KKR vs RCB IPL 2021 : आयपीएलच्या मैदानात कोरोनाची एण्ट्री, क्रिकेटपटूला कोरोना, कोलकाता विरुद्ध बंगळुरु सामना लांबणीवर

आज स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात नियोजित सामना खेळला जाणार होता. मात्र कोलकात्याच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. (IPL 2021 KKR vs RCB Match reschuduled After KKR team Varun Chakravarthy Sandeep Warrier Test Positive for Covid-19)

KKR vs RCB IPL 2021 : आयपीएलच्या मैदानात कोरोनाची एण्ट्री, क्रिकेटपटूला कोरोना, कोलकाता विरुद्ध बंगळुरु सामना लांबणीवर
IPL
Follow us
| Updated on: May 03, 2021 | 12:58 PM

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या पर्वावर (IPL 2021) कोरोनाचं जोरदार वादळ घोंघावत आहे. आज स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु (KKR vs RCB) यांच्यात नियोजित सामना खेळला जाणार होता. मात्र कोलकात्याच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे. तथापि, कोलकाता आणि आयपीएलच्या अधिकृत निवेदनाची अद्यापपर्यंत कोणतंही स्टेटमेंट आलेलं नाहीय. दरम्यान आज आयपीएलची कोणतही मॅच खेळवली जाणार नाही. (IPL 2021 KKR vs RCB Match reschuduled After KKR team Varun Chakravarthy Sandeep Warrier Test Positive for Covid-19)

कोलकात्याच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण

कोलकाता विरुद्ध बंगळुरु यांच्यातील आयपीएलची 30 मॅच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जाणार होती. परंतु कोलकात्याच्या संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्ती (varun chakravarthy) आणि संदीप वॉरियर्स (sandeep warrier) यांना कोरोनाची लागण झाल्याने हा सांमना पुढे ढकलण्यात आला आहे.

कोलकात्याच्या इतर खेळाडूंची तब्येत चांगली

चक्रवर्ती नुकताच त्याच्या खांद्याच्या स्कॅनसाठी बायो बबलच्या बाहेर गेला होता. त्याच वेळी कोरोनाने त्याला गाठलं असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वरुण चक्रवर्ती आणि वॉरियर वगळता केकेआरचे बाकीचे खेळाडू ठीक आहेत. त्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आहेत.

पॅट कमिन्स आजारी?

आयपीएल 2021 सुरू झाल्यानंतर खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी काही खेळाडूंना स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. ऑस्ट्रेलियन वेबसाइट द एजच्या रिपोर्टनुसार कोलकाता नाइट रायडर्सचे बरेच खेळाडू आजारी पडले आहेत. अशा परिस्थितीत उर्वरित खेळाडू आणि कर्मचारी आयसोलेट आहेत. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, आजारी पडलेल्या खेळाडूंमध्ये वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सचे नावही आहे.

खेळाडू बायोबबलमध्ये, तपासणीवेळी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर

संपूर्ण भारतात देशात कोरोनाने हाहाकार माजवलेला असताना अशा वातावरणात देखील आयपीएलची स्पर्धा सुरु आहे. संपूर्ण काळजी घेऊन ही स्पर्धी खेळविण्यात येतीय. याच पार्श्वभूमीवर स्पर्धी सुरु झाल्यापासून खेळाडू बायो बबल आहेत. दोन ते तीन दिवसांनंतर त्यांची कोरोना चाचणी केली जाते, त्यांचं हेल्थ चेकअप केलं जातं. आज चाचणी केली असता कोलकात्याचे वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर्स या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

(IPL 2021 KKR vs RCB Match reschuduled After KKR team Varun Chakravarthy Sandeep Warrier Test Positive for Covid-19)

हे ही वाचा :

IPL 2021 : के एल राहुल रुग्णालयात, पंजाबची संघमालकीण प्रीती झिंटाचं ट्विट, म्हणते, ‘राहुल तुला….’

IPL 2021 : एकाच जागेवर येऊन उभे राहिले दोघेही फलंदाज, दीपक हुड्डा विचित्र पद्धतीने रनआऊट, पाहा Video

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.