IPL 2021 : दीपक चाहर ठरला पंजाबचा कर्दनकाळ, धोनीला खास सामन्याचं खास गिफ्ट!

दीपक चाहरने आपल्या 4 ओव्हर्समध्ये पंजाबच्या 4 बॅट्समनला तंबूत धाडलं. तसंच 200 वा सामना खेळणाऱ्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मॅच जिंकवून खास गिफ्टही दिलं.

IPL 2021 : दीपक चाहर ठरला पंजाबचा कर्दनकाळ, धोनीला खास सामन्याचं खास गिफ्ट!
दीपक चाहर
Follow us
| Updated on: Apr 17, 2021 | 6:34 AM

मुंबई :  आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) आठव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super King) पंजाब किंग्सवर (Punjab Kings) 6 विकेट्सने विजय मिळवला. पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी 107 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान चेन्नईने 15.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. पंजाबच्या बड्या बोलर्सला चेन्नईच्या दीपक चहर (Deepak Chahar) या युवा गोलंदाजाने पुरतं हैरान केलं. त्याने आपल्या 4 ओव्हर्समध्ये पंजाबच्या 4 बॅट्समनला तंबूत धाडलं. तसंच 200 वा सामना खेळणाऱ्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) मॅच जिंकवून खास गिफ्टही दिलं. (IPL 2021 Chennai Super Kings vs Punjab Kings Deepak Chahar outstanding Spell vs Punjab Kings)

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज पुन्हा एकदा पंजाबचे बॅट्समन षटकारांचा पाऊस पाडतील, असा क्रिकेटप्रेमींचा अंदाज होता. परंतु पंजाबच्या डावाची खराब सुरुवात झाली. त्याने पंजाबचा सलामीवीर मयांक अग्रवालला शानदार इनस्विंग टाकून क्लिन बोल्ड केलं तर पुढे नियमित अंतराने त्याने पंजाबला धक्के दिले.

दीपकची आयपीएलमधील सर्वश्रेष्ठ कामगिरी

दीपकने निर्धारित 4 ओव्हर्समध्ये 1 ओव्हर निर्धाव टाकत केवळ 13 रन्स देऊन चार फलंदाजांना तंबूत पाठवलं. त्याने फेकलेल्या 24 चेंडूंमधले 18 चेंडू निर्धाव होते. आयपीएलच्या इतिहासातली दीपक चाहरची ही आतापर्यंतची सर्वश्रेष्ठ बोलिंग आहे. याअगोदर त्याने 2018 मध्ये सनरायजर्स हैदराबादविरुद्ध निर्धारित 4 ओव्हर्समध्ये 15 रन्स देऊन 3 बळी मिळवले होते.

धोनीचे अनोखे द्विशतक

धोनीने पंजाब विरुद्ध अनोखं द्विशतक ठोकलं. पंजाब विरुद्धचा हा सामना चेन्नईसाठीचा धोनीचा 200 वा सामना होता. धोनी पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी मैदानात उतरताच त्याने हे अनोखं द्विशतक पूर्ण केलं.

चेन्नईचा 14 व्या मोसमातील पहिला विजय

पंजाबने चेन्नईला विजयासाठी 107 धावांचे टार्गेट दिले होते. हे टार्गेट चेन्नईने 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. चेन्नईकडून मोईन अलीने 46 धावांची खेळी केली. तर शेवटपर्यंत फॅफ डु प्लेसिसने नाबाद 36 धावा केल्या. पंजाबकडून मोहम्मद शमीने 2 विकेट्स घेतल्या.

(IPL 2021 Chennai Super Kings vs Punjab Kings Deepak Chahar outstanding Spell vs Punjab Kings)

हे ही वाचा :

IPL 2021 | सामन्याआधी शमीच्या पाया पडला आणि मैदान गाजवलं, दीपक चहरची अफलातून गोलंदाजी

PBKS vs CSK IPL 2021, Match 8 Result | चेन्नई सुपर किंग्सचा पंजाबवर 6 विकेट्सने सहज विजय

Ravindra Jadeja | आधी रॉकेट थ्रो करत रन आऊट, त्यानंतर हवेत झेपावत शानदार कॅच, रवींद्र जाडेजाची शानदार फिल्डिंग, पाहा व्हिडीओ

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.