IPL 2021 : रबाडाच्या एक्सप्रेसने गेलच्या गाडीला ब्रेक, Video पाहून तुम्हीही म्हणाल, ‘मानलं भावा तुला…!’
आऊट होण्याच्या अगोदरच्या बॉलवर ख्रिस गेलने राबाडाला उत्तुंग षटकार खेचला होता. त्याच्या पुढच्याच बॉलवर रबाडाने बदला घेतला. (IPL 2021 DC vs PBKS Kagiso Rabada clean bold Chris Gayle Video Viral on Social Media)
अहमदाबाद : दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने (Kagiso Rabada) युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलला ()Chris Gayle आपल्या बोलिंगच्या वेगाने चितपट केलं. रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर (Narendra modi Cricket Ground) खेळल्या गेलेल्या सामन्यात कागिसोने ख्रिस गेलला ज्याप्रकारे क्लिन बोल्ड केलं, तो व्हिडीओ पाहून क्रिकेट फॅन्स कागिसो रबाडाला शाबासकी देत आहेत. (IPL 2021 DC vs PBKS Kagiso Rabada clean bold Chris Gayle Video Viral on Social Media)
रबाडाच्या वेगासमोर गेलची बॅट ‘म्यान’!
पंजाबच्या डावाच्या सहाव्या ओव्हर्समध्ये दिल्लीकडून कागिसो रबाडा बोलिंगसाठी आला. गेल स्ट्राईकला खेळत असताना त्याने 143.4 च्या वेगाने गेलला बॉल टाकला. इतक्या जास्त वेगापुढे गेलचा निभाव लागला नाही. गेल रबाडाच्या बॉलवर त्रिफळाचित झाला. रबाडाच्या बॉलने स्टम्प्सही काही अंतरावर उडून पडला.
आऊट झाल्यावर गेल स्टम्पकडे पाहत राहिला…
आऊट होण्याच्या अगोदरच्या बॉलवर ख्रिस गेलने रबाडाला उत्तुंग षटकार खेचला होता. त्याच्या पुढच्याच बॉलवर रबाडाने बदला घेतला. त्याने 142.4 च्या वेगाने गेलला कमरेच्या उंचीचा फुलटॉस बॉल टाकला. परंतु तो बॉल एवढा वेगात आला की गेलची बॅट फिरायच्या आत बॉलने स्टम्प्स उध्वस्त केले होते. गेलही या बॉलने पुरता हैरान झाला. आऊट झाल्यावर गेल स्टम्पकडे पाहत राहिला.
— Cricsphere (@Cricsphere) May 2, 2021
फॉर्मात असलेल्या दिल्लीने पंजाबला हरवलं!
शिखर धवनच्या धमाकेदार 69 रन्सच्या बळावर दिल्लीने पंजाबला 7 विकेट्सने नमवलं. तसंच गुणतालिकेतही शिखर गाठलं. दिल्लीने पॉइंट्स टेबलमध्ये 12 गुणांसह पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दिल्लीने टॉस जिंकून प्रथम पंजाबला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. पंजाबला 166 धावांवर रोखल्यानंतर दिल्लीने आक्रमक सुरुवात करत आपले इरादे स्पष्ट केले. शिखर धववने शानदार खेळी करत दिल्लीला विजय मिळवून दिला.
(IPL 2021 DC vs PBKS Kagiso Rabada clean bold Chris Gayle Video Viral on Social Media)
हे ही वाचा :