IPL 2021 : ‘कुणी खेळाडू देतं का खेळाडू…’ राजस्थानवर संकट, कोरोनाने होत्याचं नव्हतं केलं…!

संपूर्ण जगात कोरोनाचा हैदोस सुरु आहे. कित्येक महिने लॉकडाऊन असूनही कोरोनाची लाट ओसरण्याचं नाव घेत नाहीय. अशात काळात आयपीएलचं 14 वं पर्व (IPL 2021) सुरु आहे. (Injuries bio bubble and corona wave time to pick players from another team in Rajasthan Royals)

IPL 2021 : 'कुणी खेळाडू देतं का खेळाडू...' राजस्थानवर संकट, कोरोनाने होत्याचं नव्हतं केलं...!
राजस्थान रॉयल्स
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 9:07 AM

मुंबई : संपूर्ण जगात कोरोनाचा हैदोस सुरु आहे. कित्येक महिने लॉकडाऊन असूनही कोरोनाची लाट ओसरण्याचं नाव घेत नाहीय. अशात काळात आयपीएलचं 14 वं पर्व (IPL 2021) सुरु आहे. या पर्वात खेळाडूंना विविध तणावाखाली खेळावं लागतंय. मैदानावरचा तणाव तर वेगळाच पण दुखापत (Injuries), बायो बबल (Bio Bubble) आणि कोरोनाची लाट (corona wave) अशा तिहेरी समस्येतून त्यांना मार्गक्रमण करावं लागतंय. परंतु कोरोना लाटेचा सर्वाधिक फटका आयपीएलमधल्या राजस्थान रॉयल्स संघाला बसला आहे. त्यांच्या चार खेळाडूंनी मायदेशाची वाट धरली आहे. त्यामुळे राजस्थानवर ‘कुणी उसने खेळाडू देतं का खेळाडू…’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे. (IPL 2021 Injuries bio bubble and corona wave time to pick players from another team in Rajasthan Royals)

राजस्थानच्या कोणकोणत्या खेळाडूंनी आयपीएलला रामराम ठोकलाय?

गेल्या काही दिवसांत भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्यामुळे आयपीएलमध्ये त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. राजस्थानचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स (Ben Stokes) जायबंदी झाल्याने त्याने आयपीएलच्या 14 व्या पर्वातून माघार घेतली तर जोफ्रा आर्चर (Jofra Archer) आणखी दुखापतीतून सावरला नसल्याने त्याने स्पर्धेतूनच माघार घेतली आहे. लियाम लिव्हिंगस्टन (Liyam Livinston) याने आपल्या बायो बबलचा त्रास होत असल्याने तसंच मानसिक दडपण येत असल्याने स्पर्धा सोडत असल्याचं जाहीर केलं तर ऑस्ट्रेलियन बोलर अँड्र्यू टायने (Andrew Tye) कोरोनाची महाभयानक दुसरी लाट धोकायदायक असल्याचं सांगत मायदेशी परत जाण्याचा निर्णय घेतलाय.

दुखापत, बायो बबल आणि कोरोनाची लाट, राजस्थावर दुसऱ्या संघातून खेळाडू घेण्याची वेळ

आयपीएलमध्ये आणखी साखळी फेरीचे सामने सुरु आहेत. जवळपास प्रत्येक संघ पाच ते सहा सामने खेळला आहे. अशा परिस्थितीत राजस्थानच्या चार खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. साहजिक राजस्थानवर दुसऱ्या संघांना खेळाडू मागण्याची वेळ आलीय.

राजस्थानच्या गोटात काय परिस्थिती?

राजस्थान रॉयल्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलमधील बाकीचे सामने खेळण्यासाठी दुसऱ्या संघातून आमचं खेळाडू घेण्याचं नियोजन सुरु आहे. मात्र सध्या केवळ चर्चा सुरु आहे. फायनल बोलणी झालेली नाही.

दुसऱ्या संघातील खेळाडू घेण्याविषयी नियम काय सांगतो?

सोमवारपासून दुसऱ्या संघातील खेळाडू घ्यायला सुरु झालं आहे. साखळी फेरी संपेपर्यंत बाकीच्या संघातील खेळाडू घेता येतात परंतु बाद फेरीत दुसऱ्या संघातील खेळाडू घेता येत नाहीत, असा नियम आहे.

आयपीएलला कोणकोणत्या खेळाडूंनी गुड बाय केलाय?

भारताचा फिरकीपटून आणि दिल्ली डेअरडेविल्सचा प्रमुख खेळाडू आर.अश्विन पाठोपाठ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील अ‍ॅडम झम्पा (Adam Zampa) आणि केन रिचडर्सन (Kane Richardson) या दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आपण मायदेशी परतत असल्याचे जाहीर केले तसंच अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडू कोरोनाच्या कारणास्तव मायदेशी परतण्याची शक्यता आहे.

(IPL 2021 Injuries bio bubble and corona wave time to pick players from another team in Rajasthan Royals)

हे ही वाचा :

IPL 2021 : रिषभ पंतने अमित मिश्राला बोलिंगसाठी बोलवलं पण अंपायर्सनी थांबवलं, वाचा मैदानात नेमकं काय घडलं?

IPL 2021 : ‘तेरे बिना मॅच कहाँ रे…’, ए बी डिव्हिलियर्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!

IPL 2021 : डिव्हिलियर्सची दिल्लीविरुद्ध तुफानी खेळी, डेव्हिड वॉर्नर म्हणतो, ‘माझा आयडॉल…!’

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.