मायदेशी जाण्याची लगबग सुरु होती, पण आता भारतातच मुक्काम, न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूला कोरोनाची लागण!

कोलकात्याच्या आणखी एका खेळाडूला कोरोनाची लागण झालीये. न्यूझीलंडच्या टीम सेफर्ट (Tim Seifert) याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. (IPL 2021 KKR New Zealand tim Seifert tested Corona positive)

मायदेशी जाण्याची लगबग सुरु होती, पण आता भारतातच मुक्काम, न्यूझीलंडच्या 'या' खेळाडूला कोरोनाची लागण!
कोलकाता नाईट रायडर्स
Follow us
| Updated on: May 08, 2021 | 1:08 PM

मुंबई :  कोलकात्याच्या (KKR) आणखी एका खेळाडूला कोरोनाची लागण झालीये. न्यूझीलंडच्या टीम सेफर्ट (Tim Seifert) याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या 10 दिवसांत त्याच्या 7 टेस्ट निगेटि्ह आल्या होत्या. मात्र आयपीएल (IPL 2021) स्थगित झाल्यानंतर मायदेशी जाण्यासाठीची लगबग सुरु असताना त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याला मायदेशी परतता येणार नाही. त्याचा भारतातला मुक्काम आणखी काही दिवस वाढला आहे. (IPL 2021 KKR New Zealand tim Seifert tested Corona positive)

टीम सेफर्ट अहमदाबादमध्ये क्वारन्टाईन

टीम सेफर्टचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे तो अहमदाबादमध्ये असताना… म्हणूनच सध्या त्याला अहमदाबादमध्ये क्वारन्टाईन करण्यात आलंय. आज किंवा उद्या (शनिवार किंवा रविवारी) त्याला चेन्नईतील हॉस्पिटलमध्ये पुढील तपासण्यांसाठी दाखल करण्यात येणार आहे.

न्यूझीलंडचे बाकी खेळाडू मायदेशी परतले, सेफर्टचा भारतातला मुक्काम वाढला!

कोरोना व्हायरसने आयपीएलच्या मैदानात एन्ट्री केल्याने 14 वं पर्व स्थगित करण्यात आलं. त्यानंतर आता विविध संघाच्या खेळाडूंनी घरची वाट धरलीय. न्यूझीलंडचे खेळाडूही मायदेशी रवाना झाले आहेत. त्यांना घेऊन एक चार्टर विमान न्यूझीलंडला रवाना झालंय. परंतु टीम सेफर्टला कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येईपर्यंत भारतातच राहावं लागेल.

“कोलकाता फ्रँचायजी त्याची उत्तम काळजी घेतेय. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर तसंच क्वारन्टाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर तो न्यूझीलंडला रवाना होईल ज्यानंतर त्याला पुन्हा न्यूझीलंडमध्ये क्वारन्टाईन पिरियड पूर्ण करावा लागेल”, अशी माहिती न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट यांनी दिली आहे.

न्यूझीलंडच्या खेळाडूंना घेऊन एक चार्टर विमान रवाना झालं आहे. आज (शनिवार) संध्याकाळी आणखी काही खेळाडूंना घेऊन एक विमान न्यूझीलंडला रवाना होईल. यादरम्यान खेळाडूंना कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे. ऑकलंडमध्ये गेल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

याअगोदर कोलकात्याच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण

आयपीएल स्थगित होण्याअगोदर कोलकात्याच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. संदीप वॉरियर आणि वरुण चक्रवर्तीला कोरोनाची बाधा झाली होती. या दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानेच हैदराबादविरुद्धची मॅच पुढे ढकलण्यात आली होती.

(IPL 2021 KKR New Zealand tim Seifert tested Corona positive)

हे ही वाचा :

Video : क्रिकेटमधला पहिला ओरिजनल मॅच फिनिशर, त्याच्या खास स्टाईलमध्ये संपवायचा मॅच!

Video : पृथ्वी शॉ ची गर्लफ्रेंड प्राची सिंगचा जान्हवी कपूरच्या गाण्यावर अप्रतिम बेली डान्स, एकदा पाहाच!

कोरोनाबाधित वडिलांवर आयपीएलचा सगळा पैसा खर्च करणार, 22 वर्षीय चेतन साकरियाच्या संघर्षाची कथा!

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.