IPL 2021 | ‘हिटमॅन’ आणि ‘मिस्टर आयपीएल’ इतिहास रचणार, मैदानात उतरताच रोहित आणि रैना करणार ‘हा’ किर्तीमान
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात सुरेश रैना (Suresh Raina)आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानात उतरताच विक्रम रचणार आहेत.
नवी दिल्ली | आयपीएलमधील 14 व्या (IPL 2021) हंगामातील 27 वा सामना आज (1 मे) खेळवण्यात येणार आहे. हा सामना आयपीएलमधील 2 सर्वात यशस्वी संघांमध्ये खेळवला जाणार आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) हे आमनेसामने असणार आहेत. या सामन्याला संध्याकाळी साडे सात वाजता दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. चेन्नईचा आक्रमक फलंदाज ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैना (Suresh Raina) आणि मुंबईचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानात उतरताच किर्तीमान रचणार आहेत. (ipl 2021 csk vs mi Suresh Raina and Rohit Sharma will set a big record in today match)
रैनाची आयपीएलमधील 200 वी मॅच
रैनाचा मुंबई विरुद्धच हा सामना त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 200 वा सामना ठरणार आहे. यासह रैना सामन्याचं द्विशतक पूर्ण करणारा चौथा खेळाडू ठरेल. आतापर्यंत अशी कामगिरी चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni), रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) केली आहे. रैनाने 199 सामन्यांमध्ये 136.98 च्या स्ट्राईक रेटने 5 हजार 489 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे. या दरम्यान रैनाने 502 चौकार आणि 202 सिक्स लगावले आहेत. नाबाद 100 ही रैनाची आयपीएलमधील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या आहे.
रोहित शर्माचा 350वा T20 सामना
तसेच मुंबईचा कर्णधार रोहित शर्माचा चेन्नई विरुद्धचा हा सामना त्याच्या टी 20 कारकिर्दीतील 350 वा सामना असणार आहे. रोहित 350 टी 20 सामने खेळणारा पहिला भारतीय तर एकूण 15 वा खेळाडू ठरेल. रोहितने आतापर्यंत 349 T 20 सामन्यात 133.39 स्ट्राईक रेटने 6 शतक आणि 65 अर्धशतकांसह 9 हजार 280 धावा केल्या आहेत. तसेच रोहितला T20 क्रिकेटमध्ये 400 सिक्ससाठी केवळ 4 षटकारांची आवश्यकता आहे.
सामना कोण जिंकणार?
मुंबई आणि चेन्नई या दोन्ही हिट टीम आहेत. दोन्ही संघांमध्ये तोडीसतोड आणि एकसेएक खेळाडू आहेत. या मोसमात चेन्नई शानदार कामगिरी करतेय. तर मुंबईला संघर्ष करावा लागतोय. चेन्नईचे सर्व खेळाडू आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतायेत. तर मुंबईचे खेळाडू संघर्ष करतायेत. त्यामुळे या सामन्यात कोण वरचढ ठरणार, या कडे सर्वांचच लक्ष असणार आहे.
संबंधित बातम्या :
IPL 2021 : डेव्हिड वॉर्नरची सनरायजर्स हैदराबादच्या कर्णधारपदावरुन उचलबांगडी, ‘या’ खेळाडूकडे संघाची कमान
MI VS CSK, IPL 2021 Match Prediction | आयपीएलमधील 2 चॅम्पियन संघ आमनेसामने, रोहित बाजी मारणार की धोनी मैदान गाजवणार?
(ipl 2021 csk vs mi Suresh Raina and Rohit Sharma will set a big record in today match)