हॅंडलवरुन शेअर केला आहे.

आयपीएलच्या 13व्या मोसमात जॉन्टी ऱ्होड्सकडे किंग्ज इलव्हेन पंजाबच्या फिल्डिंग कोचची जबाबदारी आहे. टीमच्या खेळाडूंना कॅच कशाप्रकारे घ्यायची, याचं प्रात्यक्षिक जॉन्टी ऱ्होड्स दाखवताना पाहायला मिळतो. आयीसीसीने ट्विट केलेल्या या व्हिडिओत जॉन्टी ऱ्होड्स कॅच घेताना दिसत आहेत.

17 वर्षांपूर्वी जॉन्टी ऱ्होड्सने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

जॉन्टी ऱ्होड्सने 1992 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानच्या इंझमाम उल हकला हवेत उडी घेत रनआऊट केलं होतं. हा व्हिडिओ आजही मोठ्या प्रमाणावर पाहिला जातो.

जॉन्टी ऱ्होड्सची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

  •  1992 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण.
  •  दक्षिण आफ्रिकेकडून 245 एकदिवसीय आणि 52 कसोटी सामन्यात प्रतिनिधित्व.
  •  आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाच्या फिल्डिंग कोचची धुरा
  •  सध्या किंग्ज इलेव्हन पंजाबच्या फिल्डिंग कोचची जबाबदारी

आयपीएलचा 13 वा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आयपीएल स्पर्धेसाठी विविध टीमचे चाहते उत्सुक आहेत. खेळाडू आणि टीम मॅनेजमेंटदेखील उत्सुक आहेत. स्पर्धेच्यादृष्टीने प्रत्येक संघ जोरदार सराव करत आहेत. संघाचे प्रशिक्षक खेळाडूंना फिल्डिंग, बॅटिंग आणि बॉलिंगचे धडे देत आहेत.

आयपीएल 2020

आयपीएलच्या 13व्या मोसमाला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर अशा एकूण 51 दिवस चालणार आहे. कोरोना परिस्थितीमुळे यंदाच्या स्पर्धेचं आयोजन यूएई (संयुक्त अरब अमिराती ) येथे करण्यात आलं आहे. काही दिवसांआधीच आयपीएलचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. यंदाच्या मोसमातील सलामीचा सामना गतविजेत्या आणि उपविजेत्या ठरलेल्या मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यात होणार आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020 चे वेळापत्रक अखेर जाहीर, मुंबई इंडियन्स ‘या’ संघासोबत सलामीला भिडणार  

IPL 2020: नव्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सची जर्सी स्कायडायव्हरकडून लॉन्च, व्हिडीओ व्हायरल

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.