दिल्ली | सनरायजर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) कर्णधार डेव्हिड वॉर्नरने (David Warner) चेन्नई सुपर किंग्स ChennaiSuperKings) विरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात कारनामा केला आहे. वॉर्नरने 55 चेंडूत 3 फोर आणि 2 सिक्ससह 57 धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान वॉर्नरने झुंजार अर्धशतक लगावलं. या अर्धशतकासह वॉर्नर आयपीएलमध्ये अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. (ipl 2021 csk vs srh sunrisers hyderabad captain david warner become first batsman who hit 5oth half century in ipl)
Congratulations to @SunRisers captain @davidwarner31 for becoming the first batsman to register 50 half-centuries in #VIVOIPL https://t.co/dvbR7X1Kzc #VIVOIPL #CSKvSRH pic.twitter.com/YPkcphuLv5
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2021
वॉर्नरने 77 मीटर लांबीचा सिक्स लगावत अर्धशतक पूर्ण केलं. वॉर्नरच्या आयपीएल कारकिर्दीतील हे 50 वं अर्धशतक ठरलं. वॉर्नर आयपीएलमध्ये अर्धशतकांचं अर्धशतक लगावणारा पहिलाच बॅट्समन ठरला. तसेच वॉर्नरने या खेळीदरम्यान टी 20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला. यासह वॉर्नर ख्रिस गेल, कायरन पोलार्ड आणि शोएब मलिकनंतर अशी कामगिरी करणारा चौथा फलंदाज ठरला.
FIFTY@davidwarner31 50th #VIVOIPL 50✅
200 Sixes ✅
10,000 T20 runs ✅https://t.co/dvbR7X1Kzc #VIVOIPL #CSKvSRH pic.twitter.com/poBQz37AXY— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2021
वॉर्नरने आपल्या खेळीदरम्यान सिक्स लगावले. या सिक्ससह वॉर्नर आयपीएलमध्ये 200 सिक्स लगावणारा एकूण 8 वा तर चौथा परदेशी फलंदाज ठरला. सर्वाधिक सिक्सच्या बाबतीत पंजाब किंग्सचा ख्रिस गेल 354 सिक्ससह पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे.
हैदराबादने चेन्नईला विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले आहे. हैदराबादने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 171 धावा केल्या. हैदराबादकडून मनिश पांडेने सर्वाधिक 61 धावांची खेळी केली. तर कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 57 धावा केल्या. तसेच केन विलियमनसनने 26 धावांची छोटेखानी खेळी केली.
या सामन्यासाठी दोन्ही संघात बदल करण्यात आले आहेत. चेन्नईमध्ये ड्वेन ब्राव्हो आणि इम्रान ताहीरच्या जागी लुंगी एनगिडी आणि मोईन अलीला संधी देण्यात आली आहे. तर हैदराबादमध्ये संदीप शर्मा आणि मनिष पांडेचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे.
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार) , ऋतुराज गायकवाड, फॅफ डु प्लेसी, लुंगी एन्गिडी, सुरेश रैना, अंबाती रायुडू, रवींद्र जाडेजा, सॅम करन, मोईन अली, शार्दुल ठाकुर आणि दीपक चाहर.
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, जगदीशन सुचित, केदार जाधव, विजय शंकर, मनीष पांडे, केन विलियमसन, खलील अहमद, संदीप शर्मा, राशिद खान आणि सिद्धार्थ कौल.
संबंधित बातम्या :
(ipl 2021 csk vs srh sunrisers hyderabad captain david warner become first batsman who hit 5oth half century in ipl)