IPL 2021 Date And Schedule : आयपीएलला 9 एप्रिलपासून सुरुवात, 30 मे रोजी फायनल, GC च्या शिक्क्याची प्रतीक्षा

IPL 2021 Schedule : येत्या 9 एप्रिल ते 30 मे दरम्यान आयपीएल 2021 (IPL) सामने खेळवण्यात येणार आहेत. गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत हया वेळापत्रकावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर ते अधिकृत जाहीर केलं जाणार आहे.

IPL 2021 Date And Schedule : आयपीएलला 9 एप्रिलपासून सुरुवात, 30 मे रोजी फायनल, GC च्या शिक्क्याची प्रतीक्षा
आयपीएल ट्रॉफी
Follow us
| Updated on: Mar 06, 2021 | 4:18 PM

IPL 2021 Date And Schedule मुंबई : इंडियन प्रीमयर लीगचं (the Indian Premier League) यंदाचं वेळापत्रक जवळपास निश्चित झालं आहे. येत्या 9 एप्रिल ते 30 मे दरम्यान आयपीएल 2021 (IPL) सामने खेळवण्यात येणार आहेत. गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत हया वेळापत्रकावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर ते अधिकृत जाहीर केलं जाणार आहे. आयपीएलच्या 14 व्या मोसमाचं नियोजन आणि कोणत्या मैदानावर सामने भरवायचे याबाबत गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत (GC meeting ) मध्ये ठरणार आहे. पुढील आठवड्यात ही बैठक होण्याची शक्यता आहे. (IPL 2021 Date And Schedule to start on April 9, final on May 30 subject to GC approval)

गव्हर्निंग काऊन्सिलच्या सदस्याने एनआय या वृत्तसंस्थेला याबाबतची माहिती दिली. “आयपीएल 14 ला येत्या बैठकीत मंजुरी मिळेल. त्यानुसार 9 एप्रिलला आयपीएलचा यंदाचा हंगाम सुरु होण्याची आशा आहे. हे सामने कुठे भरवायचे याबाबत पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत ठरवलं जाईल” असं त्यांनी सांगितलं.

गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीकडे लक्ष

“अद्याप आम्ही गव्हर्निंग काऊन्सिलची बैठकीत आयपीएल सामने कुठे खेळवायचे याबाबत चर्चेचा विषय ठरवलेला नाही. ही बैठक मात्र पुढील आठवड्यात होणार आहे. प्रस्तावानुसार 9 एप्रिलला पहिला सामना आणि 30 मे रोजी आयपीएल फायनल (IPL Final 2021) खेळवण्यात येईल”, असं गव्हर्निंग काऊन्सिलच्या सदस्याने सांगितलं.

आयपीएलची तयारी सुरु, धोनीची टीम मैदानात

आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी (IPL 2021) आता अवघा एक महिना बाकी आहे. खेळाडू, फ्रंचायजी आणि क्रिकेट चाहते या पर्वासाठी (Ipl 2021) उत्सुक आहेत. या मोसमाच्या पार्श्वभूमीवर सर्वच खेळाडू हे आपल्या फिटनेसवर काम करत आहेत. आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी जोरदार सराव करत आहेत. चेन्नई सुपर किंगज्सचे काही खेळाडू हे सराव शिबिरासाठी 3 मार्चला चेन्नईत दाखल झाले आहेत. यामध्ये कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनी आणि अनुभवी अंबाती रायुडूचा समावेश आहे. चेन्नईने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या 

आयपीएलमध्ये अनसोल्ड राहिलेला अ‍ॅरॉन फिंच कडाडला, 4 षटकारांसह ठोकल्या 79 धावा 

IPL 2021 | आयपीएलच्या14 व्या मोसमाआधी धोनीच्या चेन्नईला मोठा झटका, दिसणार नाही ‘हे’ नाव 

(IPL 2021 Date And Schedule to start on April 9, final on May 30 subject to GC approval)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.