IPL 2021 : रवींद्र जडेजाची ‘ती’ चूक महागात, आक्रमक सुरेश रैना रन आऊट झाला तो क्षण, पाहा व्हिडीओ

दिल्लीविरोधातल्या मॅचमध्ये सुरैश रैना दुर्दैवीरित्या आऊट झाला. जर जडेजाने रन्सचा कॉल देऊन रैनाला रन आऊट केलं नसतं तर चेन्नईच्या स्कोअरबोर्डवरती आणखी धावा दिसल्या असत्या. | Suresh Raina Run Out Mistake of Ravindra Jadeja

IPL 2021 : रवींद्र जडेजाची 'ती' चूक महागात, आक्रमक सुरेश रैना रन आऊट झाला तो क्षण, पाहा व्हिडीओ
सुरेश रैना रन आऊट झाला तो क्षण...
Follow us
| Updated on: Apr 11, 2021 | 7:14 AM

मुंबई :  आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) दुसऱ्या सामन्यात युवा दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capital) अनुभवी चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Super Kings) पराभूत करुन आयपीएलमधील सुरुवात अतिशय धडाक्यात केली. चेन्नईने प्रथम बॅटिंग करताना 188 धावा केल्या होत्या. चेन्नईचा एवढा विशाल स्कोअर होण्यामागचं कारण ठरला तो मिस्टर आयपीएल सुरेश रैना (Suresh Raina) …! मागील मोसमात त्याच्या वैयक्तिक कारणामुळे तो खेळू शकला नाही. मात्र यंदाच्या मोसमात त्याने हे जाणवूही दिलं नाही की मागील मोसम तो खेळला नव्हता. अगदी पहिल्या बॉलपासून ड्रेसिंग रुममधून सेट होऊन आल्यासारखा सुरेश रैना खेळला. मात्र रविंद्र जडेजाच्या (Ravindra jadeja) एका चुकीमुळे त्याला रन आऊट व्हावं लागलं. जर तो रनआऊट झाला नसता तर चेन्नईला स्कोअर बोर्डवर आणखी काही धावा दिसून आल्या असत्या. (IPL 2021 CSK vs DC Suresh Raina Run Out Mistake of Ravindra Jadeja)

‘रैना’ तेरा क्या कहेना…!

चेन्नईने प्रथम बॅटिंग करताना निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 188 धावा केल्या. चेन्नईकडून ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनाने (Suresh Raina) या 14 व्या मोसमाची अर्धशतकाने शानदार सुरुवात केली. रैनाने या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावलं. रैनाच्या या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईला 188 धावांपर्यंत मजल मारता आली.

रैनाने सिक्स खेचत अर्धशतक पूर्ण केलं. त्याने अवघ्या 32 चेंडूत हे अर्धशतक झळकावलं. रैना मैदानात चांगला सेट झाला होता. पण निर्णायक क्षणी रैना दुर्देवी ठरला. रैना रन आऊट झाला. रैनाने एकूण 36 चेंडूत 54 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 3 चौकार आणि 4 षटकार लगावले.

जडेजाच्या चुकीने रैना रन आऊट

दिल्लीविरोधातल्या मॅचमध्ये सुरैश रैना दुर्दैवीरित्या आऊट झाला. रवींद्र जडेजाने पहिला रन्स पूर्ण करुन दुसऱ्या रन्ससाठी सुरेश रैना कॉल दिला. मात्र क्रिस वोक्स वेगाने बॉलवर आला आणि त्याने धोनीकडे थ्रो केला. सुरेश रैना तेवढ्या वेळात क्रीजमध्ये पोहोचू शकला नाही. साहजिच धोनीने तोपर्यंत स्टम्प उडवले होते. जर जडेजाने रन्सचा कॉल देऊन रैनाला रन आऊट केलं नसतं तर चेन्नईच्या स्कोअरबोर्डवरती आणखी धावा दिसल्या असत्या.

(IPL 2021 CSK vs DC Suresh Raina Run Out Mistake of Ravindra Jadeja)

हे ही वाचा :

IPL 2021 : ज्याला काही महिने हिणवलं, त्याच पृथ्वी शॉच्या धमाकेदार खेळीने टीकाकारांची तोंड बंद!

CSK vs DC, IPL 2021 Match 2 Result | पृथ्वी शॉ-शिखर धवनची शानदार अर्धशतकं, दिल्लीची चेन्नईवर 7 विकेटने मात

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.