चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या मोसमाला (IPL 2021) आता काही दिवस शिल्लक आहेत. या हंगामाला 9 एप्रिलपासून सुरुवात होत आहे. यंदा 2 वर्षानंतर आयपीएलचं भारतात आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) अष्टपैलू खेळाडू ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैना (Suresh Raina) 14 व्या मोसमासाठी सज्ज झाला आहे. या हंगामाच्या पार्श्वभूमीवर रैनाने सरावाला सुरुवात केली आहे. (ipl 2021 mister ipl suresh raina is ready to hitting)
In awe of the southpaw! #ChinnaThala – Coming ?! #WhistlePodu #Yellove ?? @ImRaina pic.twitter.com/GMbsqylDoe
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 17, 2021
रैनाचा मैदानात फटकेबाजी करतानाचा व्हिडीओ चेन्नई सुपर किंग्जसने ट्विट केला आहे. हा व्हिडीओ एकूण 30 सेकंदांचा आहे. यामध्ये रैना फटकेबाजी करताना दिसतोत. यात रैना विविध फटके मारतोय. या वरुन रैना 14 व्या पर्वासाठी उत्सुक दिसतोय.
आयपीएलच्या पार्श्वभूमीवर चेन्नईने शिबीराची सुरुवात केली. यासाठी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू आणि इतर खेळाडू हे काही दिवसांपूर्वीच दाखल झाले आहेत. दरम्यान “रैना 24 मार्चनंतर या शिबिरात सामील होणार आहे. रैनाला काही वैयक्तिक काम आहेत. ती कामं संपवल्यानंतर तो संघाशी जोडला जाणार आहे”, अशी माहिती सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी एका वृत्तसंस्थेला दिली.
रैनाने आयपीएलच्या 13 व्या मोसमातून माघार तडकाफडकी माघार घेतली होती. माघार घेण्यामागे वैयक्तिक कारण सांगण्यात आले होते. मात्र त्याचे टीम मॅनेजमेंटसोबत वाद झाल्याचे म्हटंल जात होतं. तसेच हरभजन सिंहनेही माघार घेतली होती. तर कर्णधार महेंद्र सिंह धोनी अपयशी ठरला. धोनीला त्या मोसमात धावांसाठी संघर्ष करावा लागत होता. चेन्नने पहिल्या 12 मोसमात दरवेळेस प्लेऑफमध्ये (टॉप 4) प्रवेश मिळवला होता. मात्र गेल्या मोसमात चेन्नईचे साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आले होते. यामुळे चेन्नई या मोसमात जोरदार कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
रैनाने आतापर्यंत एकूण 193 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 137.14 च्या स्ट्राईक रेटने तसेच 33.34 च्या सरासरीने 5 हजार 368 धावा चोपल्या आहेत. यामध्ये 38 अर्धशतक आणि 1 शतकाचा समावेश आहे. नाबाद 100 ही रैनाची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. रैनाने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत एकूण 493 चौकार आणि 194 गगनचुंबी षटकार फटकावले आहेत. तसेच रैनाने 25 विकेट्स घेण्याचीही कामगिरी केली आहे.
संबंधित बातम्या :
IPL 2021 Time Table | आयपीएलच्या 14 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपासून रंगणार थरार
(ipl 2021 mister ipl suresh raina is ready to hitting)