IPL 2021 : शिखर धवनने रचला आयपीएलमध्ये इतिहास, असा कारनामा करणारा एकटाच ‘गब्बर’!
आतापर्यंतच्या आयपीएल करिअरमध्ये शिखरने 600 चौकार मारले आहेत. काल 9 वा चौकार मारताक्षणी त्याने आयपीएलमधले 600 चौकार पूर्ण केले. आतापर्यंत 600 चौकार दुसऱ्या कोणत्याही खेळाडूने मारलेले नाहीत. | (IPL 2021 dc vs Csk Shikhar Dhawan became First Batsman hit 600 Four In IPL)
मुंबई : आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) दुसऱ्या सामन्यात काल मुंबईच्या मैदानात शिखर धवन (Shikhar Dhawan) नावाचं वादळ आलं. शिखरने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली. दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) खेळताना चेन्नईविरुद्धच्या (Chennai Super Kings) मॅचमध्ये त्याने आपलं आयपीएल करिअरमधलं 42 वं अर्धशतक ठोकलं. याचसोबत त्याने आयपीएलमध्ये इतिहास रचला. आतापर्यंत कुणालाही जमली नाही अशी कामगिरी शिखरने करुन दाखवलीय. आतापर्यंतच्या आयपीएल करिअरमध्ये त्याने 600 चौकार मारले आहेत. काल 9 वा चौकार मारताक्षणी त्याने आयपीएलमधले 600 चौकार पूर्ण केले. आतापर्यंत 600 चौकार दुसऱ्या कोणत्याही खेळाडूने मारलेले नाहीत. (IPL 2021 dc vs Csk Shikhar Dhawan became First Batsman hit 600 Four In IPL)
शिखरच्या नावावर आयपीएलमध्ये 600 चौकारांची नोंद
शिखर धवनने चेन्नईच्या गोलंदाजांना फोडून काढलं. त्याने केवळ 54 चेंडूत 85 धावा ठोकल्या. त्याच्या या खेळीला त्याने 10 चौकार आणि 2 षटकारांचा साज चढवला. त्याच्या बॅटमधून 9 वा चौकार निघाल्याबरोबर त्याच्या नावावर आयपीएलमध्ये 600 चौकारांची नोंद झाली.
शिखरने वॉर्नरचा विक्रम मोडला
सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आयपीएलमध्ये 510 चौकार आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा गब्बर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. सध्या धवनने डेव्हिड वॉर्नरचा विक्रम मोडला आहे.
गब्बरच्या पुढे आता फक्त विराट आणि रैना….
वॉर्नरच्या नावावर आयपीएलमध्ये आतापर्यंत 5254 धावांची नोंद आहे. धवनने वॉर्नरचा विक्रम मोडला आहे. आता शिखरच्या नावावर 5282 धावा आहेत. विराट कोहली आणि सुरेश रैना आता शिखर धवनच्या पुढे आहेत. विराट कोहलीने आयपीएलमध्ये 5911 धावा केल्या आहेत तर रैनाने 5422 धावा केल्या आहेत.
दिल्लीचा सात विकेट्सने विजय
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएलच्या 14 व्या पर्वातील दुसरा सामना अतिशय रोमांचक झाला. या सामन्यात धावांचा पाऊस पडला. प्रथम बॅटिंग करताना चेन्नईने 188 धावा केल्या. प्रत्युत्तरदाखल दिल्लीच्या संघाने तोडीस तोड उत्तर देत चेन्नईने दिलेलं आव्हान 3 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. दिल्लीकडून सलामीला आलेल्या मुंबईकर पृथ्वी शॉने धमाकेदार खेळी करत दिल्लीच्या विजयाचा पाया रचला. त्याला गब्बर शिखर धवनने तितकीच चांगली आणि आक्रमक साथ दिली. या दोघांच्या सलामी जोडीने दिल्लीच्या विजयाचा पाया रचला.
(IPL 2021 dc vs Csk Shikhar Dhawan became First Batsman hit 600 Four In IPL)
हे ही वाचा :
IPL 2021 : ज्याला काही महिने हिणवलं, त्याच पृथ्वी शॉच्या धमाकेदार खेळीने टीकाकारांची तोंड बंद!