IPL 2021 : ‘धोनीला म्हातारपणाची जाणीव’, 200 सामने पूर्ण करताच मोठं वक्तव्य, पाहा व्हिडीओ…
धोनीला जेव्हा त्याच्या माईलस्टोनबद्दल विचारलं गेलं तेव्हा तो किंचितसा हसला आणि म्हणाला, मला आता असं वाटायला लागलंय की म्हातारा झालोय. (IPL 2021 CSK vs PBKS MS Dhoni Says makes me Feel very Old)
मुंबई : मुंबईच्या वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium Mumbai) चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super kings) कर्णधार एम एस धोनीने (MS Dhoni) 200 वा टी ट्वेन्टी सामना खेळला. या लढतीत चेन्नईच्या संघ सहकाऱ्यांनी धोनीला अनोखं विजयाचं गिफ्ट दिलंय. मॅच नंतर झालेल्या प्रेझेंटेशन कार्यक्रमात त्याच्या प्रवासाविषयी विचारलं असता त्याला वाढलेल्या वयाची आठवण झाली. किंचितसं हसून त्याच्या स्वभावानुसार त्याने खास स्टाईलमध्ये अँकरने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं. (IPL 2021 CSK vs PBKS MS Dhoni Says makes me Feel very Old)
…मग म्हातारपणाची जाणीव होते!
आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) आठव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super King) पंजाब किंग्सवर (Punjab Kings) 6 विकेट्सने विजय मिळवला. पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी 107 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान चेन्नईने 15.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. मॅचनंतर धोनीला चेन्नईच्या परफॉर्मन्सहद्दल तसंच त्याच्या वैयक्तिक प्रवासाविषयी अँकरने प्रश्न विचारला. त्यावर धोनीने, ‘असा प्रश्न विचारल्यावर मला वय वाढल्याची आठवण होते तसंच म्हातारपणाची जाणीव होते, असं तो म्हणाला.
तो किंचितसा हसला आणि म्हणाला…
धोनीला जेव्हा त्याच्या माईलस्टोनबद्दल विचारलं गेलं तेव्हा तो किंचितसा हसला आणि म्हणाला, मला आता असं वाटायला लागलंय की म्हातारा झालोय. “हा खरोखरच मोठा प्रवास होता जो 2008 पासून सुरु झाला होता. हा प्रवास अनेक खाच खळग्यांनी तसंच सुंदर क्षणांनी व्यापलेला आहे. भारताशिवाय मी दुबई, साऊथ आफ्रिलेला खेळलो प्रत्येक ठिकाणी खेळण्याची मजा वेगळी होकी. आतापर्यंतचा प्रवास तरी खूप मजेदार राहिलेला आहे.”
धोनीचे अनोखे द्विशतक, संघ सहकाऱ्यांकडून खास गिफ्ट
धोनीने पंजाब विरुद्ध अनोखं द्विशतक ठोकलं. पंजाब विरुद्धचा हा सामना चेन्नईसाठीचा धोनीचा 200 वा सामना होता. धोनी पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी मैदानात उतरताच त्याने हे अनोखं द्विशतक पूर्ण केलं. 200 वा सामना खेळणाऱ्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) मॅच जिंकवून खास गिफ्टही दिलं.
पाहा व्हिडीओ :
#MSDhoni on playing his milestone game for #CSK
“Makes me feel very old” ?#VIVOIPL | #PBKSvCSK pic.twitter.com/CspWxrWOJV
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2021
(IPL 2021 CSK vs PBKS MS Dhoni Says makes me Feel very Old)
हे ही वाचा :
IPL 2021 : चेन्नईविरुद्धची मॅच गमावल्यानंतर के एल राहुलला दु:ख, म्हणतो, ‘माझ्याजवळ बोलायला…’
पंजाबच्या डावाला खिंडार पाडणाऱ्या दीपक चहरच्या खांद्यावर धोनीला द्यायचीय ‘ही’ नवी जबाबदारी
आयपीएल सामन्यांचा थरार सुरु, मात्र मोहम्मद शमीला खंत, सांगितली मनातली गोष्ट!