IPL 2021 CSK vs PKBS : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज, सामना कधी, कुठे, केव्हा?
आयपीएलच्या 14 व्या पर्वातील आज आठवा सामना महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखालील चेन्नई (Chennai Super Kings) विरुद्ध के.एल. राहुलच्या (KL Rahul) पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात रंगणार आहे. | IPL 2021 Chennai Super Kings vs Punjab Kings Live Streaming
मुंबई : आयपीएलच्या 14 व्या पर्वातील आज आठवा सामना महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखालील चेन्नई (Chennai Super Kings) विरुद्ध के.एल. राहुलच्या (KL Rahul) पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात रंगणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede Stadium) हा सामना पार पडणार आहे. चेन्नईने दिल्लीविरोधातला आपला पहिला सामना गमावला होता. तर मागील रोमांचक सामन्यात पंजाबने राजस्थानला हरवलं होतं. (IPL 2021 Chennai Super Kings vs Punjab Kings Live Streaming When Where To watch online free in Marathi 16 April 2021)
आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज पंजाब यांच्यात 23 सामने खेळले गेले आहेत. चेन्नईने 14 सामने जिंकले आहेत, तर पंजाबने 9 सामने जिंकण्यात यश मिळवलं. यातील एक मॅच टाय झाली होती. त्या मॅचमध्ये पंजाबने चेन्नईला हरवलं होतं. पाठीमागच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जने पंजाबविरोधातील दोन्ही सामने जिंकले होते. पहिल्या सामन्यात चेन्नईने पंजाबचा 10 गडी राखून पराभव केला, तर दुसर्या सामन्यात 9 गडी राखून विजय मिळवला होता. पाठीमागचे 5 सामने पाहिले असता चेन्नईचा पगडा भारी राहिला आहे. चेन्नईने मागील 5 सामन्यांत 4 वेळा पंजाबला हरवलंय.
सामना कधी आणि कुठे…?
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील पहिला आणि आयपीएलच्या 14 व्या पर्वातील आठवा सामना आज 16 एप्रिल रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियम खेळविण्यात येणार आहे.
सामना किती वाजता सुरु होणार?
भारतीय वेळेनुसार सामना ठीक 7.30 वाजता सुरु होईल. सामन्याच्या अर्धा तास अगोदर म्हणजेच ठीक 7 वाजता सामन्याच्या टॉस होईल.
लाईव्ह मॅच कुठे बघायला मिळेल?
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील पहिल्या सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्हाला बघायला मिळेल.
लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे बघायचं?
तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी + हॉटस्टारवरही बघू शकता. तसंच प्रत्येक ओव्हर्सच्या अपडेट्स, मॅचची अपडेट तुम्ही Tv9marathi.com या वेबसाईटला देखील पाहू शकता.
(IPL 2021 Chennai Super Kings vs Punjab Kings Live Streaming When Where To watch online free in Marathi 16 April 2021)
हे ही वाचा :
IPL 2021 : ‘उडता संजू’, हवेत सूर मारत धवनचा कॅच, ‘गब्बर’ही हैरान!
IPL 2021 : रिषभ पंतला आऊट केल्यावर खेळाडू मैदानातच नाचला, Video व्हायरल