IPL 2021 : आयपीएल खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर मोठं संकट, होऊ शकतो 5 वर्षांचा तुरुंगवास!

आयपीएल (IPL) खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर सध्या मोठं संकट ओढावलं आहे. कोरोनाची दुसरी लाट जगभरात आलेली असताना ऑस्ट्रेलियाने अतिशय सावध पण कडक पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी परतणं अवघड होणार आहे. (Big crisis for Australian players playing in IPL,)

IPL 2021 : आयपीएल खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर मोठं संकट, होऊ शकतो 5 वर्षांचा तुरुंगवास!
Follow us
| Updated on: May 01, 2021 | 7:18 AM

नवी दिल्ली : आयपीएल (IPL) खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर सध्या मोठं संकट ओढावलं आहे. कोरोनाची दुसरी लाट जगभरात आलेली असताना ऑस्ट्रेलियाने अतिशय सावध पण कडक पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी परतणं अवघड होणार आहे. ऑस्ट्रेलियन मीडिया रिपोर्टनुसार मायदेशी परतल्यानंतर आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं जाईल. तसंच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दंडही घेतला जाईल. एवढ्यावरच हे प्रकरण थांबणार नाही तर त्यांना जेलही होऊ शकते. (IPL 2021 Big crisis for Australian players playing in IPL, could lead to 5 years jail)

कोरोनाचं रौद्र रुप, ऑस्ट्रेलियाची सावध पावलं

सगळ्या जगात कोरोनाने थैमान घातलंय. एक लाट संपत नाहीय तोपर्यंत दुसऱ्या लाटेचा इशारा, गंभीर होत चाललेली परिस्थिती, नागरिकांमधली भीती या सगळ्याने जगभरातील लोक भयभीत झाले आहेत. सगळ्या देशांनी साधव पावले टाकायला सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन सरकारने देखील कोरोनाला लांब ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक कडक निर्बंध लादले आहेत.

सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या रिपोर्टमध्ये काय…?

सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या रिपोर्टनुसार, कोरोनाच्या या भयाण परिस्थितीत सरकारी नियम पायदळी तुडवून भारतातून ज्यांनी कुणी ऑस्ट्रेलियामध्ये प्रवेश केला आहे त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबत तसंच दंड आकारण्याचा ऑस्ट्रेलियन सरकार विचार करत आहे.

ऑस्ट्रेलियन खेळाडू संकटात

कोरोनाच्या या महाभयानक काळात भारतात आयपीएलचं 14 वं पर्व सुरु आहे. या पर्वात विविध देशांतील खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. ऑस्ट्रेलियाचे 14 खेळाडू सद्यस्थितीत आयपीएल खेळत आहेत. यामध्ये डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्हन स्मिथ, पॅठ कमिन्स यांचा समावेश आहे.

त्याचसोबत आयपीएलच्या विविध फ्रेंचायजीमधला ऑस्ट्रेलियन कोचिंग तसंच सपोर्ट स्टाफ, टीव्ही कॉमेंटेटर यांचाही समावेश आहे. यामध्ये दिग्गज माजी खेळाडू रिकी पाँटिंग, ब्रेट ली, मॅथ्यू हेडन या महत्त्वाचा क्रिकेटर्सचा समावेश आहे.

5 वर्षांचा तुरुंगवास, SMH च्या रिपोर्टमध्ये काय?

SMH च्या रिपोर्टनुसार तसंच नाईन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, सध्याच्या परिस्थितीत भारतातून जो कुणी ऑस्ट्रेलियात येईल त्याला ऑस्ट्रेलियन सरकार गुन्हेगार म्हणून त्याच्याकडून अधिकाधिक 66 हजार डॉलरचा दंड आकारेल तसंच एवढ्यावरच हे थांबणार नाही तर त्याला 5 वर्षांचा तुरुंगवासही होऊ शकतो.

ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचा खेळाडूंना दणका

ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी आयपीएल खेळाडूंना याआधीच दणका दिलाय. खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी भारता गेले आहेत. म्हणजेच ते त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी भारतात गेले आहेत. त्यामुळे त्यांना स्वत:च्या मायदेशी परतावं लागेल, असं स्पष्टीकरण देत मुंबईकडून खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूची प्रायव्हेट विमानाची मागणी त्यांनी फेटाळून लावली होती.

(IPL 2021 Big crisis for Australian players playing in IPL, could lead to 5 years jail)

हे ही वाचा :

अश्विनच्या कुटुंबावर ‘नको ती वेळ’, परिवारातल्या तब्बल एवढ्या लोकांना कोरोनाची लागण, पत्नी प्रीतीने सांगितली आपबिती

IPL 2021 | अवघ्या 7 चेंडूत विराट-डिव्हिलियर्स आणि मॅक्सवेलचं काम तमाम, कोण आहे हरप्रीत?

VIDEO | सचिन, रोहितनंतर आणखी एका भारतीय क्रिकेटपटूची कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी आर्थिक मदत

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.