IPL 2021 : चेन्नई संघासाठी आणि चाहत्यांसाठी दु:खद बातमी, अध्यक्ष एल सबारत्नम यांचं निधन

आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) धूम सुरु असताना चेन्नईच्या (Chennai Super Kings) संघासाठी आणि पाठीराख्यांसाठी एक दु:खद बातमी आहे. चेन्नई सुपर किंग्ज क्रिकेट लिमिटेडचे ​​संचालक आणि अध्यक्ष एल सबारत्नम (L Sabaratnam) यांचे दीर्घ आजाराने रविवारी चेन्नई येथे निधन झाले. (IPL 2021 CSK President L Sabaratnam Pass Away)

IPL 2021 : चेन्नई संघासाठी आणि चाहत्यांसाठी दु:खद बातमी, अध्यक्ष एल सबारत्नम यांचं निधन
अध्यक्ष एल साबारत्नम यांचं निधन
Follow us
| Updated on: Apr 26, 2021 | 8:48 AM

चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) धूम सुरु असताना चेन्नईच्या (Chennai Super Kings) संघासाठी आणि पाठीराख्यांसाठी एक दु:खद बातमी आहे. चेन्नई सुपर किंग्ज क्रिकेट लिमिटेडचे ​​संचालक आणि अध्यक्ष एल. सबारत्नम (L Sabaratnam) यांचे दीर्घ आजाराने रविवारी चेन्नई येथे निधन झाले. बंगळुरुविरुद्ध (CSK vs RSB) विजय मिळवल्यानंतर चेन्नईसाठी आनंदाचा दिवस होता मात्र एल सबारत्नम यांच्या निधनानंतर चेन्नईवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (IPL 2021 CSK President L Sabaratnam Pass Away)

सबारत्नम यांनी 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

एल सबारत्नम यांनी वयाच्या 80 व्या अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी आहे. वडिलांच्या जाण्यानंतर त्यांच्यावर मोठा आघात झाला आहे, अशी माहिती चेन्नईच्या सूत्रांनी दिली आहे.

सबारत्नम यांची कारकीर्द

सबारत्नम बराच काळ चेट्टीनाड सिमेंट कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक होते. याआधी ते चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे संचालक देखील होते. इतकेच नव्हे तर ते इंडिया सिमेंट्सचे सल्लागार आणि कोरोमंडल शुगर्सचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देखील होते.

सबारत्नम यांच्या निधनाने चेन्नईच्या संघावर दु:खाचा आघात

चेन्नईच्या आजपर्यंतच्या वाटचालीत सबारत्नम यांचा मोलाचा वाटा होता. चेन्नई संघाला अध्यक्ष या नात्याने ते अनेकवेळा मार्गदर्शन करायचे. चेन्नई संघासाठी त्यांची भूमिका पडद्यामागच्या कलाकाराची असायची. त्यांच्या जाण्याने चेन्नईच्या संघावर दु:खाचा आघात झाला आहे.

(IPL 2021 CSK President L Sabaratnam Pass Away)

हे ही वाचा :

IPL 2021 : सर जाडेजाच्या बहारदार बॅटिंगला साक्षीचा सलाम, पोस्ट शेअर करत म्हणाली…

IPL 2021 : चेन्नईविरुद्धची मॅच हारल्यानंतरही विराट कोहली भलताच खूश, म्हणतो, ‘सर जाडेजा इज ग्रेट…!’

IPL 2021 : ‘जिसे डरते थे, वहीं बात हो गयी’, चेन्नईविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीला ‘डबल धक्का’!

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.