MI vs SRH IPL 2021 : जिंकल्यानंतरही रोहितच्या मनात या दोन बोलर्सची धास्ती, म्हणतो ‘खेळणं एवढंही सोपं नव्हतं!’

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने हैदराबादच्या गोलंदाजांचं कौतुक केलं. खास करुन राशीद खान आणि मुजीबविरोधात रन्स करणं मुंबईच्या फलंदाजांना सोपं नव्हतं, अशी कबुली रोहित शर्माने दिली आहे. (IPL 2021 Mi vs SRH Rohit Sharma Rashid Khan and mujeeb ur rahman)

MI vs SRH IPL 2021 : जिंकल्यानंतरही रोहितच्या मनात या दोन बोलर्सची धास्ती, म्हणतो 'खेळणं एवढंही सोपं नव्हतं!'
Follow us
| Updated on: Apr 18, 2021 | 11:29 AM

चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) 9 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादवर (Mumbai Indians vs Sunrisers Hydrabad) 13 रन्सने मात केली. या विजयाबरोबरच मुंबईने सलग दोन सामने जिंकत गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर स्थान मिळवलं. या विजयानंतर बोलताना मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) हैदराबादच्या गोलंदाजांचं कौतुक केलं. खास करुन राशीद खान (Rashid Khan) आणि मुजीबविरोधात (mujeeb ur rahman) रन्स करणं मुंबईच्या फलंदाजांना सोपं नव्हतं, अशी कबुली रोहित शर्माने दिली आहे. (IPL 2021 Mi vs SRH Rohit Sharma Says It was not easy to score against Rashid Khan and mujeeb ur rahman)

राशीद आणि मुजीबविरोधात खेळणं सोपं नव्हतं

सनरायजर्सकडे तोडीस तोड गोलंदाज आहेत. त्यांच्या ताफ्यात राशीद खान आणि मुजीब रहमान सारखे स्पिनर्स आहेत ज्यांच्याविरोधात रन्स काढणं वाटतं तेवढं सोपं नाहीय. खेळपट्टी जेव्हा संथ होते आणि ती स्पिनर्सला मदत करायला लागते तेव्हा त्यांच्याविरोधात रन्स काढणं सोपं काम नसतं, अशी कबुली रोहित शर्माने दिली.

मुंबईचा सलग दुसरा विजय तर हैदराबादचा सलग तिसरा पराभव

इंडियन प्रीमियर लीगमधील नववा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) या दोन संघांमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला होता. पहिल्या डावात फलंदाजी करताना मुंबईच्या संघाने हैदराबादसमोर 151 धावांचं माफक आव्हान उभं केलं होतं. परंतु मुंबईने दिलेलं हे आव्हान हैदराबादच्या संघाला पेलवलं नाही.

हैदराबादचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोने अवघ्या 22 चेंडूत 43 धावांची आक्रमक खेळी केली. सोबत कर्धणार डेव्हिड वॉर्नरने 36 धावांचे योगदान दिलं. या दोघांव्यतिरिक्त हैदराबादच्या कोणत्याही फलंदांजाला चमकदार कामगिरी करता आली नाही. परिणामी हैदराबादला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं.

मुंबईची टिच्चून गोलंदाजी

दुसरीकडे हैदराबादवर मात करत मुंबईने गुणतालिकेत पहिलं स्थान पटकावलं आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत 150 धावांचा बचाव केला. मुंबईकडून राहुल चाहरने 4 षटकात 19 धावा देत 3 तर ट्रेंट बोल्टने 3.4 षटकात 28 धावा देत 3 बळी घेतले. बुमराह आणि कृणाल पंड्याने प्रत्येकी एक विकेट घेतली. तर हार्दिक पंड्याने हैदराबादच्या दोन फलंदाजांना धावबाद केलं.

(IPL 2021 Mi vs SRH Rohit Sharma Says It was not easy to score against Rashid Khan and mujeeb ur rahman)

हे ही वाचा :

पोलार्डचा जलवा सुरु, IPL 2021 मोसमातील सगळ्यात लांब षटकार, पाहा पोलार्डच्या बॅटमधल्या ‘जादू’चा Video  

IPL 2021 : ‘तेरे बिना मॅच कहाँ रे…’, मुंबईविरुद्धच्या सामन्यात हैदराबादची नवी मिस्ट्री गर्ल!

IPL 2021 : मुंबई इंडियन्सविरोधात भर मैदानात बेयरस्टोचं खळ्ळखटॅक, बघा खतरनाक Video

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.