IPL 2021 : माझी छाती गर्वाने फुगलीय, माझ्या करियरमध्ये मला जमलं नाही ते ‘पृथ्वी’ने करुन दाखवलं : वीरेंद्र सेहवाग

कोलकात्याविरुद्ध खेळलेल्या पृथ्वीच्या खेळीने माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या मनात घर केलंय. माझी छाती गर्वाने फुगलीय, माझ्या करियरमध्ये मला जमलं नाही ते 'पृथ्वी'ने करुन दाखवलं, अशा शब्दात त्याने पृथ्वी शॉचं कौतुक केलंय. (DC vs KKR Hats off prithvi Shaw Says Virendra Sehwag

IPL 2021 : माझी छाती गर्वाने फुगलीय, माझ्या करियरमध्ये मला जमलं नाही ते 'पृथ्वी'ने करुन दाखवलं : वीरेंद्र सेहवाग
पृथ्वी शॉ आणि वीरेंद्र सेहवाग
Follow us
| Updated on: May 01, 2021 | 11:06 AM

मुंबई : आयपीएलमध्ये (IPL 2021) गुरुवारी खेळल्या गेलेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Delhi Capital vs kolkata knight Riders) या सामन्यात पृथ्वी शॉने (Prithi Shaw) दिल्ली कॅपिटल्सला आपल्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर विजय मिळवून दिला. या सामन्यात कोलकात्याने 154 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल दिल्लीने पृथ्वी शॉच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर 16.3 षटकांत 3 गडी गमावून हे लक्ष्य पार केलं. पृथ्वी शॉने पहिल्याच ओव्हरमध्ये शिवम मावीला खणखणीत सलग सहा चौकारांसह 24 धावा ठोकल्या. शॉ ने 41 बॉलमध्ये 200 च्या स्ट्राईक रेटने 82 धावा केल्या. त्याने या खेळीत 11 चौकार आणि 3 षटकार लगावले. पृथ्वीच्या या खेळीने माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या (Virendra Sehwag) मनात घर केलंय. माझी छाती गर्वाने फुगलीय, माझ्या करियरमध्ये मला जमलं नाही ते ‘पृथ्वी’ने करुन दाखवलं, अशा शब्दात त्याने पृथ्वी शॉचं कौतुक केलंय. (IPL 2021 Dc vs KKR I Could Not hit Six boundries in My Cricket Career Hats off prithvi Shaw Says Virendra Sehwag)

वीरेंद्र सेहवाग काय म्हणाला?

एका ओव्हरमध्ये सहा फोर मारायचे असतील कर तुम्हाला परफेक्ट गॅप काढावा लागतो. फिल्डर जाळ्यातून बॉलला सीमापार धाडावं लागतं. जे काम अजिबातच सोपं नसतं. माझ्या कारकीर्दीत मी नेहमीच असा कारनामा करण्याचा प्रयत्न केला पण एका ओव्हरमध्ये मी 18 ते 20 धावांपेक्षा अधिक धावा करु शकलो नाही, असं वीरेंद्र सेहवाग पृथ्वीच्या खेळीवर बोलताना म्हणाला.

मला जे जमलं नाही, ते पृथ्वी शॉ ने करुन दाखवलं. मी कधीही एका ओव्हरमध्ये सहा फोर किंवा सहा सिक्स मारु शकलो नाही, त्यासाठी परफेक्ट टायमिंग आणि गॅपची आवश्यकता असते, जे टायमिंग आणि गॅप पृथ्वी शॉ कडे होता, असं म्हणत त्याने पृथ्वीच्या शानदार खेळीचं कौतुक केलं.

कोलकात्याच्या बोलर्सला पृथ्वीला तुडवलं!

नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियवर गुरुवारी पृथ्वी (Prithvi Shaw) नावाचं वादळ आलं. त्या वादळात कोलकात्याची टीम नेस्तनाबूत झाली. पृथ्वीने कोलकात्याविरुद्ध (DC vs KKR) फक्त 41 बॉलमध्ये धडाकेबाज 82 धावांची खेळी केली. त्याने 200 च्या स्ट्राईक रेटने कोलकात्याच्या बोलर्सला धुतलं. त्याने डावाच्या पहिल्याच ओव्हर्समध्ये शिवम मावीला सलग 6 चौकार सीमापार धाडून आपले इरादे स्पष्ट केले होते.

पृथ्वीने शिवमच्या 6 बॉलला दाखवल्या 6 जागा

पृथ्वीने सामन्यातील दुसऱ्या डावातील पहिल्याच ओव्हरमध्ये 6 चेंडूत शानदार 6 चौकार चोपले. पृथ्वीने शिवम मावीच्या बोलिंगवर 6 चौकार लगावले. विजयी आव्हानाचे पाठलाग करायला दिल्ली मैदानात उतरली. पहिली ओव्हर शिवम मावी टाकायला आला. मावीने वाईड चेंडू टाकत डावाची खराब सुरुवात केली. त्यानंतर पृथ्वीने मावीच्या 6 चेंडूवर मैदानातील चारही कोपऱ्यात शानदार 6 चौकार लगावले.

शिवम मावीने दाबला पृथ्वीचा गळा

पृथ्वीने डावाच्या पहिल्याच ओव्हर्समध्ये शिवम मावीला सलग 6 चौकार सीमापार धाडून आपले इरादे स्पष्ट केले होते. मॅच संपल्यानंतर कोलकाता आणि दिल्लीचे खेळाडू एकमेकांशी चर्चा करत असताना शिवम मावीने मस्करीने पृथ्वी शॉचा गळा दाबला तसंच पृथ्वीच्या शानदार खेळीचं कौतुक केलं.

(IPL 2021 Dc vs KKR I Could Not hit Six boundries in My Cricket Career Hats off prithvi Shaw Says Virendra Sehwag)

हे ही वाचा :

IPL 2021, Prithvi Shaw | पृथ्वी शॉचा धमाका, पहिल्याच ओव्हरच्या 6 चेंडूत फटकावले 6 चौकार

IPL 2021 : सलग 6 बॉलवर 6 चौकार खाल्ल्यानंतर शिवम मावीने दाबला पृथ्वी शॉ चा गळा!

Non Stop LIVE Update
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.