ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मालदीवला पोहोचताच माईक हसीने दिली चेन्नईला गुड न्यूज!
माईक हसीची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असल्याची माहिती चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी दिली आहे. (IPL 2021 Chennai Super Kings Batting Coach Mike hussy tested Covid Negative)
चेन्नई : ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मालदीवला पोहोचताच चेन्नईचा बॅटिंग कोच आणि ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू माईक हसीने (Mike Hussy) गुड न्यूज दिली आहे. काल त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत त्याचा कोरोना अहवाल नकारात्मक आला आहे. त्यांच्या तब्येतीविषयी चेन्नई फ्रँचायजीला काळजी लागून राहिली होती. अखेर चेन्नईने सुटकेचा निश्वास टाकलाय. 4 मेरी माईक हसीला कोरोनाची लागण झाली होती. त्याने केवळ 4 दिवसांतच कोरोनाविरुद्धची मॅच जिंकली आहे. (IPL 2021 Chennai Super Kings Batting Coach Mike hussy tested Covid Negative)
माईक हसीने कोरोनाला हरवलं, पुढचे काही दिवस चेन्नईत क्वारन्टाईन
चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी पीटीआयला माईक हसीच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. पीटीआयशी बोलताना ते म्हणाले, 4 मे रोजी दिल्लीमध्ये माईक हसीला कोरोनाची लागण झाली होती. ज्यानंतर आयसोलेशन आणि डॉक्टरांच्या उपचारानंतर शुक्रवारी त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. पुढचे काही दिवस तो चेन्नईच्या एका हॉटेलमध्ये क्वारन्टाईन असणार आहे.
माईक हसी मालदीवला जाऊ शकतो
ऑस्ट्रेलियन मीडिया रिपोर्टनुसार, माईक हसीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर तो मालदीवला संघातील इतर सहकाऱ्यांजवळ जाऊ शकतो. पुढचे काही दिवस ऑस्ट्रेलियन खेळाडू मालदीवमध्ये असणार आहेत. माईक हसीची कोरोना चाचणी जरी निगेटिव्ह आली असली तरी देखील त्याला क्वारन्टाईन पिरीयड पूर्ण करावा लागेल ज्यानंतर त्याला मालदीवला जाण्याची परवानगी मिळू शकते.
भारतातून ऑस्ट्रेलियात जाण्यास परवानगी नाही!
ऑस्ट्रेलियन खेळाडू, समालोचक, प्रशिक्षक तसंच अधिकारी आयपीएल स्थगितीच्या घोषणेनंतर मालदीवला पोहोचले आहेत. बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या तत्परतेमुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू आयपीएल स्पर्धेच्या स्थगितीच्या घोषणेनंतर केवळ 2 दिवसांत मालदीवला पोहोचू शकले. काही दिवस मालदीवला क्वारन्टाईन राहिल्यानंतर तसंच ऑस्ट्रेलियातले निर्बंध हटल्यानंतर खेळाडू मायदेशी रवाना होतील.
(IPL 2021 Chennai Super Kings Batting Coach Mike hussy tested Covid Negative)
हे ही वाचा :