IPL 2021 | लवकरच चौकार षटकार, आयपीएलच्या 14 व्या मोसमाची तारीख जवळपास निश्चित

आयपीएलच्या आगामी 14 व्या पर्वासाठीची ( IPL 2021) लिलाव प्रक्रिया ही 18 फेब्रुवारीला चेन्नई पार पडणार आहे.

IPL 2021 | लवकरच चौकार षटकार, आयपीएलच्या 14 व्या मोसमाची तारीख जवळपास निश्चित
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 1:02 PM

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी ( IPL 2021) खेळाडूंसह क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. कोरोनामुळे आयपीएलच्या 13 व्या मोसमाचं आयोजन हे यूएईमध्ये करण्यात आलं होतं. दरम्यान या 14 व्या मोसमाचं आयोजन हे भारताताच होणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. त्यातच आता या मोसमाची तारीख ही जवळपास निश्चित झाल्याचं समजत आहे. 11 एप्रिलपासून या 14 व्या मोसमाला सुरुवात होणार असल्याचे वृत्त मीडिया रिपोर्टनुसार देण्यात आलं आहे. दरम्यान याबाबत आयपीएल प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. (ipl 2021 likely held by 11 april in india)

विजय हजारे ट्रॉफी आणि वुमन्स वनडे सीरिजनंतर आयपीएलच्या 14 व्या मोसमाला सुरुवात होऊ शकते, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार या मोसमातील अंतिम सामना 5 किंवा 6 जूनला खेळवण्यात येऊ शकतो. यानुसार बीसीसीआयची टी 20 स्पर्धा साधारण 56 दिवस चालू शकते.

11 एप्रिलच का?

आगामी मोसमाच्या सुरुवातीनंतर अंतिम सामन्याचे आयोजन कुठे आणि कधी करायचे याबाबतचा निर्णय बैठकीत घेतला जाईल. तसेच इंग्लंड भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळण्यात येणार आहे. 5 फेब्रुवारी ते 28 मार्च असा हा लांबलचक दौरा असणार आहे. खेळाडू सातत्याने खेळत आहेत. त्यांना काही दिवस विश्रांती मिळावी, या उद्देशाने 14 व्या मोसमासाठी 11 एप्रिल ही तारीख निवडली आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने टीओआयशी संवाद साधताना दिली.

भारतातच आयोजन होणार : टीओआय

या आगामी मोसमाचं आयोजन भारतातच केलं जाणार असल्याचं वृत्त टीओआयने 31 जानेवारीला दिलं. या वृत्तानुसार मुंबई आणि नजीकच्या स्टेडियममध्ये साखळी सामन्याचे आयोजन केले जाणार आहे. मुंबई आणि नजीकच्या परिसरात बरेच स्टेडियम असल्याने बीसीसीआयने मुंबईत साखळी सामने खेळवण्यास पसंती दिली आहे. मुंबईतील वानखेडे, बेब्रॉन स्टेडियम, नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियम तर पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये हे साखळी सामने खेळले जाणार आहेत. तसेच अहमदाबादमधील मोटेरा आणि सरदार पटेल स्टेडियममध्ये बाद फेरीतील (Knock Out) सामन्यांचं आयोजन केलं जाणार असल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

18 फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव

या आगामी पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव हा 18 फेब्रुवारीला होणार आहे. या बोली प्रक्रियेआधी सर्व फ्रँचायजीने आपल्या ताफ्यातील रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक संघांनी मोठ्या आणि अनुभवी खेळाडूंना रिलीज केलं आहे. यामुळे इतर फ्रँचायजींमध्ये या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या :

Union Budget 2021 Marathi LIVE : प्रत्येक भारतीयाला माझे झुकून नमन : निर्मला सीतारमण

IPL 2021 | ठरलं, आयपीएलच्या आगामी 14 व्या मोसमाचं आयोजन भारतातच

IPL 2021 Auction Date | IPL 2021 च्या लिलावाची जय्यत तयारी, तारीख आणि ठिकाण ठरलं

(ipl 2021 likely held by 11 april in india)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.