IPL 2021 : सॅम vs टॉम, सख्ख्या भावाने सख्ख्या भावाला तुडवला, 6 बॉलमध्ये 23 धावा झोडल्या!

अखेरच्या काही षटकांत धावांची गरज असताना चेन्नईच्या डावाची सूत्र सॅम करनने हाती घेतली. त्याने टॉमच्या एकाच ओव्हरमध्ये 23 धावा फटकावल्या. Sam Curran Fantastic Batting Against Tom Curran

IPL 2021 : सॅम vs टॉम, सख्ख्या भावाने सख्ख्या भावाला तुडवला, 6 बॉलमध्ये 23 धावा झोडल्या!
सॅम करन...
Follow us
| Updated on: Apr 11, 2021 | 7:57 AM

मुंबई :  आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) दुसरा सामना युवा जोशाने ओतप्रोत भरलेली दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capital) विरुद्ध अनुभवी चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात खेळला गेला. हा सामना अतिशय रंगतदार झाला. या सामन्यात सख्ख्या भावांमधील लढाई बघायला मिळाली. इंग्लंडकडून खेळणारे दोन सख्ख्ये भाऊ सॅम करन (Sam Curran) आणि टॉम करन (Tom Curran)...!  दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या लढतीत चेन्नईकडून छोटा भाऊ सॅम करन मोठा भाऊ टॉम करनवर तुटून पडला. टॉम करनच्या एकाच ओव्हरमध्ये सॅमने 23 धावा ठोकल्या. चेन्नईला शेवटच्या ओव्हर्समध्ये धावांची गरज असताना सॅमनने आक्रमक खेळी करुन चेन्नईला योग्य स्थळी पोहोचवलं. (IPL 2021 Chennai Super Kings Sam Curran Fantastic Batting Against delhi capital Tom Curran)

सॅमच्या फटकेबाजीमुळे चेन्नईला डावाला आकार

चेन्नईच्या सुरुवातीच्या दोन विकेट्स लवकर गेल्या. सलामीची जोडी तंबूत परतल्यानंतर आयपीएल किंग सुरेश रैना, अंबाती रायुडू आणि मोईन अली यांनी संघांसाठी उपयुक्त खेळी केली. परंतु अखेरच्या काही षटकांत धावांची गरज असताना चेन्नईच्या डावाची सूत्र सॅम करनने हाती घेतली. त्याने टॉमच्या एकाच ओव्हरमध्ये दोन चौकार आणि दोन षटकार लगावले.  त्याने मिळालेल्या संधीचं सोनं करत चेन्नईला धावांची गरज असताना चेन्नईच्या डावाच्या 19 व्या ओव्हरमध्ये 23 धावा काढल्या. त्याच्या आक्रमक बॅटिंगमुळे चेन्नईला 188 धावांचा पल्ला गाठता आला.

3 ओव्हर भाव खाल्ला, एका ओव्हरने माती खाल्ली

टॉम करनने पहिले तीन ओव्हर अतिशय चांगली गोलंदाजी केली. पण वैयक्तिक चौथं आणि चेन्नईच्या डावातील 19 वं षटक त्याच्यासाठी फारच महागडं ठरलं. पहिल्या 3 षटकांमध्ये त्याने केवळ 17 धावा दिल्या होत्या. मात्र नंतरच्या एका ओव्हरमध्ये त्याने 23 धावा खर्च केल्या.

सॅम-टॉम भाऊ भाऊ

सॅम करन 2019 मध्ये पंजाबकडून खेळला होता.प्रीती झिंटा संघ मालकिन असलेल्या पंजाबकडून खेळताना सॅमने हॅटट्रिकही घेतली. तरीही पंजाबने त्याला रिलीज केलं. अशा परिस्थितीत त्याला चेन्नई सुपरकिंग्समध्ये एन्ट्री मिळाली.  सॅम करन आणि टॉम करन हे दोघेही इंग्लंडच्या संघातील खेळाडू आहेत. या दोघांपैकी टॉम वयाने वयाने मोठा आहे. टॉमने 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलंय आहे तर सॅमने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय.

टॉम करन 2018 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला. यानंतर 2019 आणि 2020 मध्ये तो राजस्थान रॉयल्सकडून खेळला. 2021 च्या हंगामात तो दिल्लीच्या युवा टीमचा भाग आहे.

(IPL 2021 Chennai Super Kings Sam Curran Fantastic Batting Against delhi capital Tom Curran)

हे ही वाचा :

IPL 2021 : रवींद्र जडेजाची ‘ती’ चूक महागात, आक्रमक सुरेश रैना रन आऊट झाला तो क्षण, पाहा व्हिडीओ

IPL 2021 : ज्याला काही महिने हिणवलं, त्याच पृथ्वी शॉच्या धमाकेदार खेळीने टीकाकारांची तोंड बंद!

CSK vs DC, IPL 2021 Match 2 Result | पृथ्वी शॉ-शिखर धवनची शानदार अर्धशतकं, दिल्लीची चेन्नईवर 7 विकेटने मात

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.