IPL 2021 : शेजारी मरीन ड्राईव्ह आणि समुद्राच्या लाटा, धोनी-शाहरुखमध्ये कशावर बाता?, या फोटोची एकच चर्चा!

सामना संपल्यानंतर शाहरुख खानने धोनीशी गप्पांचा फड रंगवला तसंच धोनी गुरुजींकडून क्रिकेटचे धडे घेतले. IPL 2021 CSK vs PBKS Shahrukh khan met MS Dhoni

IPL 2021 : शेजारी मरीन ड्राईव्ह आणि समुद्राच्या लाटा, धोनी-शाहरुखमध्ये कशावर बाता?, या फोटोची एकच चर्चा!
एम एस धोनी आणि शाहरुख खान
Follow us
| Updated on: Apr 17, 2021 | 2:27 PM

मुंबई :  भारतीय संघाचा माजी कर्णधार तसंच आयपीएलच्या 14 व्या पर्वातील चेन्नईचा संघनायक एम एस धोनी (MS Dhpni) म्हणजे क्रिकेटचं चालतं बोलतं विद्यापीठ तर आयपीएलचा मंच म्हणजे युवा खेळाडूंना शिकण्याची संधी… ते ही भारतीय संघातील अशा दिग्गजांकडून ज्यांनी भारतीय क्रिकेटला चार चाँद लावलेत. शुक्रवारी रात्री मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई विरुद्ध पंजाब (CSK vs PBKS) या लढतीत चेन्नईने पंजाबवर 6 विकेट्सने विजय मिळवला. मात्र जरी पंजाबचा पराभव झाला असला तरी रेड आर्मीतल्या शाहरुख खानची (Shahrukh Khan) सर्वाधिक चर्चा होती, ती त्याच्या बहारदार बॅटिंग परफॉर्मन्समुळे. सामना संपल्यानंतर त्याने धोनीशी गप्पांचा फड रंगवला तसंच धोनी गुरुजींकडून क्रिकेटचे धडे घेतले. (IPL 2021 CSK vs PBKS Shahrukh khan met MS Dhoni Wankhede Stadium Mumbai)

मुंबईच्या वानखेडे मैदानावर सामना पार पडल्यानंतर शाहरुख खानने धोनीची मैदानातच भेट घेतली. यावेळी एका चौरसाकृती ठोकळ्यावर दोघांनीही बैठक बसवलीय. दोघेही या फोटोत काहीतरी गहन विषयांवर चर्चा करत असल्याचं दिसून येत आहे. शाहरुखने काहीतरी प्रश्न विचारल्यानंतर धोनी त्या प्रश्नाचं अगदी हातवारे करुन उत्तर देतोय, असं या एकंदरित फोटोमधून दिसत आहे.

चेन्नईविरोधात शाहरुखची शानदार बॅटिंग

सय्यद अली मुश्ताक ट्रॉफीमध्ये शाहरुख खानने दमदार कामगिरी केली. त्याच्या याच प्रदर्शनासाठी त्याला पंजाबच्या संघाने आयपीएल मोसमासाठी विकत घेतलं. आयपीएलच्या दुसऱ्याच सामन्यात त्याने संघ व्यवस्थापनाने घेतलेला निर्णय योग्य असल्याचं आपल्या बॅटिंग परफॉर्मन्समधून दाखवून दिलं. पहिल्या 8 षटकांत पंजाबचे 5 बॅट्समन तंबूत परतलेले असताना शाहरुख खानने जिगरबाजपणे खिंड लढवली. त्याने अतिश कठीण काळात 36 बॉलमध्ये 47 रन्स फटकावले. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 2 षटकार ठोकले.

माही भाई, मॅचला फिनिशिंग टच कसा द्यायचा?

पंजाबला अखेरच्या ओव्हर्समध्ये जास्तीत जास्त रन्सची आवश्यकता असताना शाहरुख आक्रमक फटका मारण्याच्या नादात आऊट झाला. त्याचसोबत त्याचं आयपीएलमधील पहिलं वहिलं अर्धशतकंही हुकलं. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर, शाहरुख धोनीला ‘मॅच कशी संपवायची’, किंवा ‘मॅचला फिनिशिंग टच कसा द्यायचा?’ हे तर विचारत नसेल ना? अशा चर्चा नेटकऱ्यांमध्ये आहे.

(IPL 2021 CSK vs PBKS Shahrukh khan met MS Dhoni Wankhede Stadium Mumbai)

हे ही वाचा :

IPL 2021 MI vs SRH : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद, सामना कधी, कुठे, केव्हा?

IPL 2021 : ‘धोनीला म्हातारपणाची जाणीव’, 200 सामने पूर्ण करताच मोठं वक्तव्य, पाहा व्हिडीओ…

IPL 2021 : चेन्नईविरुद्धची मॅच गमावल्यानंतर के एल राहुलला दु:ख, म्हणतो, ‘माझ्याजवळ बोलायला…’

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.